Daily Archives: May 7, 2020

कोरोनाची झळ

देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता पन्नास हजारांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची वाढ दिसून आली. दैनंदिन चाचण्यांच्या प्रमाणात झालेली वाढ हेच त्याचे कारण असल्याचा सरकारचा दावा आहे. एक एप्रिलला रोज पाच हजार चाचण्या व्हायच्या, त्या आता मे महिन्यात रोज पंच्याहत्तर हजार होत आहेत, त्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ दिसते, पण ही दैनंदिन रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली ... Read More »

दहावीची परीक्षा २१ मेपासून

>> बारावीची २० ते २२ मे दरम्यान; मुख्यमंत्र्यांची माहिती सरकारने गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यास काल मान्यता दिली आहे. दहावीची परीक्षा २१ मेपासून आणि बारावीची परीक्षा २० ते २२ मे दरम्यान घेतली जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ... Read More »

खलाशांना घेऊन दोन जहाजे लवकरच मुरगाव बंदरात

विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणारी दोन जहाजे मे महिन्याच्या मध्यात मुरगाव बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्याच्या बंदर सचिवांनी दिली आहे. विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाल्यास खलाशांना उतरवून घेण्याचे काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. केंद्र सरकारने विदेशातून येणार्‍या खलाशांना उतरवून घेण्यासाठी जाहीर केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याची ... Read More »

पोर्टलवर ४ हजार गोमंतकीयांची परत येण्यासाठी नोंदणी ः सावईकर

  कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ६५ देशांत अडकून पडलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी अनिवासी भारतीय आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती काल राज्याचे अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यानी दिली. आयोगाने सुरू केलेल्या पोर्टलवर विदेशांतून गोव्यात परत येण्यास इच्छुक असलेल्या सुमारे ४ हजार गोमंतकीयांनी गोव्यात परत येण्यासाठी नोंदणी केली असल्याचे सावईकर यांनी सांगितले. जगभरातील ६५ देशांत हे गोमंतकीय ... Read More »

खलाशांबाबत राज्यपालांशी दिगंबर कामतनी केली चर्चा

विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी काल राज्यपाल सत्यपाल मलीक यांची भेट घेतली व विदेशी जहाजांवर काम करणार्‍या गोमंतकीय खलाशांना राज्यात परत आणण्याच्याबाबतीत जो विलंब होऊ लागला आहे तो प्रश्‍न दिल्ली दरबारी मांडण्याची त्यांना विनंती केली. काल यासंबंधी माहिती देताना कामत म्हणाले की, गोमंतकीय खलाशांना घेऊन आलेली दोन विदेशी जहाजे मुंबई येथे बंदरावर आहेत. मात्र, अद्याप त्या जहाजांवरील खलाशांना खाली ... Read More »

हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर काश्मीरातील चकमकीत ठार

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपोरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दशतवादी संघटनेचा महत्वाचा कंमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या मृत्यूनंतर हिजबुल मुजाहिद्दीनने रियाजला कमांडर म्हणून नियुक्त केले होते. भारतीय लष्कराने रियाजला पकडून देणार्‍याला १२ लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली होती. जम्मू काश्मीरमध्ये काल बुधवारी सकाळपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. एका ठिकाणी भारतीय जवानांनी ... Read More »

गोमेकॉतील ओपीडीत तपासणीसाठी पूर्वनोंदणी सक्तीची ः डॉ. बांदेकर

>> रुग्णांची गर्दी होत असल्याने निर्णय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची गर्दी होत असल्याने ओपीडीमध्ये तपासणीसाठी पूर्वनोंदणी सक्तीची करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे डीन प्रा. डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल दिली. मंगळवारपासून जीएमसीच्या सर्व विभागातील ओपीडी सुरू करण्यात आल्या आहेत. ओपीडी सुरू करण्यात आल्याने रुग्णांची तपासणीसाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे पालन ... Read More »

लॉकडाऊनमुळे ऊस शेतकर्‍यांचे ८५ लाख रुपयांचे नुकसान

कोविड-१९ महामारीच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने राज्यातील शेतीचे मोठे नुकसान झालेले असून ऊस तोडणी कामगार मिळू न शकल्यामुळे राज्यातील तब्बल २६०० टन एवढा कापणीशिवाय शिल्लक राहिलेला ऊस सुकून गेल्याने ऊसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांचे ८५ लाख रु.चे नुकसान झाले असल्याची माहिती काल ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या सूत्रानी दिली. राज्यातील ऊस तोडणीचे काम करण्यासाठी शेतकर्‍यांना परराज्यातून ऊस तोडणी मजूर आणावे लागतात. प्रामुख्याने हे ... Read More »

…तर परदेशातून प्रशिक्षक आणणे कठीण

>> सिंधूने व्यक्त केले मत कोरोना महामारी नियंत्रणात न आल्यास खेळाडूंना भविष्यात मोठा फटका बसू शकतो. ही महामारी कायम राहिली तर परदेशातून प्रशिक्षक आणणे कठीण होऊ शकते, असे मत भारताची स्टार महिला शटलर तथा जागतिक अजिंक्यपद स्पर्धा विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने व्यक्त केले. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूने भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नव्याने नियुक्त केलेल्या सहायक संचालकांशी ऑनलाईन सत्राद्वारे संवाद साधताना ... Read More »

शेष विश्‍वकडून भारताचा पराभव

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत भारताला शेष विश्‍व संघाकडून २.५-१.५ असा पराभव पत्करावा लागला. पहिल्या फेरीत अमेरिकेविरुद्धला बरोबरीत रोखल्यानंतर भारतासाठी हा धक्का होता. माजी विश्‍वविजेत्या विश्‍वनाथन आनंद याला तैमूर राजोबोव याने बरोबरीत रोखल्यानंतर वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन कोनेरू हंपीला माजी विश्‍वविजेत्या मारिया मुझिचूक हिचा भक्कम बचाव भेदणे शक्य झाले नाही. पी. हरिकृष्णा व उदयोन्मुख स्टार अलिरेझा फिरोझा यांच्यातील सामना ... Read More »