Daily Archives: May 5, 2020

गोमेकॉत ३ कोरोना संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत. आरोग्य खात्याने सरकारी क्वारंटाईनखाली १७६ जणांना आणले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोग शाळेत तपासण्यात आलेले ३४८ नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास विभागात ६ संशयितांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ३५१ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ३४८ नमुने तपासण्यात आले असून ... Read More »

मद्यविक्रीची दुकाने खुली मात्र; ‘मास्क नाही तर मद्य नाही’

कोविडसाठीच्या लॉकडाऊनमुळे गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ बंद राहिलेली मद्याची दुकाने काल सोमवारपासून सुरू झाली. दरम्यान, मास्क न घालता येणार्‍यांना दारू देण्यात येणार नसल्याचे मद्य व्यापारी संघटनेने काल स्पष्ट केले. मास्क नाही तर मद्य नाही, असे धोरण आम्ही अवलंबणार आहोत, असे संघटनेने स्पष्ट केले आहे. मद्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, सोमवारपासून मद्याची विक्री करणारी दुकाने उघडण्यात आली. मात्र, ... Read More »

देशातील कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येत वाढ ः आरोग्य मंत्रालय

कोरोनामुळे देश चिंताजनक अवस्थेत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक दिलासादायक बातमी दिली आहे. त्यानुसार देशात आतापर्यंत ११७०६ लोक कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून, गेल्या २४ तासांत १०५६ लोकांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२५३३ इतकी झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनामुळे देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर ... Read More »