Daily Archives: May 5, 2020

योगसाधनेने मनावर नियंत्रण शक्य

डॉ. सीताकांत घाणेकर वाईट घटनांवरच चिंता करत बसण्यापेक्षा त्यावर चिंतन करून त्यांचे विश्‍लेषण केले तर प्रत्येकाला तसेच मानवजातीला फायदा होईल. इतरांच्या चुका बघून आपण सुधारु शकू. विश्‍व काय करणार माहीत नाही पण प्रत्येक योगसाधक तरी संकल्प करु या. लाखो वर्षांपासून कालचक्र चालू आहे. त्यांत तीन काळ आहेत- भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ. चालू काळ म्हणजे वर्तमानकाळ. क्षणाक्षणाने तो भूतकाळ होतो. आपण ... Read More »

कोरोना विरोधात मुख्य औषधी द्रव्ये

 –  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) संगीत साधना, योगसाधना, यम-नियमांचे पालन, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, नामस्मरण- जप- ध्यानाद्वारे मानसिक आरोग्य तर प्राप्त करायचेच आहे, त्याचबरोबर शारीरिक बल व व्याधीक्षमत्व वाढवण्यासाठी काही आयुर्वेदीय औषधी द्रव्यांचा नित्य उपयोग प्रत्येकाने करावा, असे आयुष विभागाने जनसमुदायाला आवाहन केले आहे. गावात आपण सुरक्षित आहोत. आपल्याला कोरोना व्हायरसची भीति नाही. आपल्याला काय मोठी काळजी घ्यायची गरज नाही. ... Read More »

पावसाळ्यात होणारे रोग

–  डॉ. भिकाजी घाणेकर एप्रिल- मे महिन्यात डास न होण्यासाठी उपाय केले नाहीत तर अतिसार, कॉलरा, विषमज्वरासारखे रोग होतात. जूनच्या नंतर काहीच करता येत नाही कारण सगळीकडे पाणीच पाणी झालेले असते. लहान मुले, गरोदर स्त्री, स्तनपान करणारी स्त्री आणि ६० वर्षे वयावरील वृद्ध ह्यांची जास्त काळजी घ्यावी. पावसाळा सुरु झाला की अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. पावसाळा हा गोव्यातील जास्त ... Read More »

खरी कसोटी

देशातील कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढताना दिसत असली, तरी आजवरचा एकूण कल संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासला तर कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात आतापावेतो तरी भारत यशस्वी ठरला आहे असे दिसून येते. रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण खाली आहे आहे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढते आहे, दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत असली, तरी ती केवळ काही हॉटस्पॉटस्‌पुरती मर्यादित आहे. सरकारने लाल विभागांमधील निर्बंध आणखी ... Read More »

दहावी, बारावीची परीक्षा १७ मे नंतरच

>> १० दिवस आधी तारीख जाहीर करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती लॉकडाऊनच्या काळात राज्यातील दहावी, बारावीची परीक्षा घेणे शक्य नाही. येत्या १७ मे नंतरच परीक्षेचे वेळापत्रक निश्‍चित केले जाऊ शकते. दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख १० दिवस अगोदर जाहीर केली जाणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून समुपदेशन करावे, असे आवाहन माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल केले. राज्यातील खासगी डेंटल ... Read More »

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात शिथिलतेमुळे रहदारी वाढली

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात जास्त शिथिलता देण्यात आल्याने रस्त्यावरील वाहनांची रहदारी, बाजारपेठेतील दुकाने सुरू करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात कदंबच्या बसगाड्या वाहतूक करीत होत्या. तर, खासगी बसगाड्या मोजक्याच प्रमाणात वाहतूक करीत होत्या. या शिथिलतेच्या काळात मार्केटमध्ये नागरिकांच्या गर्दीच्या प्रमाणात वाढ होत असून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांकडे पालन कडक करण्याची मागणी केली जात आहे. राज्यातील केशकर्तनालये सुरू करण्यात आली असून केशकर्तनालयांमध्ये नागरिकांची ... Read More »

परप्रांतीय मजुरांना पाठवण्यासाठी कदंब बसगाड्यांचा वापर करणार

केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातील मजुरांना परत पाठविण्यासाठी कदंब महामंडळाच्या बसगाड्यांचा वापर केला जाणार आहे. जिल्हाधिकार्‍याकडून कदंब महामंडळाला मजुरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर वाहतुकीला सुरुवात केली जाणार आहे. बसगाडीच्या तिकिटाचा खर्च मजुरांना करावा लागणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे कार्यकारी व्यवस्थापक संजय घाटे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. कदंब महामंडळ शेजारच्या राज्यांतील मजुरांना पोचविण्याचे काम करू ... Read More »

बाजारपेठांतील दुकानदारांनी दिशानिर्देशांचे पालन करावे

  >> राज्य कार्यकारी समितीची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी राज्यातील बाजारपेठ संध्याकाळी ६ वाजता बंद केली पाहिजे आणि सकाळी ८ वाजण्यापूर्वी उघडता कामा नये. दुकानांच्या वेळेसंबंधीची सूचना अत्यावश्यक सेवांसाठी लागू होणार नाही. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आणि इतर सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, अशी सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली. अबकारी आयुक्तालयाने राज्यातील मद्याची दुकाने सायंकाळी ... Read More »

काश्मीरात पुन्हा दहशतवादी हल्ला; ३ जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या हंदवाडा जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी संरक्षण दलावर हल्ला केला. सीआरपीएफच्या एका गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे ३ जवान शहीद झाले असून सात जवान जखमी झाले. या चकमकीदरम्यान सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. दहशतवाद्यांनी सोमवारी संध्याकाळी काझियाबादमध्ये गस्तीसाठी जात असलेल्या सीआरपीएफच्या एका पथकावर गोळीबार केला. यानंतर झालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मात्र या ... Read More »

कळंगुटमध्ये मोबाईलवरून परप्रांतीय कामगाराचा खून

कळंगुट मासळी बाजारात मोबाईलच्या खरेदीवरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन खुनात झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या घटनेत शमशाद मलिक (३५, उत्तर प्रदेश) या खून झाला असून तो कळंगुटमध्ये एका खाजगी आस्थापनात कामावर होता. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी सहभागी १७ जणांना ताब्यात घेतले आहे. कळंगुट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भागातील खाजगी शॅकवर वेटरचे काम करणार्‍या सुमीत जैस्वाल (२३) व त्याचा सहकारी असलेल्या ... Read More »