Daily Archives: May 4, 2020

अंती विजयी ठरू!

प्रिय वाचक, आतापर्यंत लॉकडाऊनच्या बिकट काळामध्ये आम्ही आमच्या सर्व कर्मचार्‍यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना त्यांच्या घरांतून काम करण्याची संपूर्ण मुभा दिली होती. लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र वितरणात निर्माण झालेले अडथळे, घरपोच वृत्तपत्र वितरणातील मर्यादा, बंद झालेल्या जाहिराती, भविष्यात येऊ घातलेली आर्थिक आव्हाने, या सर्वांच्या पूर्ण विचारान्ती सर्व पुरवण्यांची व अतिरिक्त सदरांची पाने मर्यादित करून निव्वळ महत्त्वाच्या बातम्यांना वाहिलेला चार पानी अंक या ... Read More »

आजपासून ५०% प्रवाशांसह बस वाहतूक

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ः लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करणार आज सोमवारपासून सार्वजनिक प्रवासी वाहतूक ५० टक्के क्षमतेसह सुरू केली जाणार आहे. तसेच, राज्यात येत्या १७ मेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत नागरिक विविध कामे करू शकतात. संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा देणार्‍या ... Read More »

गोमेकॉत तीन कोरोना संशयित रुग्ण दाखल

बांबोळी येथील गोमेकॉच्या कोरोना आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. तर, जीएमसीच्या कोविड प्रयोग शाळेत तपासण्यात आलेले १९४ नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास विभागात ६ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळामध्ये २ संशयितांवर उपचार सुरू आहे. कोविड प्रयोगशाळेत एकही नमुना प्रलंबित नाही. आरोग्य खात्याने सरकारी क्वारंटाईनखाली २२१ जणांना रविवारी आणले आहेत. राज्यातील ... Read More »

कोविड-१९च्या योद्ध्यांना भारतीय सेनेकडून सलामी

कोरोना विषाणूविरोधात आपला जीव धोक्यात घालून लढत असणार्‍या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया यांना भारतीय नौदलाने काल रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत अनोख्या पद्धतीने सलामी दिली. भारतीय हवाईदलाने सुखोईसारख्या लढावू विमानांनीकोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भारतीय लष्कराच्या बॅन्डने या रुग्णालयांजवळ कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवले तर भारतीय नौदल आपल्या ... Read More »

लष्कर ए तोयबाच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जवानांनी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडातील राजवार भागात झालेल्या चकमकीत दोन परदेशी दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या चकमकीत पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाचा कमांडर हैदर याचादेखील समावेश आहे. परंतु, या ऑपरेशनमध्ये दोन अधिकार्‍यांसहीत पाच जवानही शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपनिरीक्षक शकील काझी यांचा समावेश आहे. हंदवाडा एन्काऊंटर दरम्यान लष्कर कमांडर ... Read More »

ब्रेट लीने उडवली होती रोहितची झोप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली त्यावेळी ब्रेट ली याच्या गोलंदाजीचा सामना करायच्या कल्पनेनेच झोप उडायची अशी कबुली टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा याने काल रविवारी दिली. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याला कसोटीत खेळणे अवघड जात असल्याचे हिटमॅनने मान्य केले. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी होऊन भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे झाल्यास कसोटीच्या पूर्वी हेझलवूडचा सामना करण्यासाठी खूप मानसिक तयारी करावी ... Read More »

मॅचफिक्सिंगसाठी उमरने टाकला दबाव

>> झुल्करनैन हैदरचा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज झुल्करनैन हैदर याने पाकिस्तानच्या उमर अकमल याच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत उमर अकमल याने सामने हरण्यासाठी आपल्यावर खराब प्रदर्शनाचा दबाव टाकला होता. परंतु, आपण नकार दिल्यामुळे जीवे मारण्यासाठी आपल्याला सातत्याने धमकीचे फोन येणे सुरू झाल्याचे हैदर याने सांगितले. मालिकेतील तिसर्‍या सामन्यात ड्रिंक्स घेऊन आल्यावर उमरने खराब ... Read More »

‘बीसीसीसीआय’च्या उपाध्यक्षपदी शुक्ला?

आयपीएलचे माजी अध्यक्ष शुक्ला आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष होऊ शकतात. महीम वर्मा यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशचे काम पाहण्यासाठी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा काही दिवसापूर्वीच दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे, उपाध्यक्षपदाची रिक्त जागा एका विशेष सर्वसाधारण बैठकीद्वारे ४५ दिवसांमध्ये भरता येते. परंतु कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊनमुळे ते शक्य होणार नाही. दरम्यान आयपीएलचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर शुक्ला यांनी ... Read More »

गंभीरच्या कसोटी संघाचा कुंबळे कप्तान

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने भारताच्या सर्वोत्तम कसोटी संघाची काल रविवारी निवड केली. गंभीरने संघाचे नेतृत्व करण्यासाठी लेगस्पिनर अनिल कुंबळेची निवड करताना त्याच्या नेतृत्वगुणांची प्रशंसा केली. कुंबळेने अधिक काळ टीम इंडियाचे नेतृत्व केले असते तर टीम इंडिया अधिक उंचीवर असती, असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. लिट्ल मास्टर सुनील गावसकर व वीरेंद्र सेहवाग यांना गंभीरने सलामीवीर म्हणून निवडले ... Read More »