Daily Archives: May 3, 2020

बेकारीचे महासंकट

शरत्चंद्र देशप्रभू जागतिकीकरणामुळे असंघटित कामगार हवालदिल झाले आहेत. नोकरी टिकण्याची शाश्वतीच संपुष्टात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचे महासंकट उभे ठाकले आहे. अशावेळी खमक्या परंतु वस्तुनिष्ठ दृष्टिकोनावर आधारलेले कामगार कल्याण धोरण आखणे अन् कार्यान्वित करणे आवश्यक आहे; अन्यथा कामगारांच्या उपजीविकेचे अन् आर्थिक पिळवणुकीचे प्रश्न निर्माण होतील.   कोरोनाच्या प्रादुर्भावाचा प्रारंभ चीनच्या वुहान प्रांतामध्ये झाला. परंतु अकल्पितरीत्या याचा प्रसार अन्य देशांतच जास्त ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- गडचिंचली येथील साधूंचे हत्याकांड

दत्ता भि. नाईक हत्या साधूंची झालेली आहे; भाजपाच्या कार्यकर्त्यांची नव्हे. तरीही तुमचे सरपंच असताना ही घटना घडलीच कशी असा भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारला जातो. या घटनेमुळे देशातील संतसमाजामध्ये क्षोभ पसरलेला आहे.   16 एप्रिलच्या रात्री पालघर जिल्ह्यातल्या पालघर या तालुक्यातील गडचिंंचले या गावी सुमारे चारशे ते पाचशे लोकांच्या जमावाने दोन भगवा वेशधारी साधू व त्यांचा चालक यांची लाठ्याकाठ्या व ... Read More »

परदेशी विमा संरक्षण

शशांक गुळगुळे परदेशी विम्याच्या बर्‍याच पॉलिसीज उपलब्ध असल्या तरी यांपैकी योग्य पॉलिसी कोणती हे प्रत्येकाने स्वतः ठरवून ती घ्यावी. खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सार्वजनिक उद्योगातील विमा कंपन्या कमी दराने प्रिमियम आकारतात व यांचा विमा घेणे विमाधारकाला जास्त सुरक्षित वाटते!   परदेशी प्रवासाला जाताना तुम्हाला प्रवास विमा (ट्रॅव्हल इन्शूरन्स) उतरविता येतो. परदेशप्रवासात सामान हरवले, विमान चुकले, विमान रद्द झाले व यामुळे तुमचे ... Read More »

-ः माणसांचं जग-50 ः- वात्सल्यमूर्ती : कृष्णीकाकी

डॉ. जयंती नायक तिला कसला दुर्धर आजार मात्र नव्हता. एके दिवशी मृत्यू तिला घेऊन गेला, पण कधी हे कुणाला समजलच नाही. चार-पाच दिवस तिच्या घराकडे कोणी फिरकलाही नव्हता. तिचा लाडका पुतण्या कामासाठी आठ दिवस मुंबईला गेला होता. तो आला तेव्हा ती घरात मरून पडलेली दिसली.   सर्वसामान्यपणे असा समज असतो की ज्या बाईला मूल असतं, त्याचं बाईचं काळीज आईच असतं, ... Read More »

-ः बंध रेशमाचे ः- कैरी

मीना समुद्र थोडी वेगळी वाटचाल केली, खटपट-धडपड केली तर स्वप्नं नक्कीच हाती येतात आणि जीवनाला नवी रूची आणतात, नवी दृष्टी लाभते आणि मनाची मधुर शुभंकर धारणा बनू लागते.   नुसतं नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटावं अशा गो÷ष्टी म्हणजे चिंच, आवळे आणि कैर्‍या. हल्ली कैर्‍यांचा मोसम असा ठरलेला नसला तरी चैत्र-वैशाखातली त्यांची चव न्यारी. त्यामुळे या दिवसांत बाजारात गेलो की ... Read More »

-ः वळणवाट ः- हळदोणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी ग्लेन जॉन विजय आंब्रोज इ सौझा तिकलो

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट ग्लेन तिकलो हे उत्कृष्ट क्रीडापटू असून त्यांनी फुटबॉल आणि हॉकी या क्रीडाप्रकारांत अनेकवेळा गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. आंतिनिओ स्पोर्टस् क्लबतर्फे ते सिनिअर डिव्हीजन फुटबॉल खेळायचे. भारतीय संघाचा दुसरा गोलरक्षक म्हणूनही त्यांची निवड झाली होती.   गोवा राज्य विधिमंडळातील हळदोणा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार आणि गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष ग्लेन जॉन विजय आंब्रोज इ ... Read More »

-ः खुले मैदान ः- राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमारही ‘कोरोनो फायटर’

सुधाकर रामचंद्र नाईक राष्ट्रकुल मेळा सुवर्णपदक विजेता तथा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार विजेता मुष्टियोद्धा अखिल कुमार हरयाना पोलिस दलातील पोलिस अधिकारी, उपअधीक्षक या नात्याने हरयानातील जनतेला ‘घरी रहा, स्वस्थ रहा’ असा मौलिक सल्ला देण्यासाठी रस्त्यावर सक्रिय आहे.   ‘कोविड 19’ महामारीच्या वैश्विक प्रादुर्भावामुळे संपूर्ण मानवजात हादरली असून या भयावह साथीचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने हरतर्‍हेचे प्रयत्न करीत आहे. आपल्या भारत ... Read More »