Daily Archives: May 2, 2020

(अग्रलेख) ढिलाई नको

ये त्या ३ मे रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल तो आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. हे करीत असतानाच लाल, नारंगी आणि हरित विभागांची संपूर्ण यादीही सरकारने जाहीर केली आहे. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकता, बेंगलुरू आदी सर्व प्रमुख महानगरे लाल विभागात येत असल्याने येत्या रविवारनंतर देखील तेथील निर्बंध अधिक कडक केले जातील असे दिसते आहे. ... Read More »

देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाऊन कायम

  देशातील सध्याचा लॉकडाऊन उद्या दि. ३ मे रोजी संपणार असतानाच काल केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यात आणखी दोन आठवड्यांनी वाढ केली.या अनुषंगाने वरील मंत्रालयाने आपत्कालीन व्यवस्थान  कायदा २००५ साली काल एक आदेश जारी केला. त्यानुसार आता राष्ट्रीय लॉकडाऊनचा कालावधी १७ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ मार्च रोजी सर्व प्रथम लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर ... Read More »

कोरोना ः गोव्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये

  >>  विषाणू विरोधातील लढा कायम राखणार ः सावंत केंद्र सरकारने देशभरातील कोरोना विषाणूच्या संदर्भात जाहीर केलेल्या वर्गीकरण अहवालांमध्ये गोवा राज्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या विरोधातील लढा यापुढेही कायम राखला जाणार असून कोरोना फ्रंट लाइन वॉरियर्स आणि नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले. केंद्र सरकारने विविध राज्यातील कोरोना विषाणूचा ... Read More »

नागरिकांच्या सहकार्यामुळे ग्रीन झोनमध्ये ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची प्रतिक्रिया कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्यातील कोरोना फ्रंट लाइन वॉरियर्सनी केलेली उत्कृष्ट कामगिरी  आणि नागरिकांनी दिलेल्या सहकार्यातून गोवा राज्याचा  ग्रीन  झोनमध्ये समावेश होण्यास  मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाई अशीच यापुढे कायम ठेवण्याची गरज आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर्स, मास्क वापर करण्याची गरज आहे. नागरिकांनी गरज नसेल ... Read More »

वैयक्तिकरित्या गोव्यात येणार्‍या खलाशांकडून शुल्क घेणार नाही

  >>  काही कंपन्यांची क्वॉरंटाईन खर्चाची तयारी ः मुख्यमंत्री   विदेशातून वैयक्तिक पातळीवर गोव्यात  येणार्‍या गोमंतकीय खलाशांकडून क्वारंटाईन शुल्क वसूल केले जाणार नाही. विदेशातील काही कंपन्यांनी खलाशांचा  क्वारंटाईन शुल्क देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे राज्य सरकारने खलाशांसाठी क्वारंटाईन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, क्वारंटाईन खर्चाची सक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केले. राज्यात खलाशांच्या क्वारंटाईऩ खर्चाच्या ... Read More »

खाणींबाबत पंतप्रधान योग्य निर्णय घेतील ः मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री सावंत यांनी काल व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी याबाबत एक उच्चस्तरीय बैठक गुरूवारी घेतली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर महसूल वाढविण्याची नितांत गरज आहे. खाण व्यवसायाची महसूल वाढविण्यासाठी  मदत होऊ शकते. राज्य सरकारच्यावतीने पंतप्रधान मोदी व इतरांना खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. ... Read More »

नवीन चार कोरोना संशयित गोमेकॉत दाखल

बांबोळी येथील गोमेकॉ आणि हॉस्पिटलच्या कोरोना आयझोलेशन  वॉर्डात ४ कोरोना संशयित रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून या विभागात ८ संशयितांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १४१ नमुने नकारात्मक आहेत. प्रयोगशाळेत एकूण १६३ नमुने होते. त्यातील १४१ नमुन्यांची तपासणी अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. तर, २२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने ३८ जणांना क्वारंटाईनखाली आणले आहेत.  ... Read More »

उपसभापतीपुत्राच्या प्रमाणपत्राविषयी तक्रारीसंदर्भात मुख्य सचिवांची सूचना

काही दिवसांपूर्वी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने अव्वल कारकूनपदासाठी घेतलेल्या परिक्षेच्या वेळी सदर पदासाठी अर्ज करताना बनावट पदवी प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांचा मुलगा रेमंड फिलीप फर्नांडिस यांच्या विरुद्धच्या तक्रारीसंबंधी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी आपले म्हणणे मांडावे अशी सूचना राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांनी त्यांना केली आहे. ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीनंतर उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी ... Read More »

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ ला मतदान

  महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या दि. २१ मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याची घोषणा काल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने केली. कोरोना आपत्तीमुळे याआधी ३ एप्रिल रोजी व्हावयाची ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. आता ही निवडणूक होणार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेद्वारा निवडून येऊन विधीमंडळ कामकाजात सहभागी होणे शक्य होणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल बी. एस. कोशयारी यांनी ... Read More »

युएईहून भारतात परतण्यासाठी पहिल्याच दिवशी ३२ हजार भारतीयांकडून नोंदणी

येथील ३२,००० हजारहून अधिक भारतीय नागरिकांनी भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करून तशी तेथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नोंदणी करण्याच्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी नोंदणी केली आहे. बुधवारी रात्री अबूधाबी येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने वरील नोंदणी प्रक्रियेचा तपशील आपल्या वेबसाईटवर जाहीर केला. ही प्रक्रिया सुरू होऊन काही मिनिटांतच त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्याविषयीचा ट्विट संबंधित अधिकार्‍यांनी काढून टाकला व पुन्हा गुरुवारी सकाळी नवीन ... Read More »