Daily Archives: May 1, 2020

(अग्रलेख) डफली मूक झाली!

  जिंदगी जिंदादिली का नाम है | मुर्दा दिल खाक जिया करते है ॥ ऋषी कपूर यांच्या निधनामुळे गेली किती तरी वर्षे वाजत, गाजत आणि रसिकांना रिझवत राहिलेली डफली एकाएकी थांबली. अभिनेता इरफान खानच्या मृत्यू पाठोपाठ भारतीय मनोरंजन क्षेत्राला बसलेला हा दुसरा मोठा धक्का. हिंदी चित्रपटसृष्टीतले एक पर्व ऋषी कपूर यांच्या मृत्यूमुळे संपले आहे. मागे उरला आहे एक भयाण सन्नाटा. ... Read More »

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

  बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (६७) यांचे मुंबईत निधन झाले. त्यांना बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खान यांचे निधन होऊन २४ तास उलटण्याआधीच बॉलिवूडमधील ही दुसरी दुःखद घटना आहे. ऋषी कपूर यांच्या ... Read More »

पांडुरंग नागवेकर यांचे निधन

  गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष, गोमंतकीय साहित्यिक ऍड. पांडुरंग नागवेकर यांचे वळवई येथील निवासस्थानी काल सकाळी निधन झाले. ऍड. नागवेकर गेले काही महिने आजारी होते. नागवेकर हे व्यवसायाने वकील असले तरी मराठी भाषेचे जाज्वल्य अभिमानी होते. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याच्या चळवळीत हिरीरिने सहभाग घेतला. गोमंतक मराठी अकादमीच्या कार्यात त्यांचे बरेच योगदान आहे. स्व. शशिकांत नार्वेकर यांच्या कार्यकाळात ... Read More »

परराज्यातील गोमंतकीयांसाठी पोर्टल कार्यान्वित

  लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या गोमंतकीय नागरिकांच्या नोंदणीसाठी  राज्य सरकारने खास संकेतस्थळ (पोर्टल) कार्यान्वित केले आहे. गोव्यात परतण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीय नागरिकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोमंतकीय परराज्यात अडकलेले आहेत. केंद्र सरकारने मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांना प्रवास करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा सरकारने परराज्यात अडकलेल्या गोमंतकीय नागरिकांना मदत करण्यासाठी खास संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. ... Read More »

कळंगुटमध्ये अडकलेल्या मजुरांना पाठवण्याच्या प्रक्रियेस सुरूवात

कळंगुट मतदारसंघातील विविध पंचायतीमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना परत पाठविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंचायतीकडून परराज्यात जाणार्‍या मजुरांची यादी तयार करून जिल्हाधिकार्‍यांना सादर केली जाणार आहे. राज्य सरकार परराज्यात जाणार्‍या मजुरांचा प्रवास खर्च उचलणार नाही.  मजुरांनी प्रवास खर्चाचा भार उचलला पाहिजे किंवा संबंधित राज्याने मजुरांच्या प्रवासाची खर्च उचलावा, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. ... Read More »

आता नो मास्क ः नो पेट्रोल, नो रेशन

>> राज्यात मास्क सक्तीची कडक अंमलबजावणी राज्य कार्यकारी समितीने मास्क वापर सक्तीची कडक अंमलबजावणी  करण्याची सूचना केली असून नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो रेशन या सारखे उपक्रम हाती घेण्याची सूचना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍या १ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी राज्य कार्यकारी समितीला दिली आहे. मास्कचा ... Read More »

कर्नाटकातून गोव्यात येणार्‍या खनिज ट्रकांना परवानगी कोणी दिली? ः कॉंग्रेस  

  गोव्यातील खाण पट्‌ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकातून येणार्‍या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतूक चालू आहे. या वाहतुकीवर सरकारने त्वरित नियंत्रण आणावे अशी मागणी करत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या ट्रकांना परवानगी कोणी दिली असा सवाल केला आहे. या खनिज वाहतुकीमुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे भयंकर अपघात ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचे ३ संशयित दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात तिघांना काल दाखल करण्यात आले आहे. तर, आरोग्य खात्याने ८३ जणांना क्वारंटाईऩ केले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेला १५३ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. कोविड प्रयोगशाळेत १६० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १५३ नमुने तपासण्यात आले आहेत. १३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. जीएमसीच्या खास विभागात ४ जणांवर उपचार ... Read More »

(अग्रलेख) एक झुंज सरली…

  ‘जो अभिनय वाटत नाही, तोच सर्वांत चांगला अभिनय’ असे म्हणतात. अभिनयातील हाच सहजसुंदरपणा घेऊन दूरचित्रवाणीच्या पडद्यापासून चित्रपटाच्या बड्या पडद्यापर्यंत आणि बॉलिवूडपासून अगदी हॉलिवूडपर्यंत मजल मारलेला प्रतिभाशाली अभिनेता इरफान खान याने काल अचानक या दुनियेतून कायमची एक्झिट घेतली. चित्रपटातील नायक हा गोंडस चेहर्‍याचा, तुकतुकीत अंगकांतीचा, चॉकलेट हिरोच असला पाहिजे हे ठोकताळे खोटे पाडत जे मोजके कलाकार केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ... Read More »

मजूर, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास केंद्राची परवानगी

  लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना ... Read More »