Daily Archives: April 28, 2020

(अग्रलेख) आर्थिक संकटांचे होमखण

  सं कटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारे देवदूत जसे दिसतात, तसेच मढ्याच्या टाळूवरच्या लोण्यालाही न सोडणारे राक्षसही दिसतात. दोन चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या रॅपिड टेस्टिंग किटस् सदोष आढळल्यानंतर झालेल्या न्यायालयीन वादाअंती, २२५ रुपये किंमतीच्या या किटस्‌ची खरेदी तब्बल सहाशे रुपयांना करण्यात येत होती हे उघड झाले आहे. कारगिल युद्धाच्या वेळी जवानांच्या शवपेट्यांवरही दलाली उकळणारे आढळले होते, तसलाच हा प्रकार आहे. ... Read More »

गोव्यातील लॉकडाऊन वाढवण्याची पंतप्रधानांना विनंती करणार ः मुख्यमंत्री

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील आर्थिक व्यवहार सुरू ठेवून लॉकडाऊन आणखी वाढविण्याची विनंती केली जाणार आहे. राज्याच्या सीमा, विमानसेवा, रेल्वे, आंतरराज्य रस्ता वाहतूक बंद ठेवण्याची मागणी केली जाणार आहे. पंतप्रधान मोदींना राज्य सरकारच्यावतीने यासंबंधीचे निवेदन पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे सचिवालयात काल दिली. पंतप्रधान मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स झाल्यानंतर पत्रकारांशी ... Read More »

बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली; वर्दळ वाढली

  लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाने आर्थिक  व्यवहार आणखीन वाढ करण्यासाठी नियम आणखी शिथिल केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील बिगर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यात आल्याने बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढत चालली असून स्थानिक प्रशासनाने जास्त सतर्कता बाळगण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण नसले तरीही बेफिकीर राहणे घातक ठरू शकते. बांबोळी येथील गोमेकॉच्या खास कोरोना विभागात दर दिवशी कोरोना संशयित ... Read More »

जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकमध्ये खनिज माल

  कोरोनासाठीच्या लॉकडाऊनमुळे सध्या परराज्यातून फक्त जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या गाड्यांना तेवढा प्रवेश देण्यात येत आहे. मात्र, काल जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या ट्रकमधून गोव्यात खनिज माल आणल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. काल कर्नाटकातील हॉस्पेट येथून आलेल्या काही ट्रकांतून मेंगनीज (खनिज माल) आणल्याचे उघड झाले. ओळीने आलेल्या या ट्रकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचा परवाना होता. त्यातील काही ट्रकांना फक्त साखर नेण्याचा परवाना ... Read More »

गोव्याला केंद्राकडून ७१४ किलो औषधे

  लाईफ लाईन उडान विमानाद्वारे गोव्याला केंद्राकडून ७१४ किलो एवढा औषध पुरवठा करण्यात आला. गोव्याला औषधांचा साठा घेऊन आलेले लाईफ लाईनचे हे दुसरे विमान आहे. या विमानाद्वारे गोव्याला औषधांच्या ५० खोक्यांतून ७१४ किलो वजनाची औषधे पाठवली. कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर गोव्याला हा औषधांचा पुरवठा केलेला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे गोव्याच्या विमानतळावरून आत्तापर्यंत ६४१६ विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशांत परत ... Read More »

खाणी सुरू करण्यास मान्यता देण्याची पंतप्रधानांकडे मागणी

>> मुख्यमंत्र्यांचे मोदींसह खाणमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र   केंद्र सरकारने एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करून राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय खाणमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झालेला असल्याने खनिज ... Read More »

चिनी टेस्ट्‌स किट्‌सची ऑर्डर भारताने केली रद्द

  रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किट्सच्या पुरवठ्याची चीनला देण्यात आलेली ऑर्डर रद्द करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. कोरोना व्हायरसची जलदगतीने चाचणी करून निदान करता यावे, यासाठी चीनमधून हे किट्स मागवण्यात आले होते. पण किट्सचा दर्जा खराब निघाल्यामुळे ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीएमआरने राज्यांना गुआंगझोऊ वोंडफो बायोटेक आणि हुहेई लिव्हझॉन डायग्नॉस्टिक्स या दोन कंपन्यांच्या किट्‌सचा ... Read More »

जम्मू-काश्मीरात जवानांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

  जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील लोअर मुंडा परिसरात जवानांकडून राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. एवढेच नाहीतर चकमक झालेल्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठाही जवानांनी जप्त केला आहे. या कारवाईत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार हे दहशतवादी द रेजिस्टेंस ... Read More »

लॉकडाऊनमध्येही व्यवहार सुरळीत राहतील असे धोरण बनवा ः पंतप्रधान

>> व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची घेतली बैठक   लॉकडाऊन राहील आणि जीवनही सुरळीत सुरू राहील असे धोरण बनवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना काल केले. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे. कोरोना दीर्घकाळासाठी आपल्यात राहणार असल्याचे समजूनच राज्यांनी धोरण ठरवावे असे सांगून दो गज दूरी हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. ... Read More »

आरोग्य टिकवण्यासाठी काय महत्त्वाचे ?

डॉ. मनाली म. पवार   लॉकडाउन संपल्यावर तुम्हाला पूर्ववत आयुष्य जगायला आवडेल का  की लॉकडाउनच्या काळातील अनुभव घेऊन जगण्यामध्ये बदल घडवायला आवडेल? हा निर्णय घेण्यासाठी अनारोग्याची कारणे समजून घेऊ, म्हणजे लॉकडाउन संपल्यावर याचे ज्ञान नक्की होईल….   सगळ्यांच्या लक्षात येत आहे का?  हॉस्पिटल, दवाखाने, वेलनेस सेंटरमध्ये जी रुग्णांची स्वास्थ्यासाठी जी लोकांची गर्दी दिसत होती ती अचानक कमी कशी झाली बरे! ... Read More »