Daily Archives: April 26, 2020

अर्थव्यवस्थांचा भयाणकाळ

शशांक मो. गुळगुळे   ‘कोरोना’चे निर्मूलन कधी होईल? याचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. पण जेव्हा केव्हा होईल तेव्हा जशी दुसर्‍या महायुद्धात होरपळलेल्या देशांनी उभारी घेतली होती तशी सर्व बाधित देशांना त्यांच्या-त्यांच्या सामाजिक व आर्थिक गरजा पाहून उभारी घ्यावी लागेल. पण सर्व देशांना सर्वांना अन्न, औद्योगिक प्रगती, हातांना काम व मजबूत आरोग्य यंत्रणा या बाबींना महत्त्व द्यावे लागेल.   ‘कोरोना’चा ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- वेदान्ताचे पुनरुज्जीवक ः आद्य शंकराचार्य

दत्ता भि. नाईक ग्लानी आलेल्या हिंदू धर्माला पुनः एकदा चैतन्य प्राप्त करून देणारे आचार्य म्हणून आद्य शंकराचार्यांचे स्थान अढळपदी विराजमान झाले आहे. वेदान्ताचे पुनरुज्जीवक म्हणून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात जगभर ते ओळखले जातात.   इतिहास लेखन म्हणजे राज्यकर्त्यांच्या वंशावळींची नोंद ठेवणे, अशी परंपरा विद्वान मंडळींनी चालू ठेवल्यामुळे जगातील तत्त्वज्ञान-दर्शन वैचारिक लिखाणाची बर्‍याच मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली. भारत हा तर तत्त्वज्ञान व आध्यात्मिक ... Read More »

-ः अवती-भवती ः- छोट्यांचं राज्य

– दत्ताराम प्रभू-साळगावकर   मुलांचं खेळणं, बागडणं बघितलं, अनुभवलं तर ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’ हा प्रश्नच पडत नाही. त्यामुळे ‘विचारी मना’ आणि ‘शोधून पाही’ याची गरजच भासत नाही. कदाचित काही अपवाद असतील, परिस्थितीचा टिळा किंवा शाप असलेली! ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’ हेही तेवढंच खरं आहे.     लहान मुलांचं जग हे फार विलक्षण असतं. सर्वकाही आबादीआबाद असं. त्यांच्या राज्यात राजा-राणी ... Read More »

-ः मनातलं ः- वेळेचा सदुपयोग

पौर्णिमा केरकर या बंदिस्त दिवसांत त्यांना या मातीच्या लोकपरंपरेतील पदार्थ तरी चाखू द्या. वेळ नाही या सबबीवर आठ दिवसांच्या चपात्या लाटून फ्रिजमध्ये प्लिज ठेवू नका. ताजे, सकस अन्न सुदैवाने काही दिवस तरी आपल्याला वेळेत जेवता-खाता येईल.     त्या दिवशी अचानक रिनाचा फोन आला. अचानक याचसाठी की सहजासहजी काही काम असल्याशिवाय ती फोन करीत नसते. मला विचार करायला वेळही न ... Read More »

माणसांचं जग- 49 कोंडोयकान्न मांय

  डॉ. जयंती नायक   तिला आमच्या घरात सगळीजणं ‘कोंडोयकान्न मांय’ म्हणून हाक मारायचे. परंतु तिचं खरं नाव काय होतं हे एकटी आई सोडल्यास दुसर्‍या कुणाला ठाऊक नव्हतं अन् आईला ते विचारायचं मला कधी सुचलं नाही. तिचा अन् आमच्या घराचा संबंध अंदाजे चारपाच वर्षांचा असेल. पण ते नातं खूप जुनं असल्यासारखं खूप घट्ट झालं होतं. म्हणूनच तिचं आमच्या घराकडं येणं ... Read More »

-ः पाथेय ः- क्रांतदर्शी आणि प्रज्ञावंत डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य

डॉ. सोमनाथ कोमरपंत डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य यांचे स्मरण करताना त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू डोळ्यांसमोर येतात. ते जन्मास येऊन एकशे एकोणतीस वर्षांचा कालावधी उलटला तरी इतिहासाच्या पटलावर त्यांनी उमटविलेली मुद्रा काही पुसली गेलेली नाही.   डॉ. त्रिस्तांव ब्रागांझ कुन्य यांचे स्मरण करताना त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू डोळ्यांसमोर येतात. ते जन्मास येऊन एकशे एकोणतीस वर्षांचा कालावधी उलटला तरी इतिहासाच्या ... Read More »

-ः बंध रेशमाचे ः- अक्षयतृतीया

मीना समुद्र आज संपूर्ण जगातल्या मानवाला ग्रासणार्‍या कोरोनाच्या संकटावेळी आपण संयमाची आणि निःस्वार्थी सेवेची जोड देऊन, होता होईल तेवढे दान गरजूंसाठी करावे आणि सर्वांचे आरोग्य अक्षय, अखंड, अबाधित राहावे- यातच अक्षयतृतीया साजरी करण्याचे सार्थक आहे!   आज अक्षयतृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया. हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीत साडेतीन मुहूर्त अतिशय शुभ मानले गेले आहेत. चैत्रप्रतिपदा म्हणजे ... Read More »

-ः वळणवाट ः- डिचोलीचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी पांडुरंग राऊत

  प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट   – उत्तरार्ध –   पांडुरंग राऊत यांना दोन वेळा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यामुळे डिचोली मतदारसंघ व गोव्याच्या विकासासाठी बरेच कार्य करण्यास त्यांना संधी मिळाली. तसेच मतदारसंघातील तरुणांना सरकारी नोकरी देण्याची संधी मिळाली. डिचोलीच्या विकासाबरोबर मंत्री म्हणून गोव्याच्या विकासाला हातभार लागला. ते सांगतात ः गोव्याचा वाहतूकमंत्री असताना कोकणरेल्वे प्रकल्पाला जो गोव्यात निराधार विरोध होत होता, ... Read More »

-ः खुले मैदान ः- ‘कोरोना फायटर्स’ मोहिमेत माजी विश्वविजेत्या खेळाडूंचेही योगदान

  सुधाकर रामचंद्र नाईक आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षितिजावरील अजोड कामगिरीमुळे राज्यशासनात उच्चतम हुद्दे मिळालेले हे भारतीय खेळाडू आता जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरून देशवासीयांना बहुमूल्य सल्ला देण्याची जबाबदारी पार पाडीत आहेत.   तमाम विश्वाला पार हादरविलेल्या ‘कोरोना व्हायरस’ने सर्व जग संभ्रमित बनले असून प्रत्येक देश आपापल्या परीने या दुष्टचक्राचा सामना करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या महामारीचा फैलाव ... Read More »