Daily Archives: April 25, 2020

(अग्रलेख) कोरोनाला हरवूया

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण काल दहा दिवसांपर्यंत वाढले. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी देखील २०.५७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाशी लढत असलेल्या भारताची वाटचाल योग्य मार्गाने चालली असल्याचे संकेत हे आकडे देत आहेत. दिवसागणिक नवनव्या रुग्णांची भर पडणे अजून थांबलेेले नाही, त्यामुळे कोरोना रुग्णांचा आलेख खाली येऊ शकलेला नाही, हे जरी खरे असले, तरी त्याच्या फैलावाची गती ... Read More »

देशात कोविड-१९ नियंत्रणाखाली

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशभरात राबविलेल्या प्रभावी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील कोरोना विषाणूचा फैलाव नियंत्रणाखाली असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने राबविलेल्या या संदर्भातील प्रभावी उपाययोजनांमुळे स्थिती नियंत्रणाखाली येऊ शकली असल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारने विविध ११ गट तयार केले असून आरोग्य सुविधा निर्मिती, अर्थ व्यवस्था पूर्वपदावर आणणे, लॉकडाऊन उठविल्यानंतर लोकांचे ... Read More »

अहमदाबाद, सूरत, हैदराबाद, चैन्नईतील स्थिती गंभीर

>> कोविड -१९ ः केंद्रीयगृह मंत्रालयाचे निवेदन   अमहदाबाद, सूरत, हैदराबाद व चेन्नई या शहरांमधील कोविड-१९ ची स्थिती अतिशय गंभीर असल्याचे अधिकृत निवेदन काल केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले. तसेच लॉकडाऊन नियमांचे देशातील अनेक भागांमध्ये उल्लंघन झाल्याचे अहवाल मिळाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी ती बाब गंभीर धोक्याची असून कोविड-१९ चा अधिक फैलाव होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. ... Read More »

एक कोरोना संशयित गोमेकॉत दाखल

  बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना आयझोलेशन वॉर्डात कोरोना संशयित एका  रुग्णाला काल दाखल करण्यात आले. तर, गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले १७८ नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास कोरोना वॉर्डात एकूण ८ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, आरोग्य खात्याने १४ जणांना क्वारंटाईन केले आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ११८ नमुने तपासणीसाठी काल पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेकडून १७८  नमुन्यांचे  अहवाल जाहीर करण्यात ... Read More »

पोर्तुगीज पासपोर्टधारक गोमंतकियांना भारतात येण्यासाठी परवानगी द्यावी

  >> प्रदेश कॉंग्रेसची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विनंती   पोर्तुगीज पासपोर्ट बाळगणारे दर्यावर्दी तसेच विदेशात काम करणारे गोमंतकीय यांना कोविडमुळे निर्मित स्थितीत आपल्या देशात परतण्यासाठी भारत सरकारने सहानुभूतीपूर्वक परवानगी द्यावी व या संकटकाळात त्यांना मानसिक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. सध्या विदेशात जहाजांवर किंवा ... Read More »

रक्ताच्या तुटवड्यामुळे हॉस्पिसियू इस्पितळाचे रक्तदानाचे आवाहन

  >> दक्षिणेतील इस्पितळांना रक्त मिळणे कठीण   रक्ताच्या तुटवड्यामुळे रक्त हवे असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात येऊ नये यासाठी लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन हॉस्पिसियू इस्पितळातर्फे करण्यात आले आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका हॉस्पिसियो इस्पितळातील रक्तपेढीलाही बसला असल्याची माहिती काल सूत्रांनी दिली. सध्या कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन असल्याने रक्तदान शिबिरे होत नसल्याने मडगावमधील हॉस्पिसियो इस्पितळातील रक्तपेढीला रक्ताचा तुटवडा ... Read More »

सरकार थर्मल गन्स खरेदी करणार

राज्यातील सर्व उद्योगांनी आपल्या प्रवेशद्वारांजवळ ‘थर्मल गन’ ची सोय करावी, अशी सूचना काल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली. यासंबंधी पुढे बोलताना सावंत म्हणाले की राज्य सरकार थर्मल गन्स विकत घेणार असून ती सर्व उद्योगांना देण्यात येणार आहेत. सरकारने राज्यातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना त्यांचे उद्योग सशर्त सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. काल म्हापसा येथील जिल्हा इस्पितळाला बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो ... Read More »

गोमेकॉ पदव्युत्तर समुपदेशन पहिली फेरी ३० रोजी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल पदव्युत्तर (पीजी) समुपदेशनाची पहिली फेरी ३० एप्रिल रोजी होणार आहे. गोमेकॉच्या एम्‌डी, एम्‌एस्, डिप्लोमा जागांसाठी पात्र असणार्‍या सर्व उमेदवारांना ईमेलद्वारे ऑनलाईन समुपदेशनाची पद्धत निवडण्यासाठी हमीपत्र सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे. गोवा राज्य कोट्याच्या समुपदेशानासाठीची ही पहिली फेरी असून ती ३० एप्रिल रोजी निश्‍चित करण्यात आली आहे. प्रत्यक्षात ही पहिली फेरी २० एप्रिल ... Read More »

जगात १ लाख ९० हजार कोरोना बळी

>> अमेरिकेला सर्वात मोठा हादरा; ४९ हजार मृत्यूमुखी जगभरात गेल्या काही काळापासून प्रचंड दहशत निर्माण केलेल्या कोरोना विषाणूने काल शुक्रवारपर्यंत जगातील विविध देशांत मिळून घेतलेल्या बळींची संख्या १ लाख ९० हजारांवर गेली आहे. यापैकी तब्बल दोन तृतियांश एवढ्या संख्येने युरोपमधील लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर २६ लाख ९८ हजार ७३३ लोकांना या विषाणूने ग्रासले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चीन देशात उत्पत्ती ... Read More »

राज्यात मास्क वापर सक्तीचा आदेश जारी

राज्यात सार्वजनिक ठिकाणी,  रस्ता, कामकाज,  हॉस्पिटल आदी ठिकाणी  नागरिकांना मास्क वापर सक्तीचा आदेश जारी करण्यात आला असून मास्क वापराच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍याला १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दंड न भरल्यास कलम १८८ खाली कारवाई केली जाणार आहे. या संबंधीचा आदेश अवर सचिव (आरोग्य) स्वाती दळवी यांनी काल जारी केला. राज्य सरकारने राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मास्क वापर करण्याची ... Read More »