Daily Archives: April 23, 2020

(अग्रलेख) राजकीय निर्णय नको!

  मुंबई बंदरात नांगरून ठेवलेल्या जहाजावरील गोमंतकीय खलाशांना किनार्‍यावर उतरवून घेण्याचा मार्ग अखेर केंद्र सरकारने शेवटच्या क्षणी का होईना, खुला केला. त्यासाठी गेले कित्येक दिवस या खलाशांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी नाना मार्गांनी राज्य सरकारवर दबाव वाढवत नेला होता. अगदी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनही केले गेले. विदेशांत जहाजांवर नोकरी करणार्‍या गोमंतकीय खलाशांची संख्या काही हजारांत जरी असली, तरी त्यांच्या कुटुंबीय आणि ... Read More »

खलाशांना आणण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात

>>  मुख्यमंत्र्यांची माहिती, डीजी शिपिंगचे दिशानिर्देश   केंद्र सरकारच्या जहाजोद्योग महासंचालनालयाच्या (डीजी शिपिंग) दिशानिर्देशानंतर (प्रॉटोकोल) गोमंतकीय खलाशांना आणण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे. दिशानिर्देश तयार करण्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. विदेशातून येणार्‍या खलाशांची पूर्ण चाचणी करून प्रवेश दिला जाणार आहे. खलाशांनी आपली माहिती जहाज मालक, एजन्सीला द्यावी. त्यांनी ही माहिती ... Read More »

मारेला जहाजावरील ६६ गोमंतकीय खलाशी मुंबईला उतरले ः श्रीपाद

  काही दिवसांपूर्वी मुंबईत आलेल्या मारेला डिस्कव्हरी’ या विदेशी जहाजावरील ६६ गोमंतकीय खलाशांना केंद्रिय गृहमंत्रालयाने बुधवारी परवानगी दिल्याने सर्व ६६ खलाशी काल तेथे उतरल्याचे उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. मारेला हे जहाज आज गुरूवारी युरोपला रवााना होणा असून त्यापूर्वीच सर्व सोपस्कार पूर्ण करून या जहाजावरील गोमंतकीयांना राज्यात परत आणावे अन्यथा त्यांना ... Read More »

डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला हा अजामीनपत्र गुन्हा —

>> केंद्रिय मंत्री जावडेकर यांचा इशारा   यापुढे डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले झाल्यास तो अजामीनपात्र गुन्हा असेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे असेही श्री. जावडेकर यांनी स्पष्ट केले. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाच्या लढाईत ... Read More »

उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ ३ मे ते ७ जूनपर्यंत कार्यरत

बई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ ३ मे ते ७ जून दरम्यानच्या उन्हाळी सुट्टीत कार्यरत राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सलग्न खंडपीठे उन्हाळी सुट्टीत कार्यरत राहणार असल्याची माहिती रजिस्ट्रार जनरल एस. बी. अगरवाल यांनी एका परिपत्रकातून दिली आहे. गोवा खंडपीठाचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २.३० पर्यतअर्ध्या तासाच्या सुट्टीसह चालणार आहे. खंडपीठातील ज्येष्ठ न्यायाधीश आपले सहकारी व बार मेंबर यांच्याशी ... Read More »

सरकारी कर्मचार्‍यांसाठी कदंबची मर्यादित बससेवा

  गेल्या दोन दिवसांपासून सरकारी कार्यालये सुरू झालेली असल्यामुळे या सरकारी कर्मचार्‍यांसाठी विविध ठिकाणाहून राजधानी पणजीत ने-आण करण्यासाठी कदंबने मर्यादित वेळेसाठी आपली बससेवा सुरू केली आहे. मडगाव कदंब बसस्थानकावरून सकाळी ८ पासून बससेवा सुरू होत असून ती ९.३० पर्यंत सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पणजीत जाणार्‍या कर्मचार्‍यांसाठी ही बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. नंतर मधल्या ... Read More »

भाजपच्या मंत्र्यांकडून कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग ः कॉंग्रेस

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो अन्य काही मंत्री कोरोनासंदर्भातील मार्गदर्शन तत्वांचा अवलंब करत नसल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला. काल बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंत, आरोग्यमंत्री राणे, मंत्री लोबो हे जेव्हा मंत्रालयातून बाहेर आले तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्क नव्हते. तसेच सरकारी गाडीतून जाताना त्यांनी सामाजिक अंतर पाळले नाही असे कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ ... Read More »

मांडवीतील सहा कॅसिनोंना ६ महिन्यांची मुदतवाढ

  >> मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडवी नदीतील सहा कॅसिनोना आणखीन ६ महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. हे सहा कॅसिनो येत्या सप्टेंबर २०२० किंवा पर्यायी जागेबाबत निर्णय होईपर्यत तिथेच राहणार आहेत. राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षापासून मांडवीतील कॅसिनोंना दर सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जात आहे. मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्याची मागणी केली जात आहे. तर, सरकारकडून ... Read More »

मुरगाव बंदरात खलाशांच्या तपासणीसाठी वैद्यकीय सुविधा उभारणे सुरू ः आरोग्यमंत्री

विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना मुरगाव बंदरातून राज्यात प्रवेश देण्यात येणार असल्याने मुरगाव बंदरात खलाशांच्या कोविड १९ तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उभारण्याच्या कामाला  जोरात सुरुवात करण्यात आले आहे. मुरगाव बंदरात नमुन्यांची जलदगतीने तपासणीसाठी खास केंद्र सुरू केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. विदेशातून येणारे सहा ते सात हजार खलाशी हे राज्यासाठी मोठा आव्हानाचा विषय आहेत. खलाशांच्या ... Read More »