Daily Archives: April 22, 2020

(अग्रलेख) निर्धास्तता नकोच

  कोरोनाचा देशभरातील वाढता आलेख अजून खाली येऊ शकलेला नसला, तरी रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता वाढत चालला आहे ही दिलासादायक बाब आहे. गोव्यासह अनेक राज्यांचा कोरोना रुग्णांचा आलेख खाली आला असल्याचे हे निदर्शक आहे. अर्थात, संशयित रुग्णांचे योग्य निदान, त्यांच्या चाचण्यांची संख्या, त्या चाचण्यांची अचूकता अशा अनेक मुद्द्यांबाबत अजूनही साशंकता निश्‍चित आहे. राजस्थान सरकारने रॅपिड टेस्टमधील त्रुटी सप्रमाण दाखवून ... Read More »

माजी आमदार जितेंद्र देशप्रभूंचे निधन –

>> न्युमोनियामुळे गोमेकॉत सुरू होते उपचार   पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जितेंद्र रघुराज देशप्रभू (६४) यांचे काल न्यूमोनियामुळे निधन झाले. प्रकृती बिघडल्याने काल संध्याकाळी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोनासाठीही तपासणी करण्यात आली होती. पण त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता हे अहवालातून सिद्ध झाल्याचे गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर ... Read More »

केंद्रिय वित्त आयोगाकडून राज्याला १७७ कोटी मंजूर

  केंद्र सरकारच्या वित्त विभागाने केंद्रीय करातून राज्याला मिळणार्‍या अर्थसाहाय्याचा एक भाग म्हणून १७७.७१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाने एप्रिल महिन्याचा वाटा म्हणून ही रक्कम मंजूर केली आहे. केंद्रीय कराच्या माध्यमातून राज्याला या वर्षी अंदाजे ३०२६ कोटी रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी सुमारे २४८० कोटी रुपये प्राप्त झाले होते, अशी ... Read More »

राज्यात ८३ दिवसांत ९०१ नमुन्यांची तपासणी

  कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात ८३ दिवसात ९०१ नमुन्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. राज्यात ३ एप्रिलनंतर कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तसेच, सातही कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. २९ जानेवारी २०२० पासून आत्तापर्यंतच्या काळात गोमेकॉच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित म्हणून १६५ जणांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले आहेत. गोमेकॉत प्रयोगशाळा गोमेकॉमध्ये कोविड तपासणी करणारी प्रयोगशाळा सुरू करण्यात ... Read More »

गोमंतकीय खलाशांना घेऊन मुंबईला आलेली बोट निर्णयाविना आज निघणार

>> आज तोडगा निघण्याची शक्यता ः मुख्यमंत्री   राज्य सरकार खलाशांच्या प्रश्‍नाबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संपर्कात आहे. खलाशांच्या प्रश्‍नावर आज बुधवारी दुपारपर्यंत निर्णय होईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. मुंबई बंदरात असलेल्या मारेला डिस्कवरी या बोटीवरील ६५ गोमंतकीय खलाशांना उतरण्यास मान्यता देण्याचा विषय राज्यात मुख्य चर्चेला मुद्दा काल बनला होता. ही मारेला बोट बुधवार २२ एप्रिलला पुन्हा ... Read More »

राज्यातील तपासणी नाक्यांवर देखरेखीसाठी मोबाईल ऍप

राज्यातील पत्रादेवी, दोडामार्ग, केरी- सत्तरी, मोले आणि पोळे-काणकोण या पाच प्रमुख तपासणी नाक्यांवर परराज्यांतून जीवनावश्यक वस्तू घेऊन प्रवेश करणार्‍या वाहनांवर देखरेख ठेवण्यासाठी अखेर मोबाईल ऍपचा वापर करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. राज्याच्या शेजारील बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तपासणी नाक्यावरील वाहन तपासणी कडक करण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान ... Read More »

३३ टक्के कर्मचार्‍यांना घेऊन शालेय कामकाज चालवा

>> शिक्षण संचालकांचा आदेश राज्यातील सरकारी, अनुदानित, विना अनुदानित शाळांच्या प्रमुखांनी केवळ ३३ टक्के कर्मचारी घेऊन काम करावे, असा आदेश शिक्षण संचालकांनी जारी केला आहे. हा आदेश ३ मे २०२० पर्यत लागू राहणार आहे. या काळात कर्मचार्‍यांना आलटून पालटून कामावर बोलावण्याची सूचना करण्यात आली आहे. शाळेत न येणार्‍या कर्मचार्‍यांना घरातून कामकाज करण्याची सूचना करावी असेही कळवण्यात आले आहे. शिक्षण खात्याने ... Read More »

देशात कोरोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर

  >> २४ तासांत ४७ तर एकूण ५९० बळी देशभरात अद्यापही कोरोनाचा प्रसार वाढतच असून दरम्यान, मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने ४७ जणांचा बळी घेतला असून, १ हजार ३३६ नवे बाधित रुग्ण आढळले. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाची रुग्ण संख्या १८ हजार ३३६ वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १४ हजार ७५९, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले ३ हजार ... Read More »

एकाच दिवसात ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे

देशात आत्तापर्यंत १८६०१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणार्‍या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. सोमवारी एकाच दिवसात तब्बल ७०५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेल्याचे दिलासादायक चित्र आहे. हा देशातील आत्तापर्यंतच सर्वात मोठा आकडा आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ३२५२ जणांवर यशस्वी उपचार झाले आहेत. १५ एप्रिल रोजी १८३ रुग्ण बरे झाले होते. तर दि. १६ ... Read More »