Daily Archives: April 21, 2020

(अग्रलेख) संकट कायम

कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील निर्वाणीच्या टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होण्याचे प्रमाण आता अर्ध्याने खाली आले असल्याचे काल सरकारने जाहीर केले. म्हणजे दर साडे तीन दिवसांत ही रुग्णसंख्या जी गेले काही दिवस दुप्पट होत चालली होती, ते प्रमाण आता साडे सात दिवसांपर्यंत खाली आले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु कोरोना रुग्णांचा चढता आलेख अजूनही आपल्याला रोखता आलेला नाही ... Read More »

देशातील ३३९ जिल्हे कोरोनामुक्त 

>>  बाधितांची संख्या १७ हजारांवर तर ५४३ बळी काल सोमवारी सकाळपर्यंत भारतातील कोरोनामुक्त जिल्ह्यांची संख्या ३३९ झाली असल्यामुळे या भागांत लॉकडाऊनमधून थोड्याफार प्रमाणात सशर्त सवलत देण्यात आली आहे. देशातील एकूण ७४७ जिल्ह्यांपैकी ४०८ जिल्ह्यांत कोरोनासंक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. दरम्यान,   देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १७,२६५ पर्यंत पोहचला असून ५४३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, दिलासादायक म्हणजे सध्याच्या घडीला देशातील ... Read More »

सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहती सुरू

  >> लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर रस्ते गजबजले लॉकडाऊनच्या नियमात थोडी शिथिलता दिल्यानंतर राज्यातील सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहतीतील उद्योग सुरू करण्यात आल्याने राजधानी पणजीसह पर्वरी परिसरातील प्रमुख रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांच्या संख्येत काल एकदम वाढ झाली. साधारण महिनाभर वाहनांविना सुनसुने बनलेले रस्ते पुन्हा एकदा दुचाकी व चार चाकी वाहनांनी गजबजू लागले आहेत. सरकारी, खासगी आस्थापनात काम करणारे कामावर जाण्यासाठी खासगी वाहनांचा ... Read More »

खलाशांना आणण्याबाबत केंद्राकडून आज आदेश येण्याची शक्यता ः लोबो

  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विदेशात असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न चालविले आहेत. खलाशांना परत आणण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाकडून आज मंगळवारपर्यत आदेश जारी केला जाऊ शकतो, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. गोव्याची सागरी सीमा सुरक्षित आहे. गोव्याच्या सागर हद्दीत बाहेरील जहाजांना प्रवेश दिला जात नाही. देश कोरोना मुक्त झाल्यानंतर पर्यटन व्यवसाय ... Read More »

खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत

  >> खनिज निर्यातदार संघटनेची मागणी कोरोना आपत्तीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय बंद पडलेला असल्यामुळे आता तरी केंद्राने राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी पावले उचलावीत अशी मागणी गोवा खनिज निर्यातदार संघटनेने केली आहे. राज्यातील खाण व्यवसाय बंद पडला त्याला १६ मार्च रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. आता कोरोना आपत्तीमुळे राज्यातील पर्यटन व्यवसायही बंद पडल्याने राज्यातील आर्थिक घडी पार विस्कटली आहे. या ... Read More »

तांत्रिक  शिक्षण संस्था ३१ मेपर्यंत बंद

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तांत्रिक शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत येणार्‍या सर्व संस्था ३१ मे २०२० पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश तंात्रिक शिक्षण संचालकांनी २० एप्रिलला जारी केला आहे. तथापि, संस्था प्रमुख किमान कर्मचारी घेऊन आवश्यक कामे करू शकतात. कामाच्या ठिकाणी केंद्र सरकारने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. ... Read More »

कोरोना रुग्ण वाढीचा वेग घसरला

  देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १५५३ नवीन रुग्ण आढळले असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांची देशातील एकूण संख्या १७२६५वर पोहोचली आहे. तर कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग घसरला आहे. लॉकडाऊनपूर्वी ३.४ दिवस इतका होता तो आता ७.५ दिवसांवर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. दरम्यान, २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५९ जिल्हे हे कोरोनामुक्त झाले ... Read More »

पणजी मनपाचे मुख्य मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय ः महापौर

>>  लोकांकडून सामाजिक अंतराचे उल्लंघन   पणजी महानगरपालिकेचे मुख्य मार्केट खरेदीच्या वेळी नागरिकांकडून  सामाजिक अंतराचे पालन केले जात नसल्याने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. महानगरपालिकेचे मार्केट बंद असले तरी नागरिकांना शहरात भाजी विविध ठिकाणी उपलब्ध आहे. यामुळे  नागरिकांची गैरसोय होत नाही. मनपा क्षेत्रात काही जणांकडून विनापरवाना भाजीची विक्री केली ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचे ३ संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याने ३४ जणांना क्वारंटाईन केले आहेत. कोरोना बाधेतून बरे झालेल्या तीन जणांना सात दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, चार जणांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले आहे. गोमेकॉच्या कोरोना विभागात कोरोना संशयित एकू़ण  ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उत्तर ... Read More »

गोवा पोलिसांकडून द्रोनची मदत वरद करमलीने केले हवाई सर्वेक्षण

  सध्या सुरू असलेल्या संपूर्ण संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी द्रोनची मदत घ्यायला सुरवात केली आहे. कुडचडे येथील हौशी द्रोन छायाचित्रकार वरद मारूती करमली यांनी काल मडगाव येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीचे हवाई सर्वेक्षण केले. या परिसराचा नकाशा पोलिसांकडे नव्हता. दोन फुटेजच्या मदतीने आता पोलिसांनी परिसराचा नकाशा बनवला असून त्याप्रमाणे बंदोबस्त ठेवला आहे. खारेबांद, शिरफोडे परिसराचा हवाई सर्वेही करमली यांनी केला आहे. ... Read More »