Daily Archives: April 19, 2020

* ‘लॉकडाऊन’चे दिवस *

  धैर्य, नियोजन आणि कार्याची गुढी – सौ. शुभदा दी. मराठे   लॉकडाऊन- कुलूपबंद. नाव खूपच छान. घरातून सगळे बाहेर जाताना घर कुलूपबंद होते. पण… आता मात्र एकवीस दिवसांसाठी आम्ही घरात कुलूपबंद आहोत. अगदी चौवीस तास! कुणाला भेटणे नाही, येणे-जाणे नाही. रविवार दि. 22 चा कर्फ्यू अगदी स्वेच्छेने, राजीखुशीने पाळला. संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, घंटानादही केला. त्यावेळी ‘बंद’चे एवढे गांभीर्य ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- पानीपतच्या रणमैदानावरील तीन युद्धे

दत्ता भि. नाईक अतिआत्मविश्वास, पूर्वनियोजनाचा अभाव व शत्रू कसा वागू शकतो व फितुरी कशी होऊ शकते याबद्दल धडा शिकवणारी ही तीनही युद्धे आगामी हजार वर्षे तरी भारतीय जनमानस विसरणार नाही.   विभाजनपूर्व महापंजाबचा भाग असलेल्या हरियाणा राज्यात वसलेले पानीपत हे आपल्या देशात युद्धभूमी म्हणून सर्वत्र प्रसिद्धीस पावलेले आहे. सन 1526, 1556 व 1761 मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अशी ... Read More »

-ः वळणवाट ः- डिचोलीचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी पांडुरंग राऊत

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट कष्ट करण्याची ताकद, जिद्द आणि प्रामाणिकपणा जर असेल तर मनात योजलेल्या कार्यात निश्चितच यश संपादन करू शकतो; नि केलेल्या कार्यामुळे जनमानसात निश्चितच आदरभाव निर्माण होऊन केलेल्या कार्याच्या स्मृती जाग्या होत राहतात. – पूर्वार्ध – कष्ट करण्याची ताकद, जिद्द आणि प्रामाणिकपणा जर असेल तर मनात योजलेल्या कार्यात निश्चितच यश संपादन करू शकतो; नि केलेल्या कार्यामुळे जनमानसात निश्चितच ... Read More »

-ः पाथेय ः- द्रष्टे पुरुष विषग्वर्य डॉ. दादा वैद्य

डॉ. सोमनाथ कोमरपंत विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोमंतभूमीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वसंस्कृती, स्वभाषा आणि समाजाच्या सम्यक अंगांनी सुधारणा हे आपल्या आयुष्याचे व्रत मानून अबोल वृत्तीने रचनात्मक कार्य करणार्‍या डॉ. दादा वैद्य यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विसाव्या शतकाच्या प्रारंभी गोमंतभूमीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वसंस्कृती, स्वभाषा आणि समाजाच्या सम्यक अंगांनी सुधारणा हे आपल्या आयुष्याचे व्रत मानून अबोल वृत्तीने रचनात्मक कार्य करणार्‍या द्रष्ट्या ... Read More »

-ः अर्थवेध ः- देश आर्थिक आव्हाने कशी पेलणार?

  शशांक मो. गुळगुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे सध्या रोज 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. पहिल्या 21 दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मुळे अर्थव्यवस्थेचे 8 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, तर सुमारे 70 टक्के कामकाज बंद आहे. ‘कोरोना’ला प्रतिबंध करणे हे एक सर्व सरकारांचे व अन्य संबंधित संस्थांचे प्राधान्यकाम बनले आहे. याशिवाय कोरोनामुळे देशभर आर्थिक प्रश्न उभे राहिले आहेत, राहाणार आहेत, व ही ... Read More »

-ः माणसांचं जग ः- वेडा फुलामॅन

डॉ. जयंती नायक तो ओसरीवरच्या सोप्यावर बसून असायचा. भंयकर दिसायचा. दाढी वाढलेली. केसांची झिपरं अस्ताव्यस्त पसरलेली. छातीवर दाट काळे केस पसरलेले. एखादा चित्रातला राक्षस कसा दिसत होता तो.   त्याचं खरं नाव फ्लावियन असलं पाहिजे. त्या दिवशी बरोबरीच्या मुलांनी त्याचं नाव ‘फुलामॅन’ असं सांगितलं अन् मी ते मानून घेतलं. तसे सगळेच लोक त्याला फुलामॅनच म्हणायचे. मात्र त्या नावापुढे एक विशेषण ... Read More »

-ः अवती-भवती ः- छोटे-मोठे

दत्ताराम प्रभू-साळगावकर मी त्या मुलाची पाठ थोपटली व त्याला शाबासकी दिली. प्रश्नाच्या उत्तराचा व शिक्षणाचा काहीही संबंध नव्हता; असलाच तर निरीक्षण किंवा अनुभवाचा! त्या मुलाकडे निरीक्षणशक्ती होती याचा प्रत्यय आला.   छोटे आणि मोठे म्हणजे वयानं छोटे व वयानं मोठे. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात फरक असतो; अर्थात त्यांच्या वयोमानानुसार. छोट्यांचा मेंदू परिपक्व नसतो, मोठ्यांचा असतो असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. छोट्यांचं बोलणं, ... Read More »

-ः बंध रेशमाचे ः- दीपज्योतिर्नमोऽस्तुते!

मीना समुद्र मानवी जीवनज्योतीचे अखंडत्व राखण्यासाठी, ती सुरक्षित राखण्यासाठी दीपज्योतीलाच प्रार्थना करूया- ‘शुभंकरोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।’   य जीवनाचं अविभाज्य अंग. अगदी बारशाच्या (नामकरणविधी) तबकातल्या निरांजनापासून तो माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या बाराव्यासाठी ठेवण्यात येणार्‍या पणतीपर्यंत माणसाला दिव्याची संगतसोबत असते. किंबहुना मातेच्या गर्भात नवजन्माचं बीज अंकुरू लागतं ते ईश्वरी कृपेच्या प्राणज्योतीमुळेच! अशी आपली धारणा आणि श्रद्धा आहे. त्यामुळेच घरात ... Read More »

-ः खुले मैदान ः- ‘कोरोना’चा क्रीडाविश्वालाही दणका!

सुधाकर रामचंद्र नाईक कोरोनाचा क्रीडाविश्वालाही ‘न भूतो….’ फटका बसलेला आहे. जागतिक क्रीडास्पर्धांची वेळापत्रके पूर्णतया विस्कटली आहेत. क्रीडाविश्वातील मानबिंदू मानली जाणारी ऑलिंपिक स्पर्धा तसेच भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीग स्पर्धाही सध्या तरी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकलेली आहे.   ‘कोरोना व्हायरस’च्या महामारीमुळे जगभरात हाहाकार माजला असून हजारो लोक मृत्यूच्या खाईत लोटले गेले आहेत. बहुसंख्य प्रगत तसेच नवप्रगत देशांना या जीवघेण्या विषाणूच्या ... Read More »