Daily Archives: April 18, 2020

(अग्रलेख) म्हापसा अर्बनला तडाखा

म्हापसा अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्दबातल करून भारतीय रिझर्व्ह  बँकेने गोव्याच्या या एकेकाळच्या प्रतिष्ठित बँकेला निर्वाणीचा तडाखा दिला आहे. म्हापसा अर्बनच्या प्रणेत्यांनीच आपल्या मनमानी आणि बेशिस्त कारभाराने या बँकेला हळूहळू रसातळाला नेले. राज्य सरकारने मधल्या काळात प्रशासक नेमून बँक सावरण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु त्यातून काही साध्य झाले नाही. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने वारंवार विलीनीकरणाची संधी देऊनही त्यांचा लाभ बँकेच्या संचालक ... Read More »

राज्यातील उद्योग सुरू करण्यास २० पासून मान्यता

>> मुख्यमंत्री ः कोविड १९ मार्गदर्शक सूचनांचे पालन कंपन्यांना बंधनकारक राज्यातील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्या येत्या सोमवार २० एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात मान्यता दिली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीतील आयडीसीच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून उद्योगांना मान्यता दिली जाणार आहे. केंद्र सरकारच्या कोविड १९  मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे कंपन्यांना बंधनकारक आहे. तसेच उद्योगांना बाहेरू कामगार आणायला मान्यता दिली जाणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद ... Read More »

गोमेकॉत एक नवीन कोरोना संशयित दाखल

बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलमधील कोरोना विभागात संशयित एका रुग्णाला काल दाखल करण्यात आले. या विभागात ४ संशयितांवर उपचार सुरू आहेत. तर, मडगाव येथील हॉस्पिटलमध्ये १ कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या १११ नमुन्यांपैकी ५६ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली असून सर्व ५६  नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. सरकारी क्वारंटाईन सुविधेमध्ये ५ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारने ... Read More »

म्हापसा अर्बनच्या व्यवस्थापनाचा दावा गुंतवणूकदारांच्या ठेवी सुरक्षित

म्हापसा अर्बन बँकेच्या व्यवस्थापनाने गुंतवणूकदारांच्या ठेवी सुरक्षित असल्याचा दावा एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे काल केला. दरम्यान, म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन आरबीआयने बँकेची मान्यता रद्द केल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची मागणी काल केली. म्हापसा अर्बनचे गोवा राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याची मागणी करण्यात आली  आहे. आरबीआयने एका आदेशाद्वारे म्हापसा अर्बनला ... Read More »

दहावी, बारावी परीक्षांच्या नवीन तारखांबाबत परिपत्रक

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची मार्च मधील पुढे ढकलण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेची नवीन तारीख परीक्षेच्या ५ दिवस आणि दहावीच्या परीक्षेची नवीन  तारीख  परीक्षेच्या १० दिवस अगोदर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव भागिरथ शेट्ये यांनी एका परिपत्रकाद्वारे काल दिली. राज्यातील बारावी आणि दहावीच्या परीक्षा कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांबाबत काही जणांकडून अफवा ... Read More »

पतसंस्था, सोसायट्यांना काम सुरूसाठी २० पासून मुभा

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सहकारी पतसंस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांना २० एप्रिलपासून काम सुरुवात करण्यास मान्यता देणारा आदेश राज्य सहकार निबंधकांनी काल जारी केला. केंद्र सरकारच्या लॉकडाऊन नियमांचे पालन करून पत पुरवठा संस्था, विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांनी काम करावे. या संस्थामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी प्रवास करताना संस्थेचे ओळखपत्र सोबत बाळगावे. कामाच्या ठिकाणी Read More »

भारतातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४०% घट

देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत ४० टक्के एवढी घट झाली असल्याची माहिती काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या दि. १५ ते ३१ मार्च या दरम्यानच्या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आतापर्यंत आढळलेले रुग्ण यांच्या तुलनेत चालू एप्रिल महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाल्याचे स्पष्ट झाल्याचे अगरवाल यांनी सांगितले. दरम्यान, देशात लॉकडाऊन जारी झाल्यास ... Read More »

लॉकडाऊन आणि विद्यार्थी जगत

दत्ता भि. नाईक   सध्याच्या तरुण पिढीच्या आयुष्यभर स्मरणात राहील असा हा कालखंड आहे. ज्यांच्या नोकर्‍या होत्या त्यांच्या चालू राहणार आहेत. पगारी लोकांचे पगार चालू राहणार आहेत. सेवानिवृत्तांना निवृत्तीवेतन मिळणार आहे. परंतु विद्यार्थ्यांचे काय चालू राहणार आहे हे सध्यातरी कोणीही सांगू शकत नाही.   कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसच्या महामारीचे महासंकट आता दिवसेंदिवस भयानकपणे चोहोबाजूंनी वाढताना दिसत आहे. सार्वजनिक स्वच्छतेच्या क्षेत्रात ... Read More »

‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर काय …?

प्रज्वलिता गाडगीळ   आम्ही घरी कोणतेही कार्य करतो… वाढदिवस, साखरपुडा, केळवण, मुंज, लग्न, पूजा, अगदी धुमधडाक्यात करतो, मिळवतो काय? आशीर्वाद? अन्नदानाचं पुण्य? मला वाटतं हे सर्व कार्य आपल्यापुरतं मर्यादेतच करावं. अनाठायी खर्च टाळावा.   आज आपण अनेक दिवसांपासून म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून एक कोरोना विषय चघळतोय. डोळे उघडताच नवनवीन बातम्या कोरोनाविषयी ऐकू येतात. काळजात धडकीच भरते. मग मनात, स्वप्नात, डोक्यात, ... Read More »

पसरतोय कोरोना, काळजी घ्या ना!

कु. समीक्षा नागेश शिरोडकर (मये- डिचोली)   शेवटी सांगते आम्ही जर घरी थांबलो, स्वतःबरोबर दुसर्‍यांचाही विचार केला तरच आम्ही आनंदाने, उत्साहाने जगू शकू व  आपल्याला पुढचे दिवस पाहायला मिळतील.    कोरोना हा संसर्गजन्य रोग दिसामाजी पसरून त्याने लोकांना हतबल करून टाकले आहे. सर्वप्रथम या व्हायरसचे प्रमाण चीन देशातील वुहान भागात आढळले. त्यानंतर इटाली, ङ्ग्रान्स, स्पेन, ब्रिटन या देशात कोरोना वेगाने ... Read More »