Daily Archives: April 17, 2020

देशात कोरोना रुग्णांची संख्या १३ हजाराजवळ

>> ४२० रुग्णांचा मृत्यू तर १५१४ जणांना डिस्चार्ज देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ हजार ७५९ एवढी झाली आहे. १५१४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत देशभरात कोरोनामुळे ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजण्यात येत असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेशीही चर्चा झाल्याचे  केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. ... Read More »

चीनकडून भारताला साडेसहा लाख किट्‌स

कोरोनाविरोधात लढण्यासाठी चीनने भारताला वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरू केला असून गुरुवारी चीनने भारतासाठी ६ लाख ५० हजार मेडिकल किट्स पाठवले आहेत. त्याशिवाय कोरोनाची चाचणी करण्यासाठीचे किट्स आगामी १५ दिवसांत भारतात दाखल होणार आहे. चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली. रॅपिड ऍण्टी बॉडी टेस्ट्स आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्ससह एकूण साडे सहा लाख किट्स ग्वांग्झू विमानतळावरून भारतासाठी रवाना करण्यात ... Read More »

आरोग्य सर्वेक्षणात ४.३९ लाख नागरिकांच्या नोंदी ः मुख्यमंत्री

राज्यातील तीन दिवसांच्या सामुदायिक आरोग्य सर्वेक्षणात ४ लाख ३९ हजार ६६६ एवढ्या नोंदी झाल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वेक्षणाला सहकार्य केलेल्या नागरिकांचे आभार मानले. राज्यातील कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाईला बळकटी देण्यासाठी हे आरोग्य सर्वेक्षण लाभदायक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी व्यक्ती केली. कोविंड-१९ च्या पार्श्‍वभूमीवरील राज्यातील नागरिकांच्या आरोग्य परिस्थिची आढावा घेण्यासाठी  राज्य सरकारने घरोघरी जाऊन ... Read More »

गोव्यातील जीसीईटी प्रवेश परीक्षा लांबणीवर

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाने  नियोजित गोवा समान प्रवेश परीक्षा (जीसीईटी) पुढे ढकलली आहे. आता ही जीसीईटी परीक्षा जून महिना किंवा नंतर घेतली जाणार आहे. या परीक्षेची तारीख १० दिवस अगोदर जाहीर केली जाणार आहे. गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाने दि. ५ आणि ६ मे २०२० रोजी जीसीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. परंतु, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर ही परीक्षा घेणे शक्य ... Read More »

व्हॅट वाढवल्यामुळे पेट्रोल दरात वाढ

  राज्य सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्याने पेट्रोलच्या दरात वाढ होणार  आहे. राज्य सरकारने व्हॅट २१ टक्क्यांवरून २५ टक्क्यापर्यत वाढविले आहे. वित्त खात्यने यासंबंधीचा आदेश  जारी केला आहे. व्हॅटमध्ये वाढ करण्यात आल्याने पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २.१४ पैसे एवढी वाढ होणार आहे. राज्यातील पेट्रोलचा दर ६८.५४  रुपये एवढा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. Read More »

काजू, नारळाच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

>> उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांची माहिती राज्य सरकारने काजू, नारळ आणि हळसांदे यांच्या आधारभूत किंमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आधारभूत किंमतीच्या विषयावर चर्चा केली असून त्यांनी आधारभूत किंमत वाढविण्यास सहमती दर्शविली आहे. आता, आधारभूत किंमत वाढीसंबंधीची प्रस्ताव वित्त खात्याकडे पाठविला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात काजूचा ... Read More »

खलाशांना परत आणण्याबाबत दोन दिवसांत तोडगा ः रेजिनाल्ड

>> मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी भेट घेऊन विदेशात जहाजांवर असलेल्या खलाशांना परत आणण्याचा विषयावर चर्चा काल केली. गोमंतकीय खलाशांना परत आणण्याच्या विषयावर दोन दिवसात तोडगा निघेल, असा विश्वास आमदार रेजिनाल्ड  यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. विदेशात असलेल्या गोमंतकीयांना परत आणण्याचा विषयाचे कुणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री ... Read More »

रस्ते व मान्सूनपूर्व कामांना लवकरच सुरूवात

>> बांधकाम मंत्री पाऊसकर यांची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे मान्सूनपूर्व विकास कामे, रस्त्याची दुरुस्तीला सुरुवात केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची सूचना करण्यात आली आहे. ओपा पाणी प्रकल्पात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखण्यासाठी सूचना करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील इतर भागातील पाणी समस्या सोडवण्याकडे लक्ष देण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ... Read More »