Daily Archives: April 14, 2020

(अग्रलेख)- आता पुढे काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत आज मध्यरात्री संपते आहे. त्यामुळे पुढील कृतिकार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान आज सकाळी दहा वाजता दूरचित्रवाणीवरून करणार आहेत. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी झालेल्या व्हिडिओ परिषदेमध्ये बहुतेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा काळ वाढविण्याची विनंती पंतप्रधानांना केलेली आहे आणि काही राज्यांनी तर आधीच या महिन्याअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करून टाकली आहे. लॉकडाऊन वाढवण्यात यावे असे व्यापक ... Read More »

पंतप्रधानांच्या संबोधनानंतर राज्याची पुढील वाटचाल ठरवणार ः मुख्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज देशाला संबोधित होणार्‍या भाषणानंतर केंद्राकडून जाहीर होणार्‍या मार्गदर्शक सूचनानंतर राज्याच्या पुढील वाटचालीची दिशा निश्‍चित केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली. राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आलेले भाग गोव्याच्या नकाशावर सूचित केले जाणार आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या भागाची नागरिकांना जाणीव व्हावी म्हणून नकाशावर सूचित केले जाणार ... Read More »

पंतप्रधान आज देशाला संबोधित करणार

आज मंगळवार दि. १३ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी  देशाला संबोधित करणार आहेत. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दि. २४ मार्चपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी घोषित केला होता. उद्या दि. १४ एप्रिल रोजी लॉकडाऊनचा कालावधी संपणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवलेले आहे मात्र काही राज्ये अजूनही केंद्राच्या ... Read More »

आरोग्य सर्वेक्षणाला राज्यात उत्तम प्रतिसाद

>> सरकारी यंत्रणेद्वारे १५ एप्रिलपर्यंत सर्वेक्षण कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरील राज्यातील सामूदायिक आरोग्य सर्वेक्षणाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला असून १५ एप्रिलपर्यत सर्वेक्षण चालणार आहे. या आरोग्य सर्वेक्षणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. राज्यात कोरोना विषाणूच्या फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून घरोघरी जाऊन सामूदायिक आरोग्य सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील विरोधकांचा आरोग्य सर्वेक्षणाला ... Read More »

महिला स्वयंसेवी गटांच्या मदतीने मास्कची निर्मिती करणार ः राणे

यापुढे अजून बराचकाळ लोकांना घरातून बाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क घालावा लागणार आहे. त्यामुळे मास्कचा राज्यात तुटवडा भासू नये व ते सहज उपलब्ध व्हावेत यासाठी राज्यातील महिला स्वयंसेवी गटांची मदत घेऊन सुमारे २ लाख मास्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले मुरगाव व सत्तरी तालुक्यातील काही महिला स्वयंसेवी गटांना यापूर्वीच मास्कची ऑर्डर देण्यात आलेली असून ते तयार करण्यासाठी ... Read More »

आर्थिक नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापणार ः राणे

कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर राज्याची आर्थिक घडी नीट जाग्यावर आणण्यासाठी कोणती पावले उचलावीत त्याचा अभ्यास करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. ही समिती प्रत्यक्ष निर्णय घेण्यासाठी असेल अशी माहिती मंत्री श्री. राणे यांनी दिली. यापूर्वी काही उद्योगपती व अन्यांचा समावेश असलेली जी समिती स्थापन करण्यात आली होती ... Read More »

सरकारी कार्यालयांचे कामकाज १५ पासून तीन पाळ्यांत सुरू

  राज्यातील सरकारी कार्यालयांचे कामकाज येत्या १५ एप्रिल २०२० पासून पूर्ववत केले जाणार आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के कामगारांना आलटून पालटून कामावर बोलविण्याची सूचना करण्यात आली आहे. कार्यालयातील कामांसाठी कर्मचार्‍यांचे तीन गट, कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर्स, हॅण्ड वॉश, पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची सूचना करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारी खाती वगळता अन्य खात्याचा कारभार ठप्प ... Read More »

लॉकडाऊन ः एकमेव पर्याय

डॉ. संगीता गोडबोले   येणारा काळ कसा असेल याचा अंदाज आत्ताच करता आला नाही तरीही त्या जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणार्‍या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून उद्याची पहाट पहायची असेल तर आत्ता.. लॉकडाऊनचा एकमेव पर्याय आहे यात शंका नाही.   लॉकडाऊन .. बंदिस्त .. आपल्याच घरात .. आता असं म्हणू की .. आपल्या परिघात, जो सद्य परिस्थितीत वाढवणं कठीण आहे आणि तसा ... Read More »

सदीर्र्, खोकला, ताप… आहे?

  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)   ‘घरी आहात ना?  मग स्वस्थ आहात’! कसलीच काळजी करण्याचे कारण नाही. सरकारने घेतलेल्या सर्व नियमांचे फक्त पालन करा. सूर्यास्तानंतर … पुन्हा सूर्य उगवणे… हा निसर्गाचा नियमच आहे. तेव्हा कसलीच चिंता करू नका.   ‘गरमु दुधाने जीभ भाजली की ताकसुद्धा फुंकून प्यायले जाते’ अशी एक म्हण आहे आणि ती काही उगीच नाही… अशीच काहीशी ... Read More »

मनःशांती उपनिषदातून टाळू या निंदा.. घृणा.. कंटाळा

 प्रा. रमेश सप्रे   आपल्याला कधी कधी सार्‍या वस्तूतील ईशत्वाची जाणीव होते पण बर्‍याच वेळी तो ‘भास’ असतो. त्याचा भाव उत्पन्न होऊन त्याचं अखंड भान राहून, तो बोध जर अंतःकरणात बिंबला तर मनःशांती दूर नाही. जीवनमुक्ती अशक्य नाही. यासाठी हवी निरंतर उपासना.. आराधना.. साधना!     सध्या अक्षरशः जगभर कोरोना विषाणूचं जे थैमान आणि हाहाकार सुरू आहे ते पाहिलं तर ... Read More »