Daily Archives: April 12, 2020

-ः वळणवाट ः- शिवोलीचे प्रतिनिधित्व करणारे म्हापसावासी अशोक नाईक-साळगावकर

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट   अ‍ॅड. चंद्रकांत उत्तम चोडणकर यांच्याप्रमाणेच म्हापसानगरी कर्मभूमी बनवून, शिवोली मतदारसंघातून निवडून येऊन विधानसभेत प्रवेश केलेले आणखी एक विधिमंडळ सदस्य म्हणजे श्री. अशोक तुकाराम नाईक-साळगावकर हे होत. त्यांच्याही कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे उचित ठरेल. श्री. अशोक नाईक-साळगावकर यांचा जन्म बार्देस तालुक्यातील शिवोली गावात दि. 19 ऑगस्ट 1943 रोजी झाला. त्यांचे वडील कै. तुकाराम नाईक-साळगावकर हे प्रवासी वाहतूक ... Read More »

-ः खुले मैदान ः- फुटबॉलचा वटवृक्ष कोसळला

सुधाकर रामचंद्र नाईक क्रीडाक्षेत्रातील मान्यवंतासाठी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार मिळविणारे प्रदीपदा हे पहिले फुटबॉलपटू होत. 1961 मध्ये त्यांना हा मान मिळाला आणि नंतर 1990 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले.   भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे प्रमुख साक्षीदार तथा दिग्गज फुटबॉलपटू प्रदीपकुमार ऊर्फ पी. के. बॅनर्जी (83) यांचे नुकतेच दीघर्ं आजाराने निधन झाले. विलक्षण विस्मयकारी पदलालित्य आणि नजाकतदार नैपुण्यकौशल्याने तमाम भारतीय ... Read More »

थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे

डॉ. सोमनाथ कोमरपंत महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य कोणते? निदिध्यास, निरलस वृत्ती, चिकाटी आणि समाजमनस्क वृत्ती. या सर्व गुणांना व्यापून राहिलेला साधेपणा आणि निःस्वार्थी वृत्ती. हे महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांची कीर्तिपताका भारतभर फडकली.   एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सर्व प्रकारची प्रतिकूलता असतानाही काळाच्या मुशीतून अशी काही तेजस्वी माणसे निर्माण झाली की त्यांनी आपल्या देशाची भाग्यरेखा बदलली. राष्ट्रकारण, समाजकारण, ... Read More »

नॉन-बँकिंग वित्तीय संस्थांतर्फे शैक्षणिक कर्ज

शशांक मो. गुळगुळे बँका तसेच नॉन-बँकिंग वित्तीय संस्था मोठ्या रकमांची कर्जे संमत करताना फार सावधानता बाळगतात. भारत सरकारचे विद्यालक्ष्मी हे पोर्टल सिंगल विंडो इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्म म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आता शैक्षणिक कर्जांचे सर्व अर्ज या पोर्टलमार्फत बँकांकडे येतात.   भारतात आयआयटी, अहमदाबाद येथील व्यवस्थापनाचे शिक्षण देणारी संस्था व अन्य काही शैक्षणिक संस्था उपलब्ध असूनही भारतीय विद्यार्थ्यांचा कल उच्चशिक्षण अमेरिका, इंग्लंड ... Read More »

-ः बंध रेशमाचे ः- एका लग्नाची गोष्ट

मीना समुद्र टप्प्याटप्प्याने माणसांचे सुरळीत दैनंदिन जीवनही विस्कळित झाले. पार विस्कटून गेले. त्याला सारेचजण मोठ्या धैर्याने तोंड देत आहेत. आपली सकारात्मक ऊर्जा जपत सगळेच या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात. दोन विवाहेच्छुक व्यक्ती कुठे, कशा भेटतात आणि मग केव्हा, कशा, कुठे रेशिमबंधाने बांधल्या जातात कळत नाही. मनाने जुळलेल्या किंवा जुळवलेल्या या रेशिमगाठी दृढ करण्यासाठी ... Read More »

-ः माणसांचं जग ः-

– डॉ. जयंती नायक …परंतु मनातील ती कळ मात्र तशीच राहिली. मरेपर्यंत तिनं कधी कुणा लहान बाळाचं तोंड बघितलं नाही की त्याला हात लावला नाही. एवढचं कशाला? स्वतःच्या नातवंडांचंसुद्धा तिनं वर्ष होईतोवर तोंड निरखलं नाही… ती मरून पंचवीस वर्षं झाली असतील, परंतु ती मला खूप आठवते. कारण तिची कुचंबणा, तिचं दुःख, तिचं आयुष्य मी बरंच जवळून बघितलं आहे. ती वारली ... Read More »

-ः अवती-भवती ः- प्रोटोकॉल

 – दत्ताराम प्रभू-साळगावकर माझा हुद्दा मुख्य प्रबंधकांच्या हुद्यापेक्षा कमी होता, पण त्यांनी आपल्या बरोबरीचाच कोणी असावा अशी वागणूक दिली. येथे प्रोटोकॉल कडमडला नाही! प्रसंग अगदी साधा, पण चेहरे व मुखवटे दाखवून देणारा! दोन सारखेच प्रसंग, दोन वेगळे अनुभव!   प्रोटोकॉल या इंग्रजी शब्दाचा अर्थ शिष्टाचार पद्धती. ती एक विशिष्ट प्रकारची वागण्याची पद्धत असते. महनीय व्यक्तींचं स्वागत, त्यांचा मानसन्मान या गोष्टी ... Read More »

-ः इतिहासाच्या पाऊलखुणा ः- भारतीय जनता पार्टीची चाळिशी आणि राष्ट्रीय राजकारण

दत्ता भि. नाईक परंतु आज सर्वच भाजपेतर पक्ष हतबल बनलेले आहेत. मुलायमसिंह, लालूप्रसाद यांसारखे घराणेशाहीमध्ये अडकलेले पक्ष, तर शेवटचे आचके खाणारा काँग्रेस पक्ष असे भारतीय राजकारणाचे आजचे चित्र आहे. नुकताच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा चाळिसावा वर्धापनदिन पार पडला. सध्या देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे वर्धापनदिन साजरा करता आला नाही. 1980 या साली भाजपाची स्थापना करण्यात आली. मा. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ... Read More »