Daily Archives: April 11, 2020

टंचाईची भीती

लॉकडाऊनच्या २१ दिवसांपैकी १७ दिवस उलटले, परंतु कोरोनाबाधितांची सतत वाढती संख्या आपल्याला रोखता आलेली नाही. ती रोखण्यासाठी आणखी किमान तीन आठवडे लागू शकतात असे केंद्रीय मंत्री हर्षवर्धन काल म्हणाले. त्यासाठी अर्थातच राज्य सरकारांनी लॉकडाऊनची अत्यंत कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असेल असेही त्यांनी बजावले आहे. लॉकडाऊन असूनही रुग्ण वाढण्याचे कारण ही संपूर्ण संचारबंदी गोव्यासह बहुतेक राज्यांमध्ये नीट पाळली जात नाही हेच ... Read More »

लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविणार?

भारतात दि. १४ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता आणखी दोन आठवड्यांनी वाढविण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दि. २४ मार्च रोजी रात्री मध्यरात्रीपासून पुढील तीन आठवड्यांसाठी (२१ दिवस) देशभरात लॉकडाऊन जाहीर केले होते. आता हे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविले जाणार असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. वाढीव लॉकडाऊनची मुदत ३० एप्रिल रोजी ... Read More »

कोरोनाबाधितांच्या संख्या वाढीमुळे चिंता

>> केंद्रीय आरोग्य मंत्रालय ः कोरोना बळी १९९ भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत बरीच वाढ होत असल्याने ती चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल स्पष्ट केले. कालच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट करण्यात आली. गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३३ जणांचा मृत्यू झाला असून नवीन कोरोना पॉजिटिव्ह ठरलेल्यांची कालची संख्या ६७८ एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल ... Read More »

कोरोना ः गोमेकॉत नवीन ४ रुग्ण दाखल

बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना वॉर्डात कोरोना संशयित आणखी ४ रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून तेथे १० संशयितांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने आणखी ५६ जणांना घरी निगराणीखाली ठेवले असून घरी निगराणीखालील नागरिकांची संख्या १४२८ एवढी झाली आहे. गोमेकॉच्या कोरोना वॉर्डातून १० नमुने तपासणीसाठी कोविड प्रयोगशाळेत पाठविले आहेत. प्रयोगशाळेतून अहवाल जाहीर करण्यात आले असून सर्व २३ अहवाल नकारात्मक आहेत. ... Read More »

लॉकडाऊनचा भातशेती कापणीवर परिणाम

>> केंद्रीय कृषी मंत्र्यांना कळेकरांनी दिली माहिती लॉकडाऊनमुळे राज्यातील खरीप हंगामातील भातशेतीच्या कापणीवर परिणाम झाला असल्याची माहिती कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल केंद्रीय कृषी मंत्र्यांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून त्यांना दिली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काल कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील कृषीमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करुन सर्व राज्यातील शेती व पिकासंबंधीची माहिती मिळवली. यावेळी आपण तोमर यांना सध्या गोव्यात भातशेतीची कापणी ... Read More »

विदेशी जहाजावरील एका गोमंतकीय खलाशाचा मृत्यू

जहाजावर अडकलेल्या गोव्याच्या खलाशांपैकी मार्ले-बोर्डा-मडगांव येथील ग्लेन पेरैरा (वय ३३) याचा काल मृत्यू झाला. तो स्पेनमधील कॉस्ता व्हिक्टोरिया या जहाजावर काम करीत होता. त्याचा मृत्यू कोरोनामुळे की अन्य कारणामुळे हे समजू शकले नाही. मृत्यूच्या आदल्या दिवशी आपल्या कुटुबियांशी बोलताना सर्दीचा त्रास होत असल्याचे त्याने सांगितले होते. त्याच्या पश्चात आई, भाऊ व बहिण असा परिवार आहे. सरदेसाईंची सरकारवर टीका सरकारचे सर्व ... Read More »

सरकारचा आरोग्य सर्वेक्षणाचा निर्णय मागे घेण्यासाठी राज्यपालांना साकडे

>>  गोवा फॉरवर्डतर्फे आमदार सरदेसाईंचे निवेदन गोवा फॉरवर्ड पक्षाने काल राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलेल्या एका निवेदनातून गोवा सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील लोकांची मदत न घेता (डॉक्टर, परिचारिका आदी) घरोघरी बिगर वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना कोरोनासाठीचे सर्वेक्षण करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो त्यांना तात्काळ मागे घेण्याची सूचना करावी अशी मागणी केली आहे. या सर्वेक्षणामुळे लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली ... Read More »

राज्यात ठिकठिकाणी वार्‍यासह पाऊस ः पडझडीमुळे नुकसान

राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागात वादळी वारा, गडगडाटासह अवकाळी  पाऊस काल संध्याकाळी कोसळल्याने धांदल उडाली. सावईवेरे परिसरात गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू झाल्याने गैरसोय झाली. पावसामुळे गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून लोकांना दिलासा मिळाला. पणजी हवामान विभागाने  सांगे, धारबांदोडा, सत्तरी तालुक्यातील काही भागात जोरदार वार्‍यासह पाऊस कोसळण्याचा इशारा दिला होता. धारबांदोडा, फोंडा तालुक्यात वादळी वारा आणि पावसाचा मोठा ... Read More »

पंजाबात १ मे पर्यंत लॉकडाऊन

ओडिशा पाठोपाठ पंजाब सरकारनेही काल राज्यात लॉक डाऊनची मुदत १ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा याविषयी घोषणा केली. विविध तज्ज्ञांनी कोरोना विषाणूचा फैलाव भयानक व भीतीयुक्त असा होण्याची शक्यता व्यक्त केल्याने अशा संभाव्य स्थितीचा सामना करण्यासाठी आपल्या सरकारची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या लॉकडाऊनमधून केवळ रबी पीक कापणीसाठी शेतकर्‍यांना ... Read More »

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथील राजभवनावर जाऊन राज्यपाल मलिक यांची काल संध्याकाळी भेट घेतली. याभेटीबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या भेटीत  राज्यातील कोरोना विषाणू रोखण्यासंबंधी उपाय योजनांबाबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. सरकारच्या कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवरील घरोघरी जाऊन सामुदायिक आरोग्य सर्वेक्षणाला कॉँग्रेस, गोवा फॉरवर्ड यांनी विरोध दर्शविला असून आरोग्य सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. विदेशातील जहाजांवरील ... Read More »