Daily Archives: April 9, 2020

लॉकडाऊन मागे न घेण्याचे पंतप्रधानांकडून संकेत

>> संसदेतील विविध नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या संकटप्रश्‍नी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या देशभरात लागू केलेले लॉकडाऊन एकाच वेळी मागे घेतले जाणार नसल्याचे संकेत दिले अशी माहिती बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी दिली. लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली ... Read More »

नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून निर्णय

>> मुख्यमंत्री ः लॉकडाऊनबाबत मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांकडून पत्रकार परिषदेत माहिती   राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी लॉकडाऊननंतरच्या वाटचालीबाबत विविध सूचना काल मांडल्या आहेत. मंत्र्यानी लॉकआऊटचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याची शिफारस केली आहे. तथापि, राज्यातील नागरिकांच्या आरोग्य हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्य सरकारच्या लॉकडाऊननंतरच्या पुढील वाटचालीबाबत सूचना प्रथम कळविण्यात येणार आहेत. त्यानंतर १३ एप्रिल ... Read More »

लॉकडाऊन वाढविण्याची बहुतेक मंत्र्यांची सूचना

>> मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी ऐकल्या मंत्र्यांच्या सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन येत्या ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्याची सूचना बहुतांश मंत्र्यांनी काल केली. तसेच राज्याच्या बंद करण्यात आलेल्या सीमा खुल्या करू नये संचारबंदीचा आदेश आणखी काही महिने कायम ठेवण्याची सूचना मंत्र्यांनी केली. लॉकडाऊननंतरच्या वाटचालीवर विचारविनिमय करण्यासाठी खास मंत्रिमंडळाची बैठक काल घेण्यात ... Read More »

राज्यात मुबलक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध ः गावडे

राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक  साठा आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे  काही दिवस समस्यांना तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवांशी  चर्चा केल्यानंतर जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरू झाल्याने प्रश्‍न सुटला आहे. राज्यातील घाऊक व्यापार्‍यांशी जीवनावश्यक वस्तूबाबत चर्चा केली जात आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ, डाळ, साखर उपलब्ध करण्यात आली आहे, असे नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे ... Read More »

लॉकडाऊनमध्येही मुरगाव बंदरातून आमोण्यात होतेय कोळसा वाहतूक!

>> कॉंग्रेसची टीका; राज्यपालांना पत्र भारताबरोबरच गोव्यातही लॉकडाऊन असताना मुरगाव बंदरावरून आमोणे येथे जी कोळसा वाहतूक करण्यात आली त्याला कॉंग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा हा भंग असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. यासंबंधी कॉंग्रेस पक्षाने गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांना लिहिलेल्या पत्रातून हा कोळसा ४ एप्रिल २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेतून गोव्यात आला होता. असे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात ... Read More »

विदेशातील खलाशांबाबत निर्णय १४ एप्रिलपर्यंत शक्य ः लोबो

विदेशी जहाजांवर काम करणार्‍या सुमारे ८ ते १० हजार गोमंतकीयांना कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात परत आणण्यासाठीचा निर्णय केंद्र सरकार १४ एप्रिलपर्यंत घेणार असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली. त्यामुळे पंतप्रधान वरील प्रकरणी काय निर्णय घेतात ते विदेशी जहाजांवर अडकून पडलेल्या या गोमंतकीयांना व त्यांच्या कुटुंबियांना १४ एप्रिलनंतरच कळू शकणार असल्याचे लोबो म्हणाले. वरील प्रकरणी आपण १४ ... Read More »

गोवा विद्यापीठाच्या परीक्षा १ जूनपासून सुरू होणार

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाऊनमुळे  गोवा विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये दुरूस्ती केली असून १ जून २०२० पासून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ ला १६ जुलै २०२० पासून प्रारंभ होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विद्यापीठाचे कुलगुरू व इतर अधिकार्‍यांशी परीक्षा व आगामी शैक्षणिक वर्षाच्या विषयावर मंगळवारी चर्चा केली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिव प्रा. वाय. व्ही. ... Read More »