Daily Archives: April 8, 2020

लॉकडाऊननंतरच्या वाटचालीवर आज मंत्रिमंडळाची होणार चर्चा

राज्य मंत्रिमंडळाच्या आज बुधवारी सकाळी होणार्‍या बैठकीत लॉकडाऊन नंतरच्या राज्याच्या वाटचालीबाबत मंत्र्यांच्या सूचना जाणून घेतल्या जाणार आहेत. चर्चेनंतर महत्वपूर्ण सूचना केंद्राला सादर केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. गोवा विद्यापीठाच्या परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार  आहेत. गोवा विद्यापीठाकडून परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाणार आहे.  गोवा विद्यापीठाचे कुलगुरू,  अधिकारी ... Read More »

गोमेकॉत ५ नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल

बांबोळी येथील गोमेकॉ हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ५  रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून कोरोना वॉर्डात कोरोना १८  संशयित  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत  ४८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. अहवाल जाहीर करण्यात आलेले नाहीत. आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी १८ जणांनी काल नोंदणी केली आहे. घरी विलगीकरणासाठी नोंदणी केलेल्यांची एकूण संख्या १२८०  वर पोहोचली  आहे. कोरोना संशयितांच्या ... Read More »

१५ संशयित रुग्णांचा अहवाल नकारात्मक

बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात मंगळवारी ज्या १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल हाती आलेला असून त्यापैकी एकालाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले असल्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. मंगळवारी या १५ संशयित कोरोना रुग्णांचे नमुने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाल्याने राज्यातील कोरोना ... Read More »

कोकण रेल्वेचे १५ एप्रिलपासून आरक्षण सुरू; गोव्यासाठी चिंता

केंद्र सरकारने देशभरात लागू केलेले २१ दिवसांचे लॉकडाऊन १४ रोजी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वेने १५ एप्रिलपासूनचे आरक्षण सुरू केले आहे. या बुकिंगनुसार १५ एप्रिलपासून कोकण रेल्वेची सेवा सुरू झाली तर गोव्यासाठी तो मोठा चिंतेचा विषय ठरणार आहे. गोवा हे देशातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळ असून उन्हाळ्यात दरवर्षी गोव्यात देशी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे गोव्यात येत असतात. कोरोना आपत्तीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या ... Read More »

विदेशातील गोमंतकीय खलाशांना आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न

विदेशी जहाजांवर काम करणार्‍या सुमारे ८ ते १० हजार गोमंतकीयांना कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असल्याची माहिती काल केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. विदेशातून सध्या भारतात विमाने येत नसून या पार्श्‍वभूमीवर या गोमंतकीयांना परत आणण्यासाठी विशेष विमाने पाठवावी लागणार आहेत. हे ८ ते १० हजार गोमंतकीय एकाच देशात काम करीत नसून ते वेगवेगळ्या ... Read More »

देशातील लॉक डाऊन टप्प्याटप्प्याने मागे घेण्याची आयसीएमआरची योजना सादर

केंद्र सरकारने कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी देशात लागू केलेले लॉक डाऊन २१ दिवसांनंतर येत्या दि.१४ रोजी संपुष्टात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर देशातील लॉक डाऊन टप्प्या-टप्प्याने कसे मागे घेता येईल याचा सर्वंकष आराखडा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला काल सादर केला. आयसीएमआरने सादर केलेल्या या आराखड्यात कोरोनाग्रस्त भागांतील विद्यमान स्थिती आणि पुढील संकटाला तोंड देण्याची ... Read More »

कोरोना ः घरी निगराणीखालील व्यक्तींची संख्या १२६२ वर

राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर घरी निगराणीखालील लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील दोन दिवसात २७० लोकांना घरी निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.  राज्यात घरी निगराणीखाली ठेवलेल्या लोकांची संख्या १२६२ वर पोहोचली आहे. तसेच  सरकारी निगराणीखाली १९८ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. राज्यात आत्तापर्यंत ७ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून परदेशातून आलेल्या ६ व्यक्तीना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ... Read More »

ईडीसीकडून मुख्यमंत्री कोविड निधीला १ कोटी रु.

राज्य सरकारने कोविड-१९ अंतर्गत सुरू केलेल्या मुख्यमंत्री कोविड निधीसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. आर्थिक विकास महामंडळाने (ईडीसी) या निधीसाठी १ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे १ कोटी रुपयांचा धनादेश काल सुपूर्द केला. राज्याला कोविड १९ विरोधात लढाईसाठी मोठ्या प्रमाणात साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. त्यामुळे ... Read More »