Daily Archives: April 7, 2020

कित्ता गिरवावा

एखाद्या गोष्टीची सुरूवात जेव्हा नेता स्वतःपासून करतो, तेव्हा त्याच्या अनुयायांपर्यंत त्यातून योग्य तो संदेश जात असतो. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या स्वतःच्या व आपल्या मंत्रिमंडळ सहकार्‍यांच्या आणि खासदारांच्या वेतनामध्ये पुढील वर्षभर तब्बल तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेऊन एक आदर्शवत् आणि अनुकरणीय असे पाऊल उचलले आहे. आता राज्याराज्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी आणि आमदार मंडळी यांनी देखील पुढील ... Read More »

खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात

>> केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय ः वर्षभरासाठी कपात; खासदार निधीही खंडीत खासदारांच्या वेतन, पेंशन व भत्त्यांमध्ये ३० टक्के कपात करणार्‍या अध्यादेशाला काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक घेण्यात आली व त्यात वरील अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. याद्वारे संकलीत होणारा ... Read More »

राज्यात १३ एप्रिलपासून घरोघरी आरोग्य सर्वेक्षण

>>  मुख्यमंत्री सावंत ः तीन दिवसांच्या सर्वेक्षणास सहकार्याचे नागरिकांना आवाहन कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर राज्यात येत्या १३ ते १५ एप्रिल २०२० दरम्यान  तीन दिवस घरोघरी जाऊन सामाजिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या आरोग्य सर्वेक्षणाच्या वेळी नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी येणार्‍या सरकारी पथकाला कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याबाबत योग्य माहिती देऊन राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद ... Read More »

सर्व आमदारांनी कोविड निधीला महिन्याचे वेतन द्यावे ः सुदिन

गोव्यातील चाळीसही आमदारांनी तसेच सर्व सरकारी अधिकार्‍यांनी आपले एका महिन्याचे वेतन (सर्व भत्त्यांसह) पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोव्हिड-१९ मदत निधीसाठी द्यावे, अशी मागणी काल मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली. त्यापैकी ५० टक्के वेतन हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कोव्हिड-१० मदत निधीसाठी तर उर्वरीत ५० टक्के हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कोव्हिड निधीसाठी द्यावे, ... Read More »

मडगावच्या फकीरबांध भागात शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश

फकीरबांध येथील कोरोनावरून दोन गटांत झालेल्या भांडणातून अशांतता पसरली होती. कालपासून पुन्हा तेथे शांतता निर्माण करण्यात मडगाव पोलिसाना यश आले. शेजार्‍याला कोरोनाची बाधा झाल्याचा संशय व्यक्त करून आरोग्य खात्यात तक्रार केल्याने तेथे दंगल झाली  होती. दोन गटांतील लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली, दंडूक्याने मारहाण करून जखमी केले होते. पोलिसांनी दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी तक्रार नोंदवून १० जणांवर गुन्हा नोंदवून अटक केली ... Read More »

पुढील सहा महिने १४४ कलम लागू करणे शहाणपणाचे ः विश्‍वजित

लॉकडाऊनचा काळ संपल्यानंतरही राज्यात सोशल डिस्टन्सिंगचा भंग होऊ नये यासाठी पुढील सहा महिने राज्यात १४४ कलम लागू करणे हे शहाणपणाचे ठरणार असल्याचे काल आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यानी एका केबल वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स तसेच अन्य सामुहिक कार्यक्रमांवरही पुढील सहा महिने बंदी लागू करणे हे शहाणपणाचे ठरणार असल्याचे ते म्हणाले. गोवा सरकारने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यात ... Read More »

प्राणी संग्रहालयाच्या अधिकार्‍यांना केंद्राचे सतर्कतेचे आदेश

केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने न्यूयॉर्क येथील प्राणी संग्रहालयातील वाघाचे कोविड१९ निदान पॉझिटिव्ह आल्याने गोव्यासह राज्यांच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन यांना सतर्क राहण्याचा आदेश जारी केला आहे. देशातील प्राणी संग्रहालयातील अधिकार्‍यांनी वन्य प्राण्याच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याची गरज आहे. प्राण्यांच्या हालचालीवर चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुरक्षा उपाय योजना हाती घ्यावी. आजारी असलेल्या ... Read More »