Daily Archives: April 4, 2020

लढाई दीर्घकाळची

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दूरदर्शनवरून देशाला दर्शन दिले. येत्या रविवारी पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून खिडक्या दारांत उभे राहून मेणबत्त्या, पणत्या आणि मोबाईलचे फ्लॅश लावा असे आवाहन त्यांनी केले आहे. गेल्या वेळी दारा – खिडक्यांत राहून कोरोनाविरोधात लढणार्‍या डॉक्टर, परिचारिकांसाठी टाळ्या वाजवण्याच्या त्यांच्या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे पुन्हा एकवार ... Read More »

राज्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह

>> रुग्णांची संख्या 6 वर राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत आणखीन एका कोरोना रूग्णाची भर पडली असून कोरोना रूग्णांची संख्या आता 6 झाली आहे. विदेशातून आलेल्या पेडणे तालुक्यातील मांद्रे भागातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. ही कोरोनाबाधित व्यक्ती मोझांबिक, केनिया या देशातून गेल्या 19 मार्च 2020 रोजी डोमेस्टिक फ्लाईटने ... Read More »

कोरोनाविरोधातील लढ्यात उद्या प्रकाशाची शक्ती दाखवूया ः मोदी

>>  पंतप्रधानांचे व्हिडिओ संदेशाद्वारे भारतीयांना आवाहन कोरोना या जागतिक संकटाशी सामना करताना सामूहिक शक्ती दाखवूया. त्यासाठी भारतीयांनी मला आपली सर्वांची रविवार दि. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वा.नंतरची 9 मिनिटे द्यावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी पंतप्रधानांनी रविवार दि. 5 रोजी रात्री 9 वा. 9 मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून आपल्या गच्चीत किंवा घरात मेणबत्ती, पणत्या ... Read More »

मर्कझमध्ये 13,700 भारतीय सहभागी झाल्याचे उघड

दिल्लीतील निझामुद्दीनच्या तबलिगी जमातीच्या मर्कझमध्ये देशभरातील तब्बल 13,702 लोक सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आंध्रप्रदेश पोलिसांनी दिली आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी ही संख्या मोबाइल टॉवरद्वारे प्राप्त केलेल्या विस्तृत विश्लेषणाच्या आधारे काढली. एवढ्या मोठ्या संख्येमुळे आता चिंता वाढली असून हे लोक आणखी किती लोकांच्या संपर्कात आले असतील याचा शोध सुरू आहे. त्याचप्रमाणे या 13 हजार लोकांना शोधून त्यांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्याचे मोठे ... Read More »