Daily Archives: April 3, 2020

काटेकोर नियोजन हवे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. पंतप्रधानांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किती बारकाईच्या सूचना दिलेल्या आहेत ते पाहिले तर केंद्र सरकारने कोरोनाला किती गांभीर्याने घेतलेले आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसा आटापिटा चालला आहे हे कळून चुकते. अर्थात, या प्रयत्नांच्या यशस्विततेसाठी राज्य सरकारांचीही तेवढीच जबाबदारी आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय राखला आणि राज्य सरकारांनी ... Read More »

५५ कोरोना संशयितांचा अहवाल नकारात्मक

राज्यातील कोरोना संशयित ५५ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. पुणे येथे पाठविण्यात आलेल्या सर्व ४८ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे. गोमेकॉच्या प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ७ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. १७ नमुन्यांचा तपासणी झालेली नाही अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिली. गोमेकॉने राज्यातील ४८ संशयित कोरोना रुग्णांचे गेल्या आठवड्यात पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी नमुने पाठवले होते असे ... Read More »

गोमेकॉत आणखी ३ संशयित दाखल

गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ३  रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे.  कोरोना वॉर्डात कोरोना  २७ संशयित  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संशयितांच्या ६३ नमुन्यांपैकी ६२ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आला आहे. एका नमुन्याचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मडगाव येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये ५ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी १९ जणांनी ... Read More »

मर्कझसाठी गेलेल्यांत एकही गोमंतकीय नाही ः मुख्यमंत्री

  नवी दिल्ली निजामुद्दिम येथे आयोजित तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या ४६ जणांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकही गोमंतकीय नाही. गोवा पोलिसांची निजामुद्दिमहून आलेल्यांचा शोधमोहीम सुरू आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. निजामुद्दिन येथील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांना फोंडा, मडगाव, वास्को, ... Read More »

४६ जणांंची ओळख पटली

नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे मर्कझ प्रार्थनासभेसाठी गोव्यातून गेलेल्या सर्व ४६ जणांची ओळख पटलेली असून त्या सर्वांना समाजातील विलगीकरणाखाली वेगळे ठेवण्यात आले असल्याची माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. या ४६ जणांपैकी एकही जण गोमंतकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे की काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची ... Read More »

आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पोर्टल सुरू

केंद्र सरकारच्या, पर्यटन मंत्रालयाने ३१ मार्चला ’डींीरपवशव ळप खपवळर’ ‘हे पोर्टल सुरू केले. पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या  समन्वयाने आणि राज्य सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीने यांची दखल घेत आहे. पाहुण्या पर्यटकांना येणार्‍या समस्यांविषयी मंत्रालय, संबंधित दूतावासांशीही समन्वय साधत आहे. परदेशी पर्यटकांकडून बहुतांश विचारणा, त्यांच्या स्वदेशी परतण्याबाबत माहिती मिळवण्यासाठी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना मायदेशी परतता येत नसल्यामुळे, भारतात राहण्यासाठी व्हिसाची मुदत ... Read More »

लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे ः मोदी

>> सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे संवाद देशभरात कोरोना विषाणूचा उद्रेक झालेला असताना केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत असून केंद्र सरकारकडून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले. व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादात पंतप्रधानांनी लॉकडाऊनवर विशेष भर दिला आहे. यावेळी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असा आग्रह पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केला. पंतप्रधान मोदी यांनी ... Read More »

कोविड निधीला मंत्री देणार महिन्याचा पगार

राज्यातील मंत्र्यांनी आपल्या एक महिन्याचा पगार कोविड-१९ निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या खास बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. राज्य सरकारने कोविड-१९ निधी निधी संकलन सुरू केले आहे. या निधीचा वापर कोरोना उपचारासाठी साधन सुविधा उपलब्ध करण्यावर केला जाणार आहे. राज्यातील आयएएस, आयएफएस आणि आयपीएस अधिकारी कोविड-१९ निधीसाठी प्रत्येकी १० ... Read More »

ट्रॉलर थांबले…. खलाशी अडकले!

>> संचारबंदीचा मच्छिमारी व्यवसायावरही परिणाम : शेकडो ट्रॉलर किनार्‍यावर स्थिरावले देशात संचारबंदी लागू केल्यामुळे मच्छिमारी बंद आहे. आधीच ट्रॉलर किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आले आहेत. मच्छिमारी हंगाम संपण्याच्या वेळी ट्रॉलर किनार्‍यावर नांगरून ठेवले जातात. मात्र संपूर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ट्रॉलर मासेमारीसाठी जात नाहीत. वास्कोतील खारीवाडा येथील जेटीवर तसेच खोल समुद्रात शेकडो ट्रॉलर किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आले आहेत. काही ठिकाणी किरकोळ माशांची ... Read More »