Daily Archives: April 2, 2020

हे तर मानवी बॉम्ब!

कोरोनाच्या फैलावापासून भारताला वाचवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आटोकाट प्रयत्नांना दिल्लीतील निझामुद्दिनमधील तबलिग जमातच्या मर्कझ या धार्मिक मेळाव्याने सुरूंग लावल्याचे दिसते आहे. या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या विदेशी पाहुण्यांनी मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या आपल्या देशी भाईबंदांना आणि त्या भाईबंदांनी घरच्या प्रवासात आणि आपापल्या राज्यामध्ये कोरोनाचे हे महासंकट नेलेले आहे. अगदी तामीळनाडू, अंदमानपर्यंत या महाभागांनी कोरोनाचे हे लोण नेले. आता या सर्वांना हुडकणे, ... Read More »

राज्यातील खासगी कंपन्यांनी कर्मचार्‍यांना पूर्ण पगार द्यावा

>>  अन्यथा कायदेशीर कारवाई ः मुख्यमंत्र्यांचा इशारा कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत खासगी कंपन्या, आस्थापनांनी कर्मचार्‍यांना पूर्ण पगार द्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी कंपन्या, आस्थापनांना पूर्ण पगार देण्याचे आवाहन केलेले आहे. सरकारच्या कामगार वर्गाला पूर्ण पगार वितरणाबाबतच्या सूचनेचे पालन न करणार्‍या कंपन्या, आस्थापनावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ... Read More »

विदेशींच्या वास्तव्यामुळे आगरवाड्यात भीतीचे वातावरण

>> क्वारंटाईन झालेले विदेशी रात्री-अपरात्री फिरत असल्याने धास्ती   पेडणे तालुक्यातील आगरवाडा या गावात आता बिगर गोमंतकीय मजुरांप्रमाणे विदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात भाडेपट्टीवर राहत असल्याने ‘कोरोनाच्या, पार्श्‍वभूमीवर स्थानिकांत भीती निर्माण झाली आहे. त्यात गावातील काही भाडेपट्टीवरील नागरिकांना क्वॉरंटाईन केल्याने भीतीचे रुपांतर धास्तीत झाले आहे. त्यामुळे स्थानिक पंचायतीतर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्याचाच भाग म्हणून गावातील काही युवक एकत्रित येवून ... Read More »

तबलिगी कार्यक्रम; ९ जण आरोग्य खात्याच्या ताब्यात

गोवा पोलिसांनी नवी दिल्लीतील  धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या गोव्यातील नागरिकांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. आत्तापर्यत ९ जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे आढळून आले आहे. त्या नऊ जणांना आरोग्य खात्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यांना कोविड१९ ची बाधा अजूनपर्यंत झालेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या सहभागींनी आरोग्य खात्याच्या ०८३२-२२२५५३८ किंवा २४११८१० या दूरध्वनी क्रमांकावर अथवा १०४ या मदत ... Read More »

पंतप्रधान साधणार आज सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या दरम्यान ते कोविड १९ शी दोन हात करण्यासाठी राज्यांच्या तयारीचा आढावा घेतील. सोबतच, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात येणार्‍या समस्याही आणि अडचणीही ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. कोरोनाशी लढा देण्यासाठी खुद्द पंतप्रधान वारंवार तयारीचा आढावा घेताना दिसत आहेत. यापूर्वी लॉकडाऊन घोषित करण्याअगोदर ... Read More »

गोमेकॉत कोरोना संशयित आणखी १० रुग्ण दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात संशयित १० रुग्णांना काल दाखल करण्यात आले असून कोरोना वॉर्डात कोरोना  ३२ संशयित  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना संशयितांच्या ६४ नमुन्यापैकी १५ अहवाल नकारात्मक आले आहेत. ४९ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  आरोग्य खात्याकडे घरी विलगीकरणासाठी ३० जणांनी काल नोंदणी केली ... Read More »

कोविड-१९ उपचारांसंदर्भातील असमर्थनीय दाव्यांबाबत आयुष मंत्रालयाची पावले

पंतप्रधानानी केलेल्या आवाहनाचा पाठपुरावा करीत, कोविड-१९ च्या उपचारांबद्दल ठोस पुरावे न देता केले जाणारे असमर्थनीय दावे रोखण्यासाठी आयुष मंत्रालयाने पावले उचलली असून मंत्रालयाद्वारे पंतप्रधानांच्या सूचनेनुसार आयुष प्रणालीमार्फत साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आयुष सेवक आणि आयुष संस्थांकडून वैज्ञानिक आणि पुरावा आधारित उपायांची नोंद घेतली जात असून त्यासाठीचे प्रस्ताव मागितले आहेत. याद्वारे आलेल्या प्रस्तावांची व्यवहार्यता वैज्ञानिकांच्या समुहाद्वारे शहानिशा करून घेतली जाणार आहे. ... Read More »

नागरिकांना ऑनलाईन तात्पुरता प्रवास पास देण्याचा निर्णय

सरकारने नागरिकांना किराणा सामान, वैद्यकीय, एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाजारात जाण्यासाठी दोन तास अवधीचा तात्पुरता प्रवास पास ऑन लाईऩ पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवरील लॉकआऊटमुळे नागरिकांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. या लॉक आऊटच्या काळात प्रवासासाठी नागरिकांना प्रवास पास घ्यावा लागत आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, दिव्यांग यांना नजरेसमोर ठेवून  ऑन लाइन पद्धतीने तात्पुरता प्रवास पासची  ... Read More »

संपूर्ण संचारबंदीमुळे विशेष मुलांच्या पालकांपुढे समस्या

>> मुलांच्या उपचारांसाठी वाहन पास देण्याची मागणी केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या संपूर्ण संचारबंदीमुळे विशेष मुलांच्या पालकांना आपल्या मुलांना विविध प्रकारच्या थेरपीज देणे अशक्य बनले आहे. राज्य सरकारने डॉक्टरांना आवश्यक सेवांमध्ये समाविष्ट केलेले असले तरी पॅरामेडिक्सना त्यात त्यामध्ये समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे फिजिओथेरपीसारख्या या सेवा सध्या बंदच आहेत. शिवाय विशेष मुलांच्या पालकांना घराबाहेरच पडता येत नसल्याने आपल्या विशेष मुलांना ... Read More »