Daily Archives: April 1, 2020

जीवनावश्यक वस्तूंची वानवा —–(संपादकीय)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबतची स्थिती अजूनही सरकारला सामान्य करता आलेली नाही. कोरोनाविरुद्धची लढाई तर राहिली दूरच, संपूर्ण संचारबंदीच्या यशस्विततेसाठी आवश्यक असलेला जीवनावश्यक वस्तूंचा अखंड आणि शिस्तशीर पुरवठाच सरकारला अद्याप करता आलेला नसल्याने या तथाकथित ‘संचारबंदी’तून निष्पन्न काय होणार याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. लोक तर रोज घराबाहेर पडत आहेत. त्यांना निरुपायाने घराबाहेर पडावे लागते आहे. गरजू ग्राहकांच्या रांगा दुकानांपुढे ... Read More »

खासगी इस्पितळे, दवाखाने सुरू करावेत

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन; संशयित आढळल्यास गोमेकॉत पाठवावे   राज्यातील खासगी हॉस्पिटल, दवाखाने, डॉक्टरांनी  आवश्यक खबरदारीची  उपाय योजना करून ओपीडी विभाग सुरू रुग्णसेवेला सुरुवात करावी. एखादा कोविड-१९ चा संशयास्पद रुग्ण आढळून आल्यास त्याला गोमेकॉत पाठवावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केले. आरोग्य खात्याने घरात क्वारांटाईन केलेल्या व्यक्तीच्या घरावर कोरोना होम क्वारंटाईन असे ... Read More »

निजामुद्दिनमधील कार्यक्रमामुळे अनेक राज्यांत कोरोनाचा फैलाव

दिल्लीच्या निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमामुळे देशातील जवळ जवळ १५ राज्यांत कोरोनाचा फैलाव वाढला आहे. या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी जवळजवळ ४४१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले हजारो नागरिक विविध राज्यांतून ... Read More »

कुडचड्यात क्वॉरंटाईन व्यक्तीकडून फळविक्री

बाणसाय-कुडचडे येथील शरीफ बिल्डिंग मध्ये क्वॉरंटाईन शिक्का मारलेली व्यक्ती फळे विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने कुडचडेत खळबळ माजली आहे. खरी परिस्थिती समजून आल्याशिवाय फळे खरेदी केलेल्याना समाधान वाटणार नाही तो पर्यंत त्यांना वैद्यकीय अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मूळ कर्नाटक येथील अल्ताफ खेळगाले हा कुडचडे बाजारात फळ विक्री करीत असे. आता राज्यात लॉकडाऊन झाल्याने भाजीप्रमाणे फळेही मिळेनासी झाल्याने अल्ताफ ... Read More »

जीवनावश्यक वस्तूंची दुप्पट दराने विक्री

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी कोरोनामुळे आलेल्या आपत्तीचा फायदा उठवीत जीवनावश्यक वस्तू दाम दुप्पट भावाने विकण्याचे सत्र आरंभले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही सगळी लूट चालू असताना राज्य सरकारने मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने या विक्रेत्यांना ग्राहकांना लुटण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे. काल पणजी, मडगाव या प्रमुख शहरांबरोबर सर्व ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना विक्रेत्यांनी ... Read More »

किराणा मालाची सर्व दुकाने खुली करा

>> नागरी पुरवठा संचालनालयाचा आदेश   नागरी पुरवठा खात्याने राज्यातील किराणा सामानाची विक्री करणारी दुकाने, तसेच घाऊक किराणा सामान विक्रीची दुकाने खुली ठेवण्यासाठी खास आदेश जारी केला आहे. संबंधित दुकान मालकांनी दुकाने उघडी न ठेवल्यास कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचा इशारा नागरी पुरवठा संचालनालयाने दिला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी किराणा सामानाची दुकाने चोवीस तास ... Read More »

असोळण्यात पोलिसांकडून युवकाला

सोमवारी असोळणा येथे क्लिन रिबेलो (२५) या युवकाला तो बाजारात दुचाकीवरून फिरत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या क्लिन रिबेलो याला उपचारासाठी हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार रिबेलो हा आपल्या एका मित्रासह दुचाकीवरून खरेदीसाठी असोळणा येथे आला होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या दुचाकीवरून लाथ मारल्याने चिडलेल्या रिबेलो याने अपशब्द वापरले. त्यामुळे संतापाच्या भरात पोलिसांनी त्याला असोळणा येथील ... Read More »

फलोत्पादन मंडळातर्फे आजपासून भाजीविक्री

गोवा फलोत्पादन महामंडळाने सुमारे ३०० टन भाजी मागविली असून राज्यातील १२३० विक्री केंद्रांतून भाजीचे वितरण बुधवार १ एप्रिलला केले जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष तथा मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली.  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमदार झांट्ये यांनी वरील माहिती दिली. फलोत्पादन महामंडळाने मागील दोन दिवसांपासून कामकाजाला सुरुवात करून भाजी विक्रीला सुरुवात केली आहे. ... Read More »

कोरोनासाठी सर्वपक्षीय सल्लागार समिती स्थापन करावी ः सरदेसाई

कोरोनामुळे जी आपत्ती निर्माण झाली आहे त्या आपत्तीवर यशस्वीपणे मात करता यावी म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना करावी अशी मागणी काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांनी केली. सरकारने जर सर्वपक्षीय सल्लागार समितीची स्थापना केली तर या कठीण प्रसंगी योग्य ते निर्णय योग्यवेळी घेणे सरकारला शक्य होणार असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. विरोधी ... Read More »