Monthly Archives: April 2020

(अग्रलेख) भ्रष्टाचाराची भुते

कोरोनाविरुद्ध अवघा देश लढाई लढत असताना काही मतलबी घटक मात्र कशा प्रकारे या संधीचा फायदा घेऊन स्वार्थ साधण्यात गुंतलेले आहेत, त्यावर कालच्या अग्रलेखात आम्ही प्रकाश टाकला होता. सव्वा दोनशे रुपये किंमतीची रॅपिड टेस्टिंग किटस् तब्बल सहाशे रुपये दराने आयसीएमआरने कशी खरेदी केली त्याचे प्रकरण सध्या देशात गाजते आहे. त्यावर केंद्र सरकारने खुलासा केला असला, तरी या वाढीव दराचे स्पष्टीकरण त्यात ... Read More »

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी केंद्राने पावले उचलावीत ः राज्यपाल

>> अमित शहांना लिहिलेल्या पत्रात विनंती   राज्यातील एक प्रमुख उद्योग असलेल्या खाण उद्योगापाठोपाठ आता कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दुसरा प्रमुख असलेला पर्यटन उद्योगही बंद पडल्याने गोव्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग सुरू करण्यासाठी केंद्राने पावली उचलावीत अशी विनंती गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका पत्राद्वारे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. ... Read More »

६० गोमंतकीय खलाशी गोव्यात पोहोचले

विदेशातून मारेला बोटीतून आलेले ६० गोमंतकीय खलाशी मुंबईतून गोव्यात येण्यासाठी खास बसगाडीतून काल सकाळी रवाना झाले होते. ते रात्री उशिरा पत्रादेवी मार्गे गोव्यात पोहोचले. या सर्व ६० खलाशांना क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी काल दिली. राज्य मंत्रिमंडळाने विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या बोट मालक किंवा एजंटाकडून खलाशांचा क्वारंटाईन खर्च वसूल करण्याचा निर्णय  घेतला आहे. ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचे ४ संशयित दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात काल कोरोना संशयित ४ जणांना दाखल करण्यात आले असून या खास विभागात ७ जणांवर उपचार सुरू आहेत तर गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या १२३ नमुन्याचा अहवाल नकारात्मक आहेत. आरोग्य खात्याने आणखी ११ जणांना क्वारंटाईऩ केले असून क्वारंटाईन केलेल्याची संख्या ३३० झाली आहे. खास विभागाकडून ८८ नमुने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. ... Read More »

मडगाव अर्बनवरील निर्बंध वाढवले

भारतीय रिझर्व्ह बँकेने राज्यातील  आर्थिक संकटात सापडलेल्या मडगाव अर्बन बँकेवरील निर्बंध आणखीन ३ महिने वाढवल्याने ठेवीदार, भागधारकांना थोडासा  दिलासा मिळाला आहे. या बँकेच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरबीआयने राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या म्हापसा अर्बनवर  सर्वात प्रथम निर्बंध लागू केले होते. त्यानंतर आर्थिक संकटातील मडगाव अर्बनमबँकेवर निर्बंध लागू केले. म्हापसा अर्बनच्या व्यवस्थापनाला बँकेच्या आर्थिक कारभारात सुधारणा करणे शक्य न झाल्याने आरबीआयने ... Read More »

उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्त्या

महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंची झालेली हत्त्या ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. गावातील मंदिरात दोन साधूंचे मृतदेह आढळून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. बुलंदशहर जिल्ह्यातील शिव मंदिरात गेल्या १० वर्षांपासून जगनदास आणि सेवादास हे दोन साधू वास्तव्यास ... Read More »

खाजगी बस व्यावसायिकांचे उद्या बस स्थानकावर आंदोलन

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी बससेवा बंद असल्याने बस व्यावसायिक, चालक, वाहक यांना मोठ्या आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सरकारी यंत्रणेचे खासगी प्रवासी बस व्यावसायिक व इतरांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार ३० एप्रिलपासून कदंब बसस्थानकावर आगळ्या वेगळ्या पद्धतीने निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदिप ताम्हणकर यांनी काल दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ... Read More »

पणजीचे मुख्य मार्केट अद्याप बंदच

>> पर्यायी जागेत विविध मालाची विक्री पणजी महानगरपालिकेने भाजी, नारळ, फळांची विक्री पर्यायी जागेत कालपासून सुरुवात केली आहे. महानगरपालिकेने मुख्य मार्केट सुरू केलेले नाही. मार्केट आणि आयनॉक्स दरम्यानच्या रस्त्यावर दुतर्फा भाजी, फळे विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या २२ मार्चपासून पणजीतील मार्केट बंद असल्याने विक्रेत्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहे. नागरिकांनासुध्दा भाजी, फळांसाठी त्रास सहन करावा लागत होता. केंद्र सरकारने ... Read More »

अनिवासी गोमंतकीयांच्या नोंदणीचे काम आयोगाकडून सुरू ः सावईकर

वंशाने गोमंतकीय असलेल्या अनिवासी भारतीयांच्या नोंदणीचे काम गोवा अनिवासी भारतीय आयोगाने हाती घेतले आहे. अशी माहिती काल या आयोगाचे अध्यक्ष ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली. या संबंधी अधिक माहिती देताना ऍड. सावईकर म्हणाले की, खरे तर वंशाने गोमंतकीय असलेल्या अनिवासी भारतीयांची नोंदणी केली जावी अशी सूचना आपण ऑक्टोबर २०१९ मध्येच केली होती. आता उशिरा का होईना हे ... Read More »

(अग्रलेख) आर्थिक संकटांचे होमखण

  सं कटाच्या काळात जनतेच्या मदतीला धावून जाणारे देवदूत जसे दिसतात, तसेच मढ्याच्या टाळूवरच्या लोण्यालाही न सोडणारे राक्षसही दिसतात. दोन चिनी कंपन्यांकडून मागवलेल्या रॅपिड टेस्टिंग किटस् सदोष आढळल्यानंतर झालेल्या न्यायालयीन वादाअंती, २२५ रुपये किंमतीच्या या किटस्‌ची खरेदी तब्बल सहाशे रुपयांना करण्यात येत होती हे उघड झाले आहे. कारगिल युद्धाच्या वेळी जवानांच्या शवपेट्यांवरही दलाली उकळणारे आढळले होते, तसलाच हा प्रकार आहे. ... Read More »