Monthly Archives: March 2020

शिवोलीचे प्रतिनिधित्व करणारे ऍड. चंद्रकांत चोडणकर

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट   कै. जयसिंगराव आबाजी राणे-सरदेसाई, ऍड. रमाकांत खलप, ऍड. दयानंद नार्वेकर या लोकप्रतिनिधींप्रमाणेच ज्यांची जन्मभूमी वेगळी असूनही, म्हापसानगरी कर्मभूमी असूनही इतर मतदारसंघांतून विधिमंडळात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आपण परिचय करून घेणार आहेत. ऍड. चंद्रकांत उत्तम चोडणकर गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळासाठी दि. ११ मार्च १९७२ रोजी झालेल्या तिसर्‍या विधिमंडळासाठी (१९७२-७७) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऍड. चंद्रकांत चोडणकर ... Read More »

अनोखा दोहा

सुमेधा कामत-देसाई   गॅलरीत जाऊन उभी राहिले तेव्हा माझ्या नजरेच्या टप्प्यात अख्खा, भला थोरला समुद्र उसळताना दिसला. निळा-काळा-कबरा-राखी-रुपेरी रंगाचा समुद्र झळाळून उठला होता. कितीतरी वेळ भान हरपून मी त्यालाच पाहत बसले…   एकूण ३,४५० कि.मी. अंतर तोडून, सव्वापाच तासांचा प्रवास करून आम्ही दोहाला आलो. एक तास घड्याळ पुढे केले. तापमान ४९ डिग्री होते. माझी आई म्हणायची, ‘दिवसाला ४८ तास अवधी ... Read More »

माणसांचं जग- ४५ वैजीण ः कुरकेल माय

डॉ. जयंती नायक   ती म्हणे हातखड्याची वैजीण होती. तिनं कितीतरी कठीण बाळंतपणं सोडवली होती. त्या दिवशीसुद्धा पार्तेलीनं म्हणे आईची आशा सोडली होती, परंतु कुकरेल मायनं मात्र हिंमत सोडली नव्हती… गावात सगळीजणं तिला ‘वैजीण माय’ म्हणून हाक मारायची. मी पण तिला त्याच नावाने हाक मारायची. पण तिचं खरं नाव कुरकेल होतं, हे मला खूप उशिरा कळलं. तिच्याविषयी माझ्या मनात लहानपणापासूनच ... Read More »

प्रासंगिक

दत्ताराम प्रभू-साळगावकर माझा एक कॉलेजमधला मित्र होता. अतिशय विनोदी स्वभावाचा, कुचाळक्या. संधी मिळेल तेव्हा दुसर्‍याची चेष्टा-मस्करी करणं हाच उद्योग… अगदी चिंतातूर जंतूलाही हसवणारा असा महाभाग!   फार पूर्वीच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात करताना आपण ‘वन्स अपॉन अ टाईम’ अशी सुरुवात करतो व ती गोष्ट सांगतो. गोष्ट निश्‍चित केव्हा घडली ते आपण सांगू शकत नाही. अशा काळाची गणना ‘केव्हातरी-कधीतरी’ अशा वर्गात करतो. ... Read More »

‘एप्रिल-फूल’

मीना समुद्र   लोकांना खर्‍याच वाटतील अशा तर्‍हेने गोष्टी सांगून वा करून त्यांची फसवणूक करणे आणि फसलेल्यांची खिल्ली उडवणे, त्यांना खिजवणे, अगदी साध्या साध्या फालतू वाटतील अशा गोष्टीत त्यांना मूर्ख बनवून स्वतः मजा घेणे असे या ‘मूर्ख दिवसा’चे साधारण स्वरूप असते.   बरोब्बर तारखेप्रमाणं फुलणारं एक फूल असतं. ते कधी कोमेजत नाही. महिनाभर फुलतच राहातं. पाकळ्यापाकळ्यांनी उमलत त्याचा आगळाच सुगंध ... Read More »

नवप्रभा पुन्हा आपल्या भेटीला येत आहे मुद्रित स्वरूपात.. उद्यापासून खास नव्या रुपात लॉकडाऊन आवृत्ती..

नवप्रभा पुन्हा आपल्या भेटीला येत आहे मुद्रित स्वरूपात.. उद्यापासून खास नव्या रुपात लॉकडाऊन आवृत्ती.. Read More »

जीवनावश्यक वस्तूंसाठी न्यायालयात धाव

राज्यात बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत असल्याने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवार २७ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. राज्यातील नागरिकांना बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध  त्रास सहन करावा लागत आहे, असा दावा याचिका पत्रात करण्यात आला आहे.  न्यायालयात सुनावणी दरम्यान ... Read More »

फोनवरूनच घरपोच मिळेल गोवा डेअरीचे दूध

फोंडा, (प्रतिनिधी) : कोरोनाची धास्ती लोकांनी घेतली असून सरकारने आवाहन केल्यानुसार लोक घरीच बसल्याने जीवनावश्‍यक वस्तू मिळवणे मुश्‍किलीचे ठरले आहे. त्यात महत्त्वाच्या दुधाचा समावेश असून आता गोवा डेअरीनेच दुधाचा पुरवठा राज्यभर सुरळीत आणि सुविहित करण्यासाठी पुढाकार घेतला असून गोवा डेअरीची दूध पाकिटे घरपोच वितरणासाठी योजना आखली आहे. या योजनेनुसार राज्यातील विविध ठिकाणाहून एकूण ३४ दूध केंद्रांच्या वितरकांकडून हे दूध ग्राहकांच्या ... Read More »

फलोत्पादन गाड्यांवर भाजी

सरकारने फलोद्यान महामंडळाच्या गाड्यांवरून भाजीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती आज महामंडळाचे चेअरमन आमदार प्रवीण झांट्ये यानी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या परराज्यातून भाजी आणली जात नाही, पण आता ती आणून येत्या सोमवारपर्यंत फलोद्यान महामंडळाच्या दालनांवरून भाजीचा पुरवठा केला जाणार असल्याचे झांट्ये यानी स्पष्ट केले. Read More »

कोरोना अपडेट्स

अफवांवर विश्वास ठेवू नका : विश्वजीत एका राष्ट्रीय वाहिनेने आज गोव्यात कोरोनाचे ३३ रुग्ण सापडल्याची अतिरंजित बातमी दिल्याने राज्यात एकच खळबळ माजली. मात्र,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी त्यासंबंधीचा खुलासा करताना आतापर्यंत राज्यात केवळ तीनच रुग्ण सापडले असून लोकानी अफवांवर विश्वास ठेऊन नये असे आवाहन केले आहे. सर्वांना पगार मिळेल: लोबो या आणीबाणीच्या प्रसंगी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ ... Read More »