Monthly Archives: March 2020

सरकारने ताब्यात घेतलेल्या जीवनावश्यक वस्तू त्वरित जनतेला पुरवाव्यात ः कॉंग्रेस

  गोवा सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा आपल्या ताब्यात ठेवलेला साठा विनाविलंब मुक्त करावा तसेच सार्वजनिक वितरण संस्थेद्वारे तो राज्यातील लोकांना पुरवण्याची सोय करावी अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने एका पत्रकाद्वारे केली. सरकारने जीवनावश्यक वस्तूंचा साठा आपल्या ताब्यात ठेवल्याने राज्यात या वस्तूंची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असल्याचे पक्षाचे प्रसार माध्यम निमंत्रक ट्रॉजन डिमेलो यांनी स्पष्ट केले आहे. जीवनावश्यक वस्तू परराज्यातून घेऊन येणारी ... Read More »

जीवनावश्यक वस्तूंसाठी अजूनही धावपळ सुरूच

>> दुकानांसमोर नागरिकांच्या रांगा,पणजी मार्केट बंदच  राज्य सरकारने चोवीस तास दुकाने सुरू ठेवण्याची घोषणा करून दोन दिवस उलटले तरी अजूनही शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत आहे. पणजी महानगरपालिकेची जीवनावश्यक वस्तूंची  घरपोच सेवा योग्य नसल्याने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत आहे. तर, दुसरीकडे ताळगाव पंचायतीमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे काल वितरण केले जात होते. त्या ठिकाणी नागरिकांची ... Read More »

‘होम डिलिव्हरी’मध्ये राजकारण

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घरपोच सामान पोचवण्याची घोषणा सुरू होती. मात्र अखेर कालपासून पाचव्या दिवसापासून ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र सत्ताधारी नेत्यांनी तसेच विरोधकांनीही आपापल्या मतदारसंघात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना राजकारण केल्याने सध्या राज्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. मंत्री-आमदार यांचे समर्थक सोडल्यास मतदारसंघातील अन्य लोकांना ह्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत नसल्याच्या लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. आपल्या समर्थकांनाच जीवनावश्यक वस्तूंचा ... Read More »

शिस्तीत वाटप व्हावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार संपूर्ण देशभरामध्ये संचारबंदी आहे, परंतु बहुतेक राज्यांनी आपापल्या जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित केल्या आहेत. कोणी घरपोच वस्तू पोहोचवते आहे, कोणी परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावते आहे, कोणी भुकेल्या विद्यार्थ्यांची अन्नपाण्याची व्यवस्था करते आहे. प्रत्येक राज्य सरकार आपापल्या परीने कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्वतः संपूर्ण देशभरातील परिस्थितीवर अहोरात्र चौफेर ... Read More »

‘ते’ आणि त्यांचं नशीब!

– अ‍ॅड. रमाकांत खलप आपण निदान चांगलं स्वप्न पाहूया. जग कोरोनापासून मुक्त झालंय असं ते स्वप्न असू दे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो, त्यांनी फर्मावलेली शिक्षा (?) भोगूया. एखादा संशोधक कोरोनाविरोधी लस वा औषध शोधून काढतोय एवढं एक स्वप्न तरी प्रत्यक्षात उतरो यासाठी सर्वधर्मीय जगत्नियंत्यांची प्रार्थना करूया!   कोरोना व्हायरसमुळे जगातल्या जातीपाती, धर्म बुडालेत. ‘कोरोनाग्रस्त’ आणि ‘इतर’ अशा दोनच जाती उरल्यात. ... Read More »

ज्ञानयोगी आचार्य धर्मानंद कोसंबी

– डॉ. सोमनाथ कोमरपंत काही विचारांची नोंद धर्मानंदांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवली होती. स्वानुभवावर आधारलेली ही निरीक्षणे आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. ‘निवेदन’मधून ती वाचायला हवीत. जातिभेदनिर्मूलन, व्यक्ती-कुटुंब यांमधील परस्पर संबंध आणि त्यांची समाजविषयक कर्तव्ये यासंबंधीचे हे चिंतन आहे. ते दीपस्तंभासारखे आहे.   बौद्ध धर्माचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि पाली भाषेचे प्रकांड पंडित म्हणून आचार्य धर्मानंद कोसंबी यांची कीर्ती सर्वदूर पसरली ... Read More »

भारतीय फुटबॉलचा तेजस्वी तारा पी. के. बॅनर्जी

–  सुधाकर रामचंद्र नाईक भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे प्रमुख साक्षीदार तथा दिग्गज फुटबॉलपटू प्रदीपकुमार ऊर्फ पी. के. बॅनर्जी (83) यांचे नुकतेच दीघर्ं आजाराने निधन झाले. विलक्षण विस्मयकारी पदलालित्य आणि नजाकतदार नैपुण्यकौशल्याने तमाम भारतीय फुटबॉलप्रेमींची मने जिंकलेले प्रदीपदा यांनी सुमारे पाच दशकांहून अधिक काळ भारतीय फुटबॉलची अविरत सेवा केली. गेल्या काही वर्षांपासून पीके न्युमोनियाने श्वसनक्रियेच्या आजाराने त्रस्त होते. पार्किन्सन, हृदयाघात, डिमेन्शिया आदी ... Read More »

चला सुजाण नागरिक बनूया

    – पौर्णिमा केरकर समजून-उमजून शिस्तीने मार्ग क्रमायचा… पैसा-प्रतिष्ठा नाही तर माणूस महत्त्वाचा आहे. माणसांनाच जगविण्यासाठी धडपडणारे डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर अनेकजण यांच्याप्रती कृतज्ञ होत संघटित लढा देऊन या महामारीचा निकराने सामना करूया! चला, विचारी, सुजाण नागरिक बनूया!     दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे आवरावे आपणच आपल्याला कठीण होत आहे खरंच खूप कठीण होत ... Read More »

30 जूनपूर्वी पूर्ण करावयाच्या दहा आर्थिक बाबी

शशांक मो. गुळगुळे 31 मार्चनंतर 2018-19 या वर्षाचा रिटर्न फाईल करता येत नाही व करदाता आयकर खात्यातर्फे ‘डिफॉल्टर’ ठरविला जातो. पण यावेळी ‘कोरोना’च्या संसर्गामुळे वित्तमंत्र्यांनी हा कालावधी वाढवून तो 30 जून केला आहे व दंडाची रक्कमही कमी करण्यात आली आहे.   10-11 दिवसांनंतर 2019-20 हे आर्थिक वर्ष संपणार. ते संपण्यापूर्वी 10 आर्थिक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे- 1) करदात्याला 2018-19 ... Read More »

युवराजांचे पक्षांतर व काँग्रेसची दीनावस्था

– दत्ता भि. नाईक ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपाप्रवेश ही वरकरणी साधी वाटणारी घटना नाही. देशात प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे उद्भवणार्‍या गोंधळाची ही नांदी आहे. युवराजांंनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसची दीनावस्था झालेली आहे हे उघड सत्य आहे. 23 मार्च रोजी मध्य प्रदेशात ‘मामा’ या नावाने परिचित असलेले शिवराजसिंह चौहान यांचा अठरा महिन्यांच्या विश्रांतीनंतर मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल ... Read More »