Monthly Archives: March 2020

एक अनुभूती आत्म्याची

 माधुरी रं. शे. उसगावकर (फोंडा) संध्याकाळचं अर्ध्या तासाचं ध्यान हा एक नित्य कार्यक्रम अंगवळणी पडला. ध्यानाशिवाय चुकल्याचुकल्यासारखे वाटू लागले. आवड निर्माण झाली. जिथे आवड आहे तिथे सवड आहे म्हणतात हेच खरे. प.पू. गुरुदेव एवं वंदनीय गुरुमॉंच्या असीम कृपेने अनुभूती लेखन करीत आहे. सर्वांना गुरुकृपेचा लाभ होवो, हीच आंतरिक इच्छा! एप्रिल २००८मध्ये पोलीस ग्राउंड पर्वरी येथे प.पू. श्री शिवकृपानंद स्वामींचे आठ ... Read More »

गोमंतकीय महिला

प्रा. नागेश सु. सरदेसाई आज आपल्या ‘कुटुंबा’मध्ये महिलेचा स्तर फार उंचावलेला आहे. महिलेची साक्षरता म्हणजेच परिवाराची आणि देशाची साक्षरता, असे म. गांधी म्हणत. त्यादृष्टीने महिलांनी प्रत्येक क्षेत्रात मजल मारलेली पाहावयास मिळते. दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. आपले गोवा राज्य हे देशातले एक आदर्श राज्य आहे असे आपण सहजपणे म्हणू शकतो. एक धावती नजर फिरवली तर ... Read More »

कोरोनाशी दोन हात

कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत चालली असून भारतामध्ये ती गुरुवारपर्यंत २८ वर पोहोचली. जगभरात आतापावेतो ऐंशी देशांमध्ये या विषाणूचा प्रसार झाल्याचे आढळले असून ३१९० जण मृत्युमुखी पडले आहेत. विषाणूबाधितांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या विषाणूचा उगम ज्या चीनमध्ये झाला, त्या देशातील मृतांची आणि बाधितांची नेमकी संख्या कळणे अवघड आहे. आता चीन, दक्षिण कोरिया, इराण व इटली आदी ... Read More »

औद्योगिक क्षेत्राची घसरण वेळीच थांबवा

मनोहर गोविंद सावंत मंदीमध्ये जास्त काळ काढणे हे व्यवहारास व पर्यायाने अर्थव्यवस्थेस आणि औद्योगिक क्षेत्राला न परवडणारे असल्यामुळे मंदी लवकर संपविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सरकारने वेळीच केले पाहिजे. महागाई जितकी वर्षे राहील सामान्यपणे मंदीसुद्धा तितकाच काळ राहील.. भारतीय अर्थव्यवस्थेची सध्या घसरणारी गाडी आणखी जोरात घसरू शकते. ही घसरण थांबविण्यासाठी आधी औद्योगिक क्षेत्राला नवी उमेद देण्याची अत्यंत गरज आहे, कारण औद्योगिक क्षेत्रातील ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ३४५ अर्ज

>> शेवटच्या दिवशी १६८ अर्ज, आज होणार छाननी राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी ३०५ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवार ६ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या २५ मतदारसंघात १७५ आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीतील २५ मतदारसंघात १७० जणांनी ... Read More »

म्हादई वाचण्यासाठी गोव्यासमोर आता पर्यायच नाही ः सरदेसाई

म्हादई प्रश्‍नी गोव्याचा पूर्ण पराभव झालेला असून गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्जही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने म्हादई वाचवण्यासाठी आता गोवा सरकारकडे कोणताही उपाय बाकी राहीला नाहे असे गोवा फॉरवर्डचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी काल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या पराभवाला प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री म्हादईप्रश्‍नी ... Read More »

निर्भयाप्रकरणी दोषींना अखेर २० मार्च रोजी होणार फाशी

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातल्या चारही दोषींना २० मार्च रोजी फाशी देण्यात येणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे निर्भयाच्या दोषींवर काढण्यात आलेलं ... Read More »

भारतात कोरोना संशयित रुग्णांची संख्या ३० वर

भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा आणखी एक रुग्ण गाझियाबादमध्ये आढळला आहे. या व्यक्तीला दिल्लीतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे. गुरुग्राममधील पेटीएम कंपनीतील एका कर्मचार्‍याला बुधवारी रात्री कोरोना झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर गाझियाबादमधील या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती २३ फेब्रुवारीला इराणची राजधानी तेहरानमधून मायदेशात दाखल ... Read More »

महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत ‘पालशेतची विहीर’ प्रथम

>> रुद्रेश्‍वर पणजीला पाच प्रथम बक्षिसे ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रुद्रेश्‍वर पणजी या संस्थेच्या ‘पालशेतची विहीर’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. स्पर्धेचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जाहीर केला आहे. रुद्रेश्‍वर पणजीने दिग्दर्शनाचे प्रथम (दीपक आमोणकर), नेपथ्य प्रथम- योगेश कापडी, प्रकाश योजना प्रथम – सतीश नार्वेकर, रंगभूषा प्रथम-एकनाथ नाईक, संगीत दिग्दर्शन प्रथम – ... Read More »

कॉंग्रेस पक्षाचे सात खासदार निलंबित

संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल गुरूवारी कॉंग्रेसच्या सात खासदारांना निलंबित केले. लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्या प्रकरणीही या खासदारांवर ही कारवाई करण्यात आली. निलंबित केलेल्यांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रतपान, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत सिंह या खासदारांचा समावेश आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून चर्चा सुरू असताना कॉंग्रेस नेत्यांकडून गदारोळ सुरू झाला ... Read More »