Monthly Archives: March 2020

कोरोना … काय खरे, काय खोटे!

  डॉ. संगीता राजेंद्र गोडबोले (एम्.बी.बी.एस्., डी.सीएच)   सध्याच्या कोविद-१९ कोरोना व्हायरस या अत्यंत ज्वलंत प्रश्नाकडे आपण एक जागतिक वैद्यकीय आपत्ती म्हणून पाहूया आणि त्याबद्दल उठणार्‍या अफवांवर विश्वास न ठेवता काय खरे आणि काय खोटे याविषयी माहिती घेऊया . मी अमेरिकन जर्नलमध्ये आलेल्या पेपरचा, न्यू इंग्लंड जर्नल आफ मेडिसिन मधील लेखाचा आणि डब्लूएचओनी काढलेली पत्रके, तसेच इतर ऑथेंटिक लेखांचा यात ... Read More »

 मलबद्धता आणि होमिओ उपाय

डॉ. आरती दिनकर (होमिओपॅथी तज्ज्ञ व समुपदेशक, पणजी)   मलबद्धता किंवा शौचास साफ नसणे हा साधा वाटणारा रोग अनेक कारणांनी उद्भवतो. पचन विकार, व्यायामाचा अभाव, एकाच ठिकाणी बसून राहणे,  पाणी फार कमी पिणे, दूध, तूप किंवा मांस, अति तिखट तळलेले खाणे आणि पालेभाज्या, फळ भाज्या, पण तूंतुजन्य युक्त फळे कमी खाणे.   महेश नावाचे एक ४८ वर्षीय ग्रहस्थ, त्यांना शौचाला ... Read More »

योगसाधना – ४५४ अंतरंग योग – ४०

डॉ. सीताकांत घाणेकर   आपणही शास्त्रशुद्ध ध्यान केले तर जीवनातल्या समस्यांची उत्तरे वेळोवेळी मिळतील. जी गोष्ट देवांना साध्य झाली ती आम्हालादेखील होणार. सगळी उत्तरे पुस्तकात किंवा गुरुकडून मिळणार नाहीत. ध्यानात आपली आत्मशक्ती वाढते कारण आपला योग म्हणजे जोडणे हे प्रत्यक्ष भगवंताशी होते.   अंतरंग योगात आपण आता पुढे पुढे जात आहोत. ध्यान या पैलूवर विचार चालू आहे. त्यात मूर्तिपूजा (शास्त्रशुद्ध ... Read More »

॥ मनःशांती उपनिषदातून ॥ निरामय देहा-मनानं शतायुषी होऊ या…

प्रा. रमेश सप्रे   आज डॉक्टर्स- रुग्णालयं- औषधं खूप झाली पण त्या मानानं आरोग्य धोक्यात आलं. आयुष्याची वर्षं वाढली, पण वाढलेल्या वर्षात आयुष्य जगणं अवघड होऊन बसलं. शिवाय पैसा वाटेल तितकी महागडी औषधं खरेदी करु शकेल पण आरोग्य नाही विकत घेऊ शकणार.   ‘आयुष’ आरोग्य पुरवणीच्या या नव्या सदराचं नाव ठेवताना काही विचार मनात होता. ‘उपनिषदातून मनःशांती’ असं शीर्षक सरळ ... Read More »

मायग्रेन (अर्धशिशी)? स्टेम सेल थेरेपी लाभदायक

यात मेंदूतील रक्तप्रवाहात असमतोल होऊन रक्ताचा प्रवाह मेंदूच्या काही भागात वाढतो आणि काही भागात कमी होतो. रक्तप्रवाहातील या कमी-जास्तपणामुळे मेंदूत काही विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. डोकेदुखीच्या विकारांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार, १५० पेक्षा जास्त प्रकारची डोकेदुखी आहे. सामान्य डोकेदुखीमध्ये, मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि डोके आणि मानेच्या भागातील स्नायू ताणले जातात, ज्यामुळे मेंदूत रासायनिक घटकांवर ताण ... Read More »

जिल्हा मिनरल फंडातून ५२ कोटींचा निधी मंजूर

>> कोविड-१९ च्या साधनसुविधांसाठी निधी केंद्रीय खाण मंत्रालयाने जिल्हा मिनरल फंडातून कोविड-१९ हॉस्पिटल व वैद्यकीय साधन सुविधा उभारण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कर्नाटकातून गोव्यात कडधान्य घेऊन येणारी वाहने सोडण्यास मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच राज्यातील औषधाच्या तुटवड्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ... Read More »

लॉकडाऊनचा क़ालावधी वाढवण्याचा सध्या तरी विचार नाही ः केंद्र सरकार

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी किंवा महिन्यांसाठी वाढणार का? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. मात्र केंद्र सरकारने यावर नकार दर्शवत सामान्यांना दिलासा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणखी वाढवण्याची कोणतीही योजना नाही, असे सध्या तरी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी, लॉकडाऊनचा कालावधी ... Read More »

‘त्या’ विमान प्रवाशांनी संपर्कासाठी आवाहन

कोरोनाची लागण व्यक्तीच्या सोबत विमान प्रवास केलेल्या गोव्यातील व्यक्तींनी १०४ हेल्पलाईन किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. न्यूयॉर्क ते मुंबई आणि २२ मार्च रोजी विस्ताराच्या यूके ८६१ विमानाने मुंबई ते गोवा असा प्रवास केलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे. या व्यक्तीच्या सोबत प्रवास केलेले अनेक व्यक्ती गोव्यात आहेत. त्या व्यक्तींनी खबरदारीचा ... Read More »

कोरोना उपाययोजनेसंबंधीची याचिका निकालात

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी कोरोना विषाणू उपाय योजनेबाबत दाखल केलेली याचिका राज्य सरकारकडून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाय योजना केली जात असल्याने निकालात काढण्यात आली आहे. राज्यात कायद्याचे शिक्षण घेणार्‍या दोन विद्यार्थ्यांनी गोवा खंडपीठात एक याचिका दाखल करून कोरोना विषाणू उपाय योजनेबाबत प्रश्‍न उपस्थित केला होता. राज्य सरकारने या याचिकेला अनुसरून गोवा ... Read More »

विदेशात अडकलेल्या गोमंतकीयांना गोव्यात येण्यासाठी मदत करावी

>> चर्चिल आलेमाव यांचे पंतप्रधानांना पत्र विदेशी जहाजांवर काम करणारे कित्येक गोमंतकीय कोरोनाच्या संकटाच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी अडकून पडलेले आहेत. विदेशात अडकून पडलेल्या या गोमंतकीय बांधवांना गोव्यात आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी करणारे एक पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले असून त्याची एक प्रत गृहमंत्री अमित शहा यांना पाठवली आहे. दि. २९ मार्च रोजी ... Read More »