Daily Archives: March 29, 2020

‘ते’ आणि त्यांचं नशीब!

– अ‍ॅड. रमाकांत खलप आपण निदान चांगलं स्वप्न पाहूया. जग कोरोनापासून मुक्त झालंय असं ते स्वप्न असू दे. त्यासाठी सरकार कोणाचेही असो, त्यांनी फर्मावलेली शिक्षा (?) भोगूया. एखादा संशोधक कोरोनाविरोधी लस वा औषध शोधून काढतोय एवढं एक स्वप्न तरी प्रत्यक्षात उतरो यासाठी सर्वधर्मीय जगत्नियंत्यांची प्रार्थना करूया!   कोरोना व्हायरसमुळे जगातल्या जातीपाती, धर्म बुडालेत. ‘कोरोनाग्रस्त’ आणि ‘इतर’ अशा दोनच जाती उरल्यात. ... Read More »

ज्ञानयोगी आचार्य धर्मानंद कोसंबी

– डॉ. सोमनाथ कोमरपंत काही विचारांची नोंद धर्मानंदांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवली होती. स्वानुभवावर आधारलेली ही निरीक्षणे आजच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरतील. ‘निवेदन’मधून ती वाचायला हवीत. जातिभेदनिर्मूलन, व्यक्ती-कुटुंब यांमधील परस्पर संबंध आणि त्यांची समाजविषयक कर्तव्ये यासंबंधीचे हे चिंतन आहे. ते दीपस्तंभासारखे आहे.   बौद्ध धर्माचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आणि पाली भाषेचे प्रकांड पंडित म्हणून आचार्य धर्मानंद कोसंबी यांची कीर्ती सर्वदूर पसरली ... Read More »

भारतीय फुटबॉलचा तेजस्वी तारा पी. के. बॅनर्जी

–  सुधाकर रामचंद्र नाईक भारतीय फुटबॉलच्या सुवर्णयुगाचे प्रमुख साक्षीदार तथा दिग्गज फुटबॉलपटू प्रदीपकुमार ऊर्फ पी. के. बॅनर्जी (83) यांचे नुकतेच दीघर्ं आजाराने निधन झाले. विलक्षण विस्मयकारी पदलालित्य आणि नजाकतदार नैपुण्यकौशल्याने तमाम भारतीय फुटबॉलप्रेमींची मने जिंकलेले प्रदीपदा यांनी सुमारे पाच दशकांहून अधिक काळ भारतीय फुटबॉलची अविरत सेवा केली. गेल्या काही वर्षांपासून पीके न्युमोनियाने श्वसनक्रियेच्या आजाराने त्रस्त होते. पार्किन्सन, हृदयाघात, डिमेन्शिया आदी ... Read More »

चला सुजाण नागरिक बनूया

    – पौर्णिमा केरकर समजून-उमजून शिस्तीने मार्ग क्रमायचा… पैसा-प्रतिष्ठा नाही तर माणूस महत्त्वाचा आहे. माणसांनाच जगविण्यासाठी धडपडणारे डॉक्टर, पोलीस, नर्स व इतर अनेकजण यांच्याप्रती कृतज्ञ होत संघटित लढा देऊन या महामारीचा निकराने सामना करूया! चला, विचारी, सुजाण नागरिक बनूया!     दररोज स्वतःला धीर देत जगणे; कठीण होत आहे आवरावे आपणच आपल्याला कठीण होत आहे खरंच खूप कठीण होत ... Read More »

30 जूनपूर्वी पूर्ण करावयाच्या दहा आर्थिक बाबी

शशांक मो. गुळगुळे 31 मार्चनंतर 2018-19 या वर्षाचा रिटर्न फाईल करता येत नाही व करदाता आयकर खात्यातर्फे ‘डिफॉल्टर’ ठरविला जातो. पण यावेळी ‘कोरोना’च्या संसर्गामुळे वित्तमंत्र्यांनी हा कालावधी वाढवून तो 30 जून केला आहे व दंडाची रक्कमही कमी करण्यात आली आहे.   10-11 दिवसांनंतर 2019-20 हे आर्थिक वर्ष संपणार. ते संपण्यापूर्वी 10 आर्थिक बाबी पूर्ण करणे गरजेचे आहे- 1) करदात्याला 2018-19 ... Read More »

युवराजांचे पक्षांतर व काँग्रेसची दीनावस्था

– दत्ता भि. नाईक ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपाप्रवेश ही वरकरणी साधी वाटणारी घटना नाही. देशात प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे उद्भवणार्‍या गोंधळाची ही नांदी आहे. युवराजांंनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसची दीनावस्था झालेली आहे हे उघड सत्य आहे. 23 मार्च रोजी मध्य प्रदेशात ‘मामा’ या नावाने परिचित असलेले शिवराजसिंह चौहान यांचा अठरा महिन्यांच्या विश्रांतीनंतर मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल ... Read More »

शिवोलीचे प्रतिनिधित्व करणारे ऍड. चंद्रकांत चोडणकर

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट   कै. जयसिंगराव आबाजी राणे-सरदेसाई, ऍड. रमाकांत खलप, ऍड. दयानंद नार्वेकर या लोकप्रतिनिधींप्रमाणेच ज्यांची जन्मभूमी वेगळी असूनही, म्हापसानगरी कर्मभूमी असूनही इतर मतदारसंघांतून विधिमंडळात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा आपण परिचय करून घेणार आहेत. ऍड. चंद्रकांत उत्तम चोडणकर गोवा, दमण व दीव संघप्रदेश विधिमंडळासाठी दि. ११ मार्च १९७२ रोजी झालेल्या तिसर्‍या विधिमंडळासाठी (१९७२-७७) झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ऍड. चंद्रकांत चोडणकर ... Read More »

अनोखा दोहा

सुमेधा कामत-देसाई   गॅलरीत जाऊन उभी राहिले तेव्हा माझ्या नजरेच्या टप्प्यात अख्खा, भला थोरला समुद्र उसळताना दिसला. निळा-काळा-कबरा-राखी-रुपेरी रंगाचा समुद्र झळाळून उठला होता. कितीतरी वेळ भान हरपून मी त्यालाच पाहत बसले…   एकूण ३,४५० कि.मी. अंतर तोडून, सव्वापाच तासांचा प्रवास करून आम्ही दोहाला आलो. एक तास घड्याळ पुढे केले. तापमान ४९ डिग्री होते. माझी आई म्हणायची, ‘दिवसाला ४८ तास अवधी ... Read More »

माणसांचं जग- ४५ वैजीण ः कुरकेल माय

डॉ. जयंती नायक   ती म्हणे हातखड्याची वैजीण होती. तिनं कितीतरी कठीण बाळंतपणं सोडवली होती. त्या दिवशीसुद्धा पार्तेलीनं म्हणे आईची आशा सोडली होती, परंतु कुकरेल मायनं मात्र हिंमत सोडली नव्हती… गावात सगळीजणं तिला ‘वैजीण माय’ म्हणून हाक मारायची. मी पण तिला त्याच नावाने हाक मारायची. पण तिचं खरं नाव कुरकेल होतं, हे मला खूप उशिरा कळलं. तिच्याविषयी माझ्या मनात लहानपणापासूनच ... Read More »

प्रासंगिक

दत्ताराम प्रभू-साळगावकर माझा एक कॉलेजमधला मित्र होता. अतिशय विनोदी स्वभावाचा, कुचाळक्या. संधी मिळेल तेव्हा दुसर्‍याची चेष्टा-मस्करी करणं हाच उद्योग… अगदी चिंतातूर जंतूलाही हसवणारा असा महाभाग!   फार पूर्वीच्या गोष्टी सांगण्यास सुरुवात करताना आपण ‘वन्स अपॉन अ टाईम’ अशी सुरुवात करतो व ती गोष्ट सांगतो. गोष्ट निश्‍चित केव्हा घडली ते आपण सांगू शकत नाही. अशा काळाची गणना ‘केव्हातरी-कधीतरी’ अशा वर्गात करतो. ... Read More »