Daily Archives: March 26, 2020

जीवनावश्यक वस्तूंसाठी न्यायालयात धाव

राज्यात बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंसाठी त्रास सहन करावा लागत असल्याने एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर शुक्रवार २७ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. राज्यातील नागरिकांना बंदच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करण्यात सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना विविध  त्रास सहन करावा लागत आहे, असा दावा याचिका पत्रात करण्यात आला आहे.  न्यायालयात सुनावणी दरम्यान ... Read More »

फोनवरूनच घरपोच मिळेल गोवा डेअरीचे दूध

फोंडा, (प्रतिनिधी) : कोरोनाची धास्ती लोकांनी घेतली असून सरकारने आवाहन केल्यानुसार लोक घरीच बसल्याने जीवनावश्‍यक वस्तू मिळवणे मुश्‍किलीचे ठरले आहे. त्यात महत्त्वाच्या दुधाचा समावेश असून आता गोवा डेअरीनेच दुधाचा पुरवठा राज्यभर सुरळीत आणि सुविहित करण्यासाठी पुढाकार घेतला असून गोवा डेअरीची दूध पाकिटे घरपोच वितरणासाठी योजना आखली आहे. या योजनेनुसार राज्यातील विविध ठिकाणाहून एकूण ३४ दूध केंद्रांच्या वितरकांकडून हे दूध ग्राहकांच्या ... Read More »

फलोत्पादन गाड्यांवर भाजी

सरकारने फलोद्यान महामंडळाच्या गाड्यांवरून भाजीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माहिती आज महामंडळाचे चेअरमन आमदार प्रवीण झांट्ये यानी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या परराज्यातून भाजी आणली जात नाही, पण आता ती आणून येत्या सोमवारपर्यंत फलोद्यान महामंडळाच्या दालनांवरून भाजीचा पुरवठा केला जाणार असल्याचे झांट्ये यानी स्पष्ट केले. Read More »

कोरोना अपडेट्स

अफवांवर विश्वास ठेवू नका : विश्वजीत एका राष्ट्रीय वाहिनेने आज गोव्यात कोरोनाचे ३३ रुग्ण सापडल्याची अतिरंजित बातमी दिल्याने राज्यात एकच खळबळ माजली. मात्र,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी त्यासंबंधीचा खुलासा करताना आतापर्यंत राज्यात केवळ तीनच रुग्ण सापडले असून लोकानी अफवांवर विश्वास ठेऊन नये असे आवाहन केले आहे. सर्वांना पगार मिळेल: लोबो या आणीबाणीच्या प्रसंगी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांवर उपासमारीची पाळी येऊ ... Read More »

व्यवस्था मार्गी लावा

    गोव्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही या राज्य सरकारच्या आणि जनतेच्या आजवरच्या भ्रमाचा भोपळा फोडत राज्यात एखादा नव्हे, तर तब्बल 3 कोरोना बाधित असल्याचे काल स्पष्ट झाले. सरकारची आणि जनतेचीही आता खरी कसोटी सुरू झाली आहे. कोरोनाचे लोण आपल्याकडे आलेलेच नाही या भ्रमामध्ये ज्यांनी आजवर मनमुराद शिमगा घातला, जिल्हा पंचायतीच्या प्रचारामध्ये जे मनसोक्त दंग राहिले, सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये जे ... Read More »

गोव्यात कोरोनाचे ३ रुग्ण

गोव्यात कोरोनाचे ३ रुग्ण विदेशातून आलेल्या ३ रुग्णांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले असून गोवा सरकार त्यामुळे खडबडून जागे झाले आहे. २५. २९ व ५५ वयाचे हे पुरुष रुग्ण असून स्पेन ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून आलेले होते. त्यांच्या संपर्कात आणखी किती लोक आले याचा आता शोध घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून त्यांची प्रकृती स्थिर ... Read More »

गोव्यात कोरोनाचे ३ रूग्ण

विदेशातून आलेल्या ३ रुग्णांमध्ये कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले असून गोवा सरकार त्यामुळे खडबडून जागे झाले आहे. २५. २९ व ५५ वयाचे हे पुरुष रुग्ण असून स्पेन ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतून आलेले होते. त्यांच्या संपर्कात आणखी किती लोक आले याचा आता शोध घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा दावा केला आहेनवप्रभेला ... Read More »