Daily Archives: March 21, 2020

आणखी एक फटकार

कोरोनाचे गांभीर्य समजून न घेता आपलेच घोडे पुढे दामटत आलेल्या गोवा सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काल पुन्हा एक फटकार बसली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असोत किंवा जिल्हा पंचायत निवडणूक असो, जे काय असेल ते सगळे सध्या ३१ मार्चच्या पुढे ढकला व नंतर परिस्थिती बघून निर्णय घ्या, असे पंतप्रधानांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे कान पिळले. त्यामुळे नववी ते बारावीच्या सध्या सुरू असलेल्या ... Read More »

कोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सध्या देशात कोरोनाची ही लागण स्टेज २ वर आली आहे. येथेच आळा घालण्यात अपयश आले तर, तिचा पुढील प्रसार रोखण्यासाठी राज्यात आणि संपूर्ण देशात लष्कराच्या मदतीने ‘टोटल लॉकडाऊन’ करणे आवश्यक भासेल. कुठल्याही विषाणूचा प्रसार घातांक वक्ररेषा आलेखानुसार होतो आणि इन्व्हेस्टीगेशन, रिकग्निशन, इनिशिएशन, ऍक्सिलरेशन आणि डिसीलरेशन या पाच स्तरीय टप्प्यांमधून जातो. चीनमधील वुहान प्रांतात कोविड १९ कोरोना ... Read More »

नववी ते बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

>> दहावीबाबत २९ मार्च रोजी निर्णय कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर शिक्षण खात्याने नववी ते बारावीच्या २१ मार्चपासूनच्या परीक्षा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलल्या आल्या आहेत. नवीन ते बारावीच्या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे. यासंबंधीचा आदेश शिक्षण संचालिका वंदना राव यांनी काल जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर केलेल्या व्हिडिओ ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणूक लांबणीवर

>> राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने रविवार दि. २२ मार्चची जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. दि. २२ रोजीची निवडणूक २४ अशी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, त्यासंबंधीची अधिसूचना काढण्यात आली नव्हती, असे ते ... Read More »

निर्भयाच्या दोषींना अखेर ७ वर्षांनी दिली फाशी

संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या बहुचर्चित निर्भया सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह यांना काल शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता तिहार तुरुंगात फाशी देण्यात आले. एकाच वेळी चार आरोपींना फाशी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. निर्भया प्रकरणी चारही दोषींना काल पहाटे तिहार तुरुंगात फाशी दिली गेली. तिहार तुरुंगाच्या क्रमांक तीनमध्ये एकाचवेळी चार ... Read More »

जमावबंदीच्या १४४ कलमाबाबत विचार

>> मुख्यमंत्री सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्यात आत्तापर्यंत एकही कोरोना विषाणू प्रोझेटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. तरी, कोरोना विषाणू संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लोकांच्या आरोग्याच्या हितार्थ जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच, कोरोना विषाणूच्या फैलाव रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनांची कडक रितीने अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. राज्यात एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नये म्हणून ... Read More »

आमदार खवटेंची मागणी

सरकारने जिल्हा पंचायत निवडणुका अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलाव्या, अशी मागणी काल पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयापूर्वी पत्रकार परिषदेतून केली. निवडणुकांपेक्षा लोकांचे आरोग्य व जीव महत्त्वाचा असून त्याला धोका निर्माण होणार असल्याचे सरकारने कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत असे लोकांनाही वाटत असल्याचे लोकमनाचा कानोसा घेतला असता दिसून आल्याचे खंवटे पुढे म्हणाले. दरम्यान, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून ने ... Read More »

गोमेकॉत आणखी तीन रुग्ण दाखल

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित आणखीन ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले. कोरोना खास वॉर्डात सध्या सहाजणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात कोरोना संशयित १७ रुग्ण आणि मडगावच्या टी. बी. इस्पितळामध्ये ४ रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. कोरोना संशयित १२ रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. कोरोना संशयित ... Read More »

कोरोनाचा पाचवा बळी

कोरोना व्हायरसमुळे काल शुक्रवारी राजस्थानात उपचार घेत असलेल्या इटालीयन नागरिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे भारत देशात आत्तापर्यंत कोरोनामुळे बळींची संखअया ५ वार पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी २०० वर पोहोचली आहे. यापैकी २० रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आणखी चार नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. लखनौच्या केजीएमयू रुग्णालयात आता एकूण ९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. Read More »

जीसीईटी परीक्षा अर्ज सादरीकरणाबाबत संभ्रम

कोरोनासंदर्भात सध्या जगभरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असली तरी बारावीनंतर अभियांत्रिकी, फार्मसी आदी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या गोवा कॉमन एंटरन्स टेस्ट किंवा जीसीईटी प्रवेश परीक्षांसाठी येत्या २६ मार्च ते १ एप्रिल दरम्यान पर्वरी व मडगाव येथे अर्ज भरण्याच्या नियोजित कार्यक्रमात बदल करण्याची सुबुद्धी अद्याप तरी राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण मंडळाला झालेली नाही. हजारो विद्यार्थी आणि पालक या काळात जीसीईटीचे अर्ज भरण्यासाठी पर्वरी ... Read More »