Daily Archives: March 20, 2020

आज फैसला?

निर्भया अत्याचार प्रकरणातील चारही गुन्हेगारांचे आपली फाशीची शिक्षा रोखण्याचे चाललेले प्रयत्न काल संध्याकाळपर्यंत संपुष्टात आले. राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय या सर्व व्यवस्थांकडे पुन्हा पुन्हा धाव घेऊनही डाळ न शिजलेल्या या गुन्हेगारांनी रात्री आणखी काही कायदेशीर पेच निर्माण केला नाही, तर आज पहाटे साडे पाच वाजता त्यांचे मृतदेह तिहार कारागृहात फाशीच्या तख्ताला लटकलेले असतील! कोणाचाही जीव जाणे हे वाईटच, परंतु ... Read More »

विशेष संपादकीय सोनाराने टोचले कान!

‘कोरोनाबाबत निश्‍चिंत राहण्याची ही मानसिकता योग्य नव्हे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वच्छ शब्दांत ठणकावले आणि रविवारी २२ मार्च रोजी स्वेच्छा संचारबंदीचे आवाहनही जनतेला केले. कोरोनाच्या समस्येचे खरे गांभीर्य पंतप्रधानांना उमगलेले आहे आणि ही अभूतपूर्व समस्या हाताळण्याताठी त्यांचे सरकार अगदी प्रारंभीपासून अतिशय प्रभावीपणे पुढे सरसावलेले आहे. गोव्यातील डॉ. प्रमोद सावंत यांचे राज्य सरकार मात्र कोरोनाच्या बाबतीत पूर्णपणे कोमात गेल्यागत ... Read More »

कोविड-१९ ला अटकाव करायचा कसा?

अमिताभ कांत आणि ऋचा रश्मी या आजारामुळे शहरी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि देशाच्या जीडीपीमध्ये शहरे महत्त्वाचे योगदान देतात हे नाकारता येणार नाही. स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा होणारा परिणाम कमी होणे आवश्यक आहे आणि हे साध्य करण्यात जिल्हा प्रशासन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. भारतात जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे आहेत, जिथे दररोज गर्दीने भरलेल्या मेट्रो आणि बसने प्रवास करताना लोकांमधील ... Read More »

रविवारी देशात ‘जनता कर्फ्यू’

>> पंतप्रधानांचे कोरोनासंदर्भात देशवासीयांना आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुरूवारी कोरोनासंदर्भात देशाला संबोधित करताना येत्या रविवारी दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत स्वेच्छा संचारबंदी अर्थात जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भात बोलताना, जनता कर्फ्यू म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःने स्वतःवर घातलेले निर्बंध होय. याचे पालन प्रत्येक नागरिकाने करावे अशी मागणी मी देशवासीयांकडे ... Read More »

इराणमधील भारतीयांना वास्कोत ठेवण्यास विरोध

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने गोव्यात आणून हार्बर मुरगाव येथे एमपीटीतर्फे तयार केलेल्या कॉरीएन्टल केंद्र सेंटरमध्ये आणून ठेवणार असल्याच्या धास्तीने सडावासीय एकवटले व वास्को येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात धडक घेऊ असे केंद्र मुरगावात नको असल्याची मागणी केली. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना विशेष विमानाने आणून दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर मुरगाव हार्बर येथे एमपीटीतर्फे आपल्या जुन्या प्रधान कार्यालयातील पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर उघडलेल्या कॉरीएन्टल सेंन्टरमध्ये ... Read More »

राज्य सरकार बेफिकीर

>> मुख्यमंत्री, मंत्री जिल्हा पंचायत प्रचारकार्यात गुंग आरोग्य खात्याने राज्यातील आठवडी बाजार, पब्स, शिकवणी वर्ग, शॉपिंग मॉल्स येत्या ३१ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचा आदेश काल जारी केला. आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होणार आहे, असे आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसौझा यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून ... Read More »

पाच कोरोना संशयितांना डिस्चार्ज

>> गोमेकॉत तिघांवर उपचार सुरू गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित आणखीन १ रुग्णाला दाखल करण्यात आला आहे. कोरोना खास वॉर्डात सध्या तिघांवर उपचार सुरू आहेत. खास वॉर्डातील ५ जणांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. कोरोना संशयित ८ रूग्णांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २१४ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले ... Read More »

देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित

>> केंद्रीय क्रीडा मंत्रालायचा निर्णय; सराव सत्रे चालू राहतील ‘कोविड-१९२ अर्थात ’करोना’ विषाणूच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे. करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रिय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ‘देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या असल्याची मातिही प्रासारमाध्यमाला दिली ... Read More »

न्यूझीलंड पुरुष क्रिकेट संघही एकांतवासात

कोरोना विषाणूच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेल्या न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघ मायदेशात विलगीकरणाला सामोरा जात आहे. संपूर्ण संघाला आणि सहाय्यक स्टाफला १४ दिवस अनिवार्य अशा एकांतवासात ठेवण्यात आले आहे. एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डेन यांनी काल दिलेल्या एका आदेशानुसार सीडनीवरून परतलेल्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघातील १५ खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला घरातच राहण्यासा सांगितले आहे. एनजेडीसीचे ... Read More »