Daily Archives: March 19, 2020

निवडणुका की कोरोना?

गोव्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण मिळाला अशी अधिकृत खबर काल सकाळी आली. नंतर आरोग्यमंत्र्यांनाच ती खोटी असल्याचे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. जनतेची ही कसली चेष्टा चालली आहे? समाजमाध्यमांवरून तर कोरोना रुग्णांबाबत नाना अफवांना नुसता ऊत आला आहे. राज्यात हा जो काही सावळागोंधळ चालला आहे तो सरकारच्या एकूण कारभाराचे धिंडवडे काढणारा आहे. अशा अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी आणि अशा अफवा वेळीच रोखण्यासाठी ... Read More »

चीन संकटात, भारताला संधी

शैलेंद्र देवळणकर कोरोना विषाणूच्या हाहाकारामुळे चीनचे अर्थकारण पूर्णतः कोलमडून गेले आहे. चीन हे जगाचे मॅन्युङ्गॅक्चरिंग हब असल्यामुळे जगालाही याचा मोठा ङ्गटका बसला आहे. कारण पुरवठासाखळी विस्कळित झाली आहे. त्यातून निर्माण झालेली पोकळी व्यापण्याची सुवर्णसंधी भारताला चालून आली आहे. अमेरिकेसह अनेक देश चीनला पर्याय म्हणून भारताकडे पहात आहेत. भारतात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता मुबलक आहे. पण आजवर आपण मागणीच्या शोधात होतो. चीनच्या ... Read More »

‘त्या’ ४२ विमान प्रवाशांना गोमेकॉत आणणार

>> आरोग्यमंत्री राणेंची माहिती >> गोमेकॉत ५ संशयित रुग्ण गोव्यात कोरोना विषाणूंचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्यखाते सध्या युद्धपातळीवर काम करीत आहे. दुबईहून गोवामार्गे बेंगलोरला गेलेल्या एका महिलेची बेंगलोर विमानतळावर केलेल्या तपासणीत तिला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण ४२ सहप्रवाशांना गोमेकॉतील कोरोनासाठीच्या विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पत्रकार ... Read More »

गोमेकॉत कोरोना संशयित ५ रूग्ण

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील खास कोरोना वॉर्डात कोरोना संशयित ५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २९ जानेवारीपासून आत्तापर्यत कोरोना संशयित २८ जणांची नोंदणी झाली आहे. आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. मंगळवार १७ मार्च कोरोना संशयितांचे ४ नमुने आणि १८ मार्चला ६ नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. बुधवारी इस्पितळामधून एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ... Read More »

आरोग्यमंत्र्यांवर कॉंग्रेसची टीका

गोव्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची घोषणा करून खळबळ उडवून नंतर सदर वृत्त चुकीचे असल्याचे जाहीर करणार्‍या आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्यावर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल जोरदार टीका केली. कोरोना विषाणू हा संवेदनशील विषय असल्याने जबाबदारीने वागणे गरजेचे असताना आरोग्यमंत्री राणे यांनी कोरोनाचा गोव्यात पहिला रुग्ण सापडल्याची माहिती जाहीर करण्यापूर्वी योग्य प्रकारे शहानिशी न केल्याने नागरिकांत ... Read More »

परदेशातील २७६ भारतीयांना कोरोना विषाणूची लागण

परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे. यात इराणमध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. दरम्यान, भारतात ताज्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण १५३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात असलेल्या एकूण २७६ भारतीय नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये २५५ भारतीय कोरोनाग्रस्त आहेत. या ... Read More »

कोरोना रुग्ण मिळाल्याचे वृत्त खोटे : आरोग्यमंत्री राणे

गोव्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा एक रुग्ण मिळाला असल्याचे वृत्त हे खोटे असल्याचा खुलासा काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यानी केला. एका महिलेने फोन करून आपण पुणे येथील प्रयोगशाळेतून बोलत असून एका संशयित रुग्णाचा कोरोनासाठीचा अहवाल हा पॉझिटिव्ह असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे दिसून आले असल्याचे सांगितल्याने सगळा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले. चौकशीअंती कुणी तरी फोन करून ही चुकीची माहिती ... Read More »

रविवारच्या मतदानासाठी मार्गदर्शक सूचना जारी

>> निवडणूक आयोगाकडून स्वच्छतेचे आवाहन कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने येत्या २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या वेळी घ्यायच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी स्वच्छतेच्या आवश्यक उपाय योजना आखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतील सर्व निर्वाचन अधिकार्‍यांनी वितरण ... Read More »

मध्य प्रदेशमध्ये आज बहुमत चाचणी?

मध्य प्रदेशातील ज्योतिरादित्यांसह २२ कॉंग्रेस आमदारांनी राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. आज गुरूवारी या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मध्य प्रदेशातील २१ बंडखोर कॉंग्रेस आमदार सध्या रामदा हॉटेलमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना भेटण्यासाठी दिग्विजय सिंह या हॉटेलवर ... Read More »

सौरभ चौधरी प्रथम स्थानी

तुघलकाबाद येथील डॉ. कर्णी सिंग रेंजवर झालेल्या ऑलिंपिक नेमबाजी निवड चाचणीमध्ये सौरभ चौधरी याने पुरुषांच्या एअर पिस्तोल प्रकारात ५८८ गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षीय सौरभ याने २०१८ साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. यानंतर दोन वैयक्तिक सुवर्णपदके तसेच मनू भाकरसह चार मिश्र सांघिक सुवर्णपदके देखील भारताला मिळवून दिली होती. या चाचणीपूर्वी सौरभची यापूर्वीच्या चाचणींतील कामगिरी ५८५, ... Read More »