Daily Archives: March 18, 2020

पुढचा धोका ओळखा

कोरोना विषाणूने जगभरात माजवलेल्या हलकल्लोळाच्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा रद्द करण्याचा आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचेच सरकारचे धोरण असल्याने यात वावगे काही नाही, परंतु ज्या पद्धतीने हा निर्णय आधी काही मोजक्या शाळांनी स्वतःहून घेतला आणि नंतर शिक्षण खाते जागे झाले आणि तसा निर्णय मग ... Read More »

कोरोना आजाराविषयी जाणून घ्या सर्व काही

कोरोना विषाणूच्या आजाराने सध्या जगभरामध्ये दहशत व घबराट निर्माण केली आहे. या आजारावर लस निर्माण करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू असल्या, तरी औषध उपलब्ध नाही. त्याचा संसर्गही झपाट्याने होऊ शकत असल्याने ही भीती आहे. परंतु घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य ती खबरदारी घेऊन आपण या कोरोनाच्या धोक्यापासून बचाव करू शकतो. नवप्रभेच्या वाचकांसाठी कोरोनाविषयीची ही सर्वंकष माहिती- कोरोना विषाणू म्हणजे नेमके काय? ... Read More »

आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द

>> पुढच्या वर्गात प्रवेश देणार, शिक्षण संचालकांचा निर्णय कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने १६ मार्च रोजी जारी केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन शिक्षण खात्याने काल आठवी इयत्तेपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण संचालक वंदना राव यांनी काल त्यासंबंधीचा आदेश काढला. नववी, दहावी, अकरावी व बारावी इयत्तेच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे ... Read More »

दुबईहून गोवामार्गे बेंगलोरला गेलेल्या महिलेला कोरोनाची लागण

>> गोवा करणार ‘त्या’ विमान प्रवाशांची तपासणी दुबईहून विमानाने गोव्यात आलेल्या व बेंगलोर विमानतळावर केलेल्या तपासणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलेल्या एका ६७ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या २६ विमान प्रवासांची यादी गोवा सरकारने तयार केली आहे. सदर महिला दि. ९ मार्च रोजी दुबईहून आली होती. त्या विमानाने प्रथम गोव्यात लँडिंग केले होते. यावेळी काही प्रवासी गोव्यात उतरले. तर काही प्रवासी ... Read More »

दाबोळीत ५७ लाखांची सोन्याची बिस्किटे जप्त

गोवा कस्टम विभागाने काल मंगळवारी पुन्हा एकदा केलेल्या कारवाईत दुबईमार्गे गोव्यात दाबोळी विमानतळावर उतरलेल्या भटकळ कर्नाटक येथील महम्मद आयुब या प्रवाशाकडून ५७ लाख रुपये किंमतीची १५३८ गॅ्रम वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त केली. गेल्या दहा दिवसातील ही सोने तस्करीची तिसरी घटना असून सोमवारी एका कोटी अकरा लाख रुपयांची सोन्याची तस्करी पकडण्यास गोवा कस्टम विभागाला यश आले होते. गोवा कस्टम आयुक्त मिहीर ... Read More »

अपघाती गोळी लागून रिवणात एकाचा मृत्यू

शिवसरे रिवण येथे शिकारीसाठी गेलेला मॉरिस डायस (२८) याचा घरी परतत असताना अचानक बंदुकीतून गोळी उडून त्याचा मृत्यू झाला. शिकारीहून मोटारसायकलने तो घरी येताना अचानक भरलेल्या बंदुकीतून गोळीचा बार उडाला व डाव्या बाजूच्या काखेत गोळी घुसली. काल मंगळवारी सकाळी ७ वा. ही घटना घडली. मोटरसायकल पडल्याचा आवाज आल्यावर त्याचे वडील व कुटुंबीय घटनास्थळी आले. त्यांनी एकशेआठ बोलावली पण तोपर्यंत त्याचे ... Read More »

‘त्या’ आमदारांशिवाय बहुमत चाचणी घटनाविरोधी ठरेल ः कमलनाथ

>> राज्यपालांना मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांना बहुमत चाचणीवरून पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी बेंगळुरूत कैद करून ठेवलेल्या आमच्या आमदारांशिवाय जर बहुमत चाचणी झाली, तर ते घटनाविरोधी ठरेल असे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेसच्या १६ आमदारांना ओलीस ठेवले आहे असा थेट आरोपही कमलनाथ यांनी पत्रात केला आहे. राज्यपालांनी या प्रकरणी योग्य ... Read More »

पर्रीकर आधुनिक गोव्याचे शिल्पकार ः मुख्यमंत्री

>> मनोहर पर्रीकर यांचा मिरामार येथे पहिला स्मृतिदिन गोव्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी मनोहर पर्रीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच त्यांना आधुनिक गोव्याचा शिल्पकार असे म्हटले जात आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सांगितले. मनोहर पर्रीकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त काल मिरामार येथील त्यांच्या स्मृतिस्थळाजवळ त्यांना श्रद्धाजंली वाहताना डॉ. सावंत यांनी वरील उद्गार काढले. पर्रीकर यांच्यासारख्या दूरदृष्टी लाभलेल्या नेत्याला गोवा ... Read More »

युरो चषक फुटबॉल, फ्रेंच ओपन स्पर्धा पुढे ढकलल्या!

>> कोरोनाचा क्रीडा जगताला जरबदस्त फटका >> अनेक स्पर्धा रद्द ‘कोरोना विषाणू’चा जोरदार फटका जागतिक क्रीडा विश्वाला बसला आहे. या व्हायरसच्या भीतीमुळे अनेक प्रतिष्ठित स्पर्धा पुढे ढकलण्यात किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मानाच्या अशा युरो चषक फुटबॉल स्पर्धा आणि फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धांचाही समावेश आहे. युरो चषक स्पर्धा यंदा १२ जून ते १२ एप्रिलपर्यंत खेळविण्यात येणार होती. परंतु ... Read More »

स्पोर्टिंगने वास्कोला बरोबरीत रोखले

>> गोवा प्रो-लीग स्पोर्टिंग क्लब दी गोवाने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करताना वास्को स्पोर्ट्‌स क्लबला २-२ असे बरोबरीत रोखत गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत काल धुळेर स्टेडियमवरील सामन्यात गुण विभागून घेतले. बरोबरीमुळे स्पोर्टिंगचे ४४ गुण झाले असून ते गुणतक्त्यात अव्वल स्थानी आहेत. तर वास्को स्पोर्ट्‌स क्लबने आपल्या शेवटच्या सामन्यातील बरोबरीसह २० गुणांसह अभियानाची समाप्ती केली. अनिल गावकर (६वे ... Read More »