Daily Archives: March 17, 2020

पोकळी भरून काढताना

स्व. मनोहर पर्रीकर यांची आज पहिली पुण्यतिथी. उद्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारलाही एक वर्ष पूर्ण होईल. काळ कसा चित्त्याच्या वेगाने पळत असतो. गेल्या वर्षभरात राज्यात मांडवी – जुवारीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, परंतु स्व. मनोहर पर्रीकर यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि करारी प्रशासनाच्या स्मृती मात्र अजूनही पुसट झालेल्या नाहीत. त्यांच्या दूरदर्शित्वातून उभे राहिलेले आणि अजूनही पूर्णावस्थेकडे वाटचाल करणारे विविध ... Read More »

कार्यकर्त्यांच्या नजरेतून मनोहर पर्रीकर…

स्व. मनोहर पर्रीकर यांची आज प्रथम पुण्यतिथी. त्यांच्याविषयी नेहमीच त्यांचे कुटुंबीय, बालमित्र, स्नेही आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून वेळोवेळी भरभरून लिहिले गेले आहे. आम्ही यावेळी लिहिते केले आहे, पणजीतील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना… कार्यकर्त्यांच्या कामांचे स्मरण ठेवायचे – राजेंद्र भोबे स्व. मनोहर पर्रीकर हे आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व होते. पर्रीकर यांनी आपल्या स्वभावातील वेगळ्या गुणांच्या आधारावर समाजात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण ... Read More »

देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या ११०

कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. त्यामुळे देशात एकूण कोरोना रुग्णांच्या संशयितांची संख्या ११० झाली आहे. दरम्यान, स्पेनमध्ये गेल्या २४ तासांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्पेनमध्ये कोरोनाचे दोन हजार नवे रुग्ण आढळले. युरोपमध्ये करोनामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये इटलीनतंर स्पेनचा क्रमांक असून मोठा फटका बसला आहे. स्पेनमधून जारी करण्यात आलेल्या ... Read More »

झुवारीनगर येथे कारने ठोकरल्याने दोन युवक ठार

झुवारीनगर वास्को येथे काल पहाटे साडेसहाच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. झुवारीनगर येथील बिट्‌स पिलानीसमोर ही घटना घडली. काल सोमवारी पहाटे साकवाळ झरी येथील दर्शन लमाणी (१४) व अनिल राठोड (१६) हे दोन युवक बिट्‌स पिलानीसमोर जॉगिंग करत होते. त्यावेळी वेर्णा येथून वास्कोच्या दिशेने भरधाव वेगाने जाणार्‍या आय २० कारने (केए ५१ एमएम १५०१) ... Read More »

आमोणा अपघातात दुचाकीचालक ठार

आमोणा विर्डी मुख्य जंक्शनवर रविवारी रात्री झालेल्या स्वयंअपघातात गोकुळवाडी साखळी येथील अभय वसंत परांजपे (४४) यांचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर स्वरूपाची जखम झाल्याने त्यांना साखळी सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्पितळातून गोमेकॉत नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. अभय परांजपे हे आपल्या स्पेंडर मोटरसायकलने रात्री १०.३० नंतर फोंड्याच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी कोणाला तरी लिफ्ट दिली होती. ते विर्डी पूल ... Read More »

सुरक्षेबाबतचा आढावा घेऊनच जाहीर प्रचार सभांना मान्यता

>> निवडणूक आयोगाकडून स्पष्ट राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभांना आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित अधिकार्‍यांकडून मान्यता दिली जाणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर सभांवर निर्बंध घालण्याची सूचना करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर प्रचार सभांना मान्यता देण्याबाबत स्पष्टीकरण केले आहे. मतमोजणी केंद्रे जाहीर दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ... Read More »

मनोहर पर्रीकर यांचा आज प्रथम स्मृतीदिन

गोव्याचे लोकनेते बनण्याचे भाग्य लाभलेले दिवंगत मुख्यमंत्री व माजी केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज प्रथम वर्ष स्मृतीदिन असून त्यानिमित्त त्यांना भाजपतर्फे सर्व मतदारसंघांत तसेच पणजी व मडगांव येथील पक्षाच्या कार्यालयात व मिरामार येथील त्यांच्या समाधीवर श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुठेही श्रद्धांजलीसाठीचा मोठा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद ... Read More »

पर्रीकरांचे चरित्र एप्रिलमध्ये बाजारात

मनोहर पर्रीकर यांच्या संपूर्ण जीवनाचा आढावा घेणारे त्यांचे चरित्र एप्रिल महिन्यात बाजारात येणार आहे. ‘पेंग्विन रेण्डम हाऊस’ या प्रकाशन संस्थेने छापलेले हे पुस्तक गोव्यातील पत्रकार सद्गुरु पाटील व मायाभुषण नागवेकर यांनी लिहिले आहे. इंग्रजीतील या चरित्राची पेंग्विनने सोमवारी घोषणा केली होती. सद्गुरु पाटील यांनी ‘गोव्याचे राजकारण व पर्रीकर’ असा विषय घेऊन एक पुस्तक लिहिलेले आहे. यावेळी पाटील व मायाभूषण यांनी ... Read More »

मध्यप्रदेशात आजच बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश

>> भाजपच्या याचिकेवर आज सुनावणी मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पत्र लिहून आजच मंगळवारी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला आहे. तर दुसरीकडे भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे. कमलनाथ सरकारने आज बहुमत सिद्ध केले नाहीते सरकार अल्पमतात जाणार आहे. काल मध्य प्रदेश विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विधानसभेचे अध्यक्ष प्रजापती ... Read More »

भागीदार्‍यांनी गाजला आयएसएलचा सहावा मोसम

इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) सहावा मोसम लक्षणीय आणि संस्मरणीय ठरला. देशातील प्रमुख फुटबॉल लीग असे आयएसएलचे स्थान निर्माण होत आहे. या स्पर्धेतील कामगिरीला यंदा प्रथमच एएफसी चँपीयन्स लीग गटामधील प्रवेशाच्या रुपाने बक्षीस नक्की झाले. हे घडत असताना तरुण खेळाडूंनी प्रेरणादायी कामगिरी केली. मैदानावर तसेच मैदानाबाहेर काही लक्षणीय भागीदार्‍या जुळून आल्या. आधी तरुण खेळाडूंकडे वळूयात. सर्वप्रमथ सुमीत राठीचे नाव घ्यावे लागेल. ... Read More »