Daily Archives: March 16, 2020

निर्बंध ऐच्छिक का?

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अखेर गोवा सरकारने सार्वजनिक ठिकाणांवर काही निर्बंध जारी केले. अमेरिकेसह संपूर्ण जगभरामध्ये अशी काळजी घेतली जात असताना आणि भारतामध्येही विविध राज्यांमध्ये राज्य प्रशासनांकडून उपाययोजना केल्या जात असताना गोवा सरकार मात्र स्वस्थ होते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन आपण आपल्या सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंधांची शिफारस केली असल्याचे जाहीर केल्यानंतर शेवटी एकदाचा ... Read More »

कॉंग्रेस पक्षाला नेतृत्वाच्या पोकळीचा ङ्गटका

ल. त्र्यं. जोशी खरे तर छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या तीन महत्वाच्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर आणि महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्यात भाजपाला सत्तावंचित केल्यानंतर कॉंग्रेसला आपला प्रभाव वाढविण्याची चांगली संधी होती, पण त्यांच्याजवळ परिश्रमी, कल्पक आणि सक्षम नेतृत्वच नसल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. सक्षम नेतृत्वाच्या अभावी एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला कसा धक्का बसू शकतो याचे प्रात्यक्षिक गेल्या आठवड्यात मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे ... Read More »

देशात कोरोना रुग्णांची संख्या १०२

>> महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण, केंद्राकडून कोरोना आपत्ती घोषित देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत असून देशात १०१ संशयित रुग्ण सापडले आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जगभरात आत्तापर्यंत ५८३३ जणांनी आपले प्राण करोनामुळे गमावले आहेत. इटलीत कोरोनाच्या मृतांचा आकडा १२०० च्या वर गेला आहे. अमेरिका आणि स्पेनने आणीबाणी घोषित केली आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव ... Read More »

मुख्यमंत्र्यांची प्रचारसभेसंबंधीची सूचना बेकायदा ः चोडणकर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांना जिल्हा पंचायत निवडणूक प्रचार सभांना मान्यता देण्याची केलेली सूचना मुख्यमंत्र्याच्या अधिकार कक्षेच्या बाहेर आणि बेकायदा आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांना जिल्हा पंचायत निवडणूक जाहीर प्रचार सभांना मान्यता देऊ नये, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका पत्रकार परिषदेत शनिवारी केली होती. ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणुकीत प्रचाराच्या दोन फेर्‍या पूर्ण

>> सदानंद तानावडेंची माहिती भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या दोन फेर्‍या आतापर्यंत पूर्ण केल्या असल्याची माहिती काल प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आपण स्वत: तसेच मंत्री व पक्षाचे आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने पक्षाच्या उमेदवरांसाठी प्रचार करीत असल्याचे तानावडे म्हणाले. आपण स्वत: उत्तर व दक्षिण गोव्यातील मिळून एकूण २२ मतदारसंघांत ... Read More »

दाबोळी विमानतळावर १.११ कोटींचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानातून (एआय९९४) १ कोटी ११ लाख ५८ हजार ८८४ रुपयांची २९७६ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची बिस्किटे जप्त केली. ही बिस्किटे विमानाच्या प्रसाधनगृहात लपवून ठेवण्यात आली होती. दाबोळी विमानतळावर काल रविवारी उतरलेल्या या विमानात प्रवाशांची झडती कस्टम अधिकार्‍यांनी घेतली असता त्यांना विमानाच्या प्रसाधनगृहात एक लहान बॅगेत ही बिस्किटे आढळली. कस्टम अधिकार्‍यांनी त्याविषयी विमानातील प्रवाशांकडे विचारणा केली ... Read More »

सोनसोडोत कचरा प्रकल्पाला आग

सोनसोडो कचरा यार्डातील कचर्‍याला काल रविवारी सायंकाळी पुन्हा आग लागली. ती विझविण्यासाठी रात्रौ उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करीत होते. मडगाव दलाचे चार बंब आग विझविण्यात मग्न होते. आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच विभागीय अधिकारी नितीन रायकार यांनी वेर्णा व फोंडा येथून आणखी दोन बंब मागविले. रस्त्यालगत कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते व तो कचरा ठेवला होता त्याला आग ... Read More »

अचंथाची जेतेपदाला गवसणी

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने आपला दशकभराचा आयटीटीएफ जेतेपदाच्या दुष्काळ काल रविवारी संपवताना आयटीटीएफ चॅलेंजर प्लस ओमान ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत कमल याने पोर्तुगालच्या अव्वल मानांकित मार्कोस फ्रेटस याचा ६-११, ११-८, १२-१०, ११-९, ३-११, १७-१५ असा पराभव केला. २०१० साली इजिप्त ओपन किताब जिंकल्यानंतर जेतेपद प्राप्त करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. २०११ ... Read More »

‘ज्ञानप्रसारक’ फुटबॉल स्पर्धा उत्साहात

म्हापसा येथील ज्ञानप्रसारक विद्यालयाच्या प्राथमिक विभागाने गोवा फुटबॉल संघटनेच्या सहकार्याने आयोजित रायझिंग स्टार्स आंतरशालेय आणि आंतरवर्ग फुटबॉल स्पर्धेचा चौथा मोसम धुळेर फुटबॉल मैदानावर झाला. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा फुटबॉल असोसिएशनचे कार्यकारी सदस्य ग्रेगरी डिसोझा, ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पोकळे. ज्ञानप्रसारक विद्यालयाचे व्यवस्थापक दामोदर नाटेकर, पालक शिक्षक संघाचे सल्लागार हरीश मेलवानी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रशांत नार्वेकर, शाळेचे मुख्याध्यापक ... Read More »

जीनो एससी भक्कम स्थितीत

गोवा क्रिकेट संघटनेने आयोजित केलेल्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत (तीन दिवसीय सामने) काल पहिल्या व शुभारंभी दिनी जीनो स्पोटर्‌‌स क्लबने धेंपो क्रिकेट क्लबविरुद्ध मजबूत स्थिती गाठली आहे. धेंपोचा डाव अवघ्या १७० धावांत संपवल्यानंतर जीनोने दिवसअखेर १ बाद ११६ धावा केल्या आहेत. पर्वरी येथील पीसीए मैदानावर हा सामना सुरु आहे. धेंपोकडून मुकुल कसाना याने सर्वाधिक ६६ धावा केल्या. १२२ चेंडूंचा सामना ... Read More »