Daily Archives: March 13, 2020

रजनीची राजकीय उडी

तमिळी थलायवा, अभिनेता रजनीकांत यांनी काल आपल्या भावी राजकीय वाटचालीसंदर्भातले ‘व्हीजन’ चाहत्यांसमोर ठेवले. दक्षिणेत राजकारण आणि सिनेमा हातात हात घालून वावरतात. अगदी एम. जी. रामचंद्रन यांच्यापासून विजयकांत, शिवाजी गणेशन, एम. करुणानिधी आणि जे. जयललितांपर्यंत तामीळनाडूमध्ये सिनेमा आणि राजकारण यांचा घनिष्ठ संबंध राहिला. सिनेमा क्षेत्रातील लोकप्रियतेच्या जोरावर राजकारणात पावले टाकण्याची ही परंपरा आज एकीकडे रजनीकांत आणि दुसरीकडे कमल हसन चालवू पाहात ... Read More »

दिल्लीत दंगल, गल्लीत अमंगल!

शंभू भाऊ बांदेकर या दंगलीचा आढावा घेताना केंद्र सरकार व स्थानिक सरकार यामध्ये जो तिढा आहे तो सुटला तर भविष्यकाळात अशा दंगली तर होणार नाहीतच, पण दिल्लीत सर्वार्थाने सुशासन येईल, असे गृहित धरायला हरकत नाही. नुकतेच देशाची राजधानी दिल्लीमध्ये दंगलीने जे रौद्ररूप धारण केले, त्याचे अमंगल पडसाद देशाच्या गल्लीगल्लीमध्ये उमटले. याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर खेडोपाडी जो शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार ... Read More »

शाळकरी मुलीचे अपहरण करून बलात्कार

>> खुनाचाही केला प्रयत्न; आरोपी १२ तासात जेरबंद ः केपे तालुक्यातील घटना मायणा-कुडतरी पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे बळजबरीने अपहरण करून तिच्यावर अमानुषपणे बलात्कार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सां जुझे आरियल येथील मेलवीन आंतोनियो जुझे फर्नांडिस (२३) या युवकाला काल पोलिसांनी अटक केली व त्याची स्कूटर जप्त केली. पोलिसांनी संशयितावर भा. दं. सं.च्या कलम ... Read More »

भारतातील पहिला कोरोना विषाणूचा बळी कर्नाटकात

>> कर्नाटकातील कलबुर्गी येथील ७६ वर्षीयाचे निधन भारतातील कोरोना विषाणूचा पहिला बळी कर्नाटक राज्यातील ७६ वर्षीय एक वृद्ध ठरला आहे. कोरोना विषाणूची बाधा झाल्याच्या संशयावरून सदर व्यक्तीला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्याचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा निश्‍चित अहवाल आला होता असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्यमंत्री ... Read More »

म्हादईवरील कर्नाटकच्या प्रकल्पाला मंजुरी न देण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

>> मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली भेट; खाणींवरही केली चर्चा म्हादईप्रश्‍नी गोव्याच्या याचिकेवर येत्या जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत कुठल्याही केंद्रीय मंत्रालयातर्फे कर्नाटकच्या म्हादईवरील पाणी प्रकल्पाला मंजुरी दिली जाऊ नये, अशी विनंती आपण गोव्याच्या वतीने काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. म्हादई जलतंटा लवादालाही कार्यकाळ वाढवून मिळाला असल्याची बाब आपण पंतप्रधानांच्या ... Read More »

आयएसएल अंतिम सामना प्रेक्षकांविना खेळविणार

>> कोरोनामुळे निर्णय >> कोरोना ः गोमेकॉत आणखी एक संशयित दाखल कोरोना विषाणूच्या (कोविड -१९) पार्श्‍वभूमीवर फातोर्डा मडगाव येथील स्टेडियमवर येत्या शनिवार १४ मार्च रोजी आयोजित इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा (आयएसएल) अंतिम सामना प्रेक्षकांविना खेळविण्याचा निर्णय आयोजकांकडून काल घेण्यात आला आहे. आयएसएल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी हजारो फुटबॉलप्रेमी एकत्र येणार असल्याने आयोजक प्रेक्षकांच्या आरोग्य सुरक्षेबाबत धोका पत्करू इच्छित नाहीत. ... Read More »

रणजी फायनल रंगतदार स्थितीत

>> बंगाल, सौराष्ट्रला अजिंक्यपदाची समान संधी अनुष्टूप मजुमदारच्या धीरोदात्त फलंदाजीमुळे बंगालचा संघ रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॅकफूटवरून फ्रंटफूटवर आला आहे. सौराष्ट्रसमोर नांगर टाकून राहताना मजुमदारने नाबाद ५८ धावा केल्या आहेत. बंगालचे केवळ चार गडी शिल्लक असून सौराष्ट्रची पहिल्या डावातील धावसंख्या मागे टाकून पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे रणजी करंडक आपल्या नावे करण्यासाठी त्यांना आज शेवटच्या दिवशी ७२ धावांची आवश्यकता ... Read More »

विंडीज लिजंड्‌सचा सलग दुसरा पराभव

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये बुधवारी दक्षिण आफ्रिका लिजंड्‌सने शानदार विजयी सलामी दिली. बुधवारी जगप्रसिद्ध क्षेत्ररक्षक जॉंटी र्‍होडसने फलंदाजीतील कौशल्यही सादर केले. त्याने कर्णधारपदास साजेशी खेळी केली आणि त्याला ऍल्बी मॉर्कलची साथ मिळाली. त्यामुळे आफ्रिकेने वेस्ट इंडीज लिजंड्‌सला सहा गडी राखून हरविले. डी. वाय पाटील स्टेडियमवरील लढतीत विंडीजने आफ्रिकेसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यांनी हे लक्ष्य नऊ चेंडू राखून गाठत बाजी ... Read More »