Daily Archives: March 12, 2020

योग्य कारवाई

गाळात गेलेल्या येस बँकेचे संस्थापक व माजी सर्वेसर्वा राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुप्तचर विभागाने अखेर कारवाईचे पाश आवळले आहेत. ‘जे या बँकेला गाळात जाण्यास कारणीभूत ठरले, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? स्वतः या घोटाळ्यापासून हात वर करून नामानिराळी झालेली ही मंडळी विदेशांत पळून जाणार नाहीत कशावरून? बँकेची गाडी रुळावर आणत असतानाच बँकेने आजवर केलेल्या अत्यंत ... Read More »

तेलयुद्धाचा नवा अध्याय…

शैलेंद्र देवळणकर कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात आपला वरचष्मा प्रस्थापित करण्यासाठी सुरु असलेला संघर्ष सध्या विकोपाला गेला आहे. तेलउत्पादक देशांनी किती तेलउत्पादन करायचे याबाबत ओपेक आणि रशिया यांच्यातील चर्चा ङ्गिस्कटल्या आहेत. त्यामुळे ओपेक राष्ट्रांना शह देण्यासाठी रशियाने तेलउत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास जागतिक तेलबाजारात रशियाचा हिस्सा वाढेल, हे लक्षात घेऊन सौदी अरेबियाने तेलाच्या किमतीत २५ टक्क्यांची लक्षणीय घट केली ... Read More »

विदेशातून आलेले दोन संशयित कोरोना रुग्ण गोमेकॉत दाखल

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना खास वॉर्डात दोन कोरोना संशयास्पद रुग्णांना बुधवारी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. कोरोनाच्या संशयावरून दाखल दोघेही स्थानिक आहेत. गेले काही महिने त्यांचे विदेशात वास्तव्य होते. वास्को येथील एका २७ वर्षीय युवक आणि साखळीतील २३ वर्षीय महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वास्कोतील सदर युवक एका बोटीवर काम करीत होता. ... Read More »

पंतप्रधानांच्या हाती देश सुरक्षित ः ज्योतिरादित्य

>> औपचारिकपणे भाजपात प्रवेश बंडखोर कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमनांची उधळण करीत येथील भाजप मुख्यालयात भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भाजपात प्रवेश केला. भारताचे भवितव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे. मोदींच्या धोरणांमुळे आपण प्रभावित झालो आहे, अशा शब्दात पंतप्रधानांविषयी शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लोक सेवा करण्यासाठी आपल्याला व्यासपीठ ... Read More »

खाण घोटाळा ः एसआयटीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मडगाव येथील खास न्यायालयाच्या खाण घोटाळा प्रकरणात समीर व अर्जुन या साळगावकर बंधुंना दोषमुक्त करण्याच्या निवाड्याला आव्हान देणारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) याचिका काल फेटाळली. खाण खात्याचे तत्कालीन संचालक प्रसन्न आचार्य यांनी २०१४ मध्ये खाण घोटाळा प्रकरणी तक्रार दाखल केली होती. वर्ष २००९ मध्ये खाण घोटाळ्याचे प्रकरण घडल्याचे तक्रारीत म्हटले होते. खाण प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त ... Read More »

…म्हणून दंगलग्रस्त भागांना भेट देणे टाळले ः अमित शहा

राजधानी दिल्लीत अलीकडेच झालेल्या दंगलीसंदर्भात काल लोकसभेत विरोधी नेते अधीर रंजन चौधरी यांच्या जेव्हा दिल्ली जळत होती तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करत होते या प्रश्‍नाला शहा यांनी उत्तर दिले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आपल्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने तसेच आपण दंगलग्रस्त भागात गेल्यास आपल्या सुरक्षेसाठी त्या यंत्रणांवर दबाव येण्याच्या शक्यतेने आपण तेथे जाणे टाळले असे स्पष्टीकरण शहा ... Read More »

जिल्हा पंचायतींच्या डिजिटल मतदार याद्या कॉंग्रेसला द्याव्यात

>> चोडणकरांचे निवडणूक आयोगाला साकडे : बीएलओंकडून मतदार स्लिप्सही नाहीत जिल्हा पंचायत निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अजूनही कॉंग्रेस पक्षाला मतदारांच्या डिजिटल याद्या देण्यात आलेल्या नसून पक्षाने याबाबत ११ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहून त्याची कल्पना दिलेली आहे. आयोगाने पक्षाला आता डिजिटल प्रती पुरवण्याची सोय करावी, अशी मागणी केली असल्याची माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल ... Read More »

भारत-आफ्रिका पहिली वनडे आज

>> पावसाचा व्यत्यय शक्य >> भुवनेश्‍वर, पंड्या, धवन करणार पुनरागमन भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळविला जाणार आहे. पाहुणा संघ ऑस्ट्रेलियाला ‘व्हाईटवॉश’ देऊन भारतात दाखल झाला आहे तर यजमान संघाला न्यूझीलंडविरुद्ध ‘व्हाईटवॉश’च्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. द. आफ्रिकेचा संघ आपली विजयी दौड कायम राखण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार असून यजमानांना मात्र पराभवाची मालिका ... Read More »

इंडिया लिजंड्‌सच्या विजयात पठाण चमकला

अनऍकॅडमी आयोजित रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये डी. वाय. पाटील स्टेडियमवर इंडिया लिजंड्‌स संघाने आपली विजयी मालिका कायम राखताना श्रीलंका लिजंड्‌स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. इरफान पठाणच्या फटकेबाजीमुळे भारतीय संघाला हा विजय संपादन करता आला. पठाणने फलंदाजीत नाबाद ५७ तर गोलंदाजीत १ बळी घेतला. संघाचा कर्णधार सचिन तेंडुलकरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिलकरत्ने दिलशान आणि रोमेश ... Read More »