Daily Archives: March 9, 2020

आता फाशीच!

निर्भया अत्याचार प्रकरणातील चारही आरोपींना येत्या २० मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. गेल्या जानेवारीपासून फाशीची तारीख निश्‍चित होण्याची ही चौथी वेळ आहे आणि ज्या प्रकारे या आरोपींनी आजचे मरण उद्यावर ढकलण्यासाठी आपल्या न्यायप्रक्रियेच्या उदारतेचा गैरफायदा घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, तो पाहिला तर या तारखेसही ही फाशी खरेच होणार का याबाबत जनतेच्या ... Read More »

राहुलच्या पदारोहणाची तयारी

ल. त्र्यं. जोशी नागरिकत्व कायद्याच्या विरोधात अल्पसंख्यक समाजाला चेतविण्याचे त्यांनी केलेले कामच पक्षाला तारु शकेल अशी भावना असलेला मोठा वर्ग कॉंग्रेस पक्षात आहे. ज्या पध्दतीने प्रसारमाध्यमेही त्यांनाच उचलून धरतात ते पाहता कॉंग्रेसला अजूनही राहुलशिवाय पर्याय नाही, असे वातावरण तयार केले जात आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात कॉंग्रेसचे अध्यक्षपद त्यांच्याकडे पुन्हा आले तर ते आश्चर्य ठरणार नाही. कॉंग्रेस कार्यकारिणीची लवकरात लवकर निवडणूक ... Read More »

राज्यात लोककलाकारांमध्ये सरकारी शिगमोत्सवाबाबत संभ्रमाचे वातावरण

>> ऐन वेळी रद्द झाल्यास आर्थिक नुकसानीची भीती; तरीही कलाकारांच्या तालमी सुरू कोरोना विषाणूंच्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर गोव्यात सरकारी शिगमोत्सव होईल की नाही याविषयी अनिश्‍चितता निर्माण झाल्याने पणजी, मडगाव, वास्को, फोंडा व अन्य शहरांतील सरकारी शिगमोत्सवात भाग घेणार्‍या लोककलाकारांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. या लोककलाकारांनी चित्ररथ, रोमटांमेळ व अन्य लोकनृत्यांच्या कार्यक्रमांसाठी सध्या अथकपणे तालमी सुरू केलेल्या असून लागणारे साहित्यही विकत घेतलेले ... Read More »

शिगमोत्सवावर निर्णय मुख्यमंत्रीच घेतील

>> आजगांवकरांची माहिती कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या भीतीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील शिगमोत्सव रद्द करावा की काय याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी काल दै. नवप्रभाशी बोलताना सांगितले. अद्याप त्याबाबत गोवा सरकारने कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आरोग्य विषयक उच्चस्तरीय समितीकडून शिगमोत्सव रद्द केला जावा, अशी जर मुख्यमंत्र्यांना शिफारस करण्यात आली तर मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील. ... Read More »

वेर्णा : येथे काल झालेल्या भीषण अपघातात जोशुआ बार्रेटो, रोहन सिक्वेरा व इथन फर्नांडिस हे तिघेजण ठार झाले. अपघातात सापडलेल्या गाडीचे दृष्य. जखमींपैकी एकाचा मृत्यू इस्पितळात उपचारांदरम्यान झाला. Read More »

कोरोना : संशयित रुग्णांची संख्या ३९ वर

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काल ३९ वर गेली. केरळात काल ५ कोरोनाचे संशयित रुग्ण आढळून आल्याने ही वाढ झाली आहे. केरळमध्ये आढळून आलेले सदर संशयित गेल्या महिन्यात इटली येथून भारतात आले होते. मात्र ते सर्वजण विमानतळावरील तपासणी टाळण्यात यशस्वी ठरले होते. दरम्यान केरळच्या के. के. शैलजा यांनी सांगितले की राज्यात आणखी काही कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने राज्यात हाय अलर्ट जारी ... Read More »

येस बँक : राणा कपूर यांना ३ दिवस कोठडी

>> कन्या रोशनी कपूर यांना विमानतळावर ईडीने घेतले ताब्यात लंडनला जाणार्‍या विमानात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या येस बँकेच्या संस्थापक राणा कपूर यांची कन्या रोशनी कपूर यांना काल ईडीच्या अधिकार्‍यांनी विमानतळावर रोखले. ईडीने त्याआधीच राणा कपूर यांचे जावई आदित्य यांच्यासह त्यांच्या पूर्ण कुटुंबावर लुक आऊट नोटीस बजावली होती. दरम्यान रविवारी ईडीने अटक केलेले राणा कपूर यांना विशेष न्यायालयासमोर उभे केले असता ... Read More »

कोरोना : ‘दाबोळी’वर प्रवाशांची तपासणी नाही : विजय सरदेसाई

गोवा सरकार कोणतीही गोष्ट गंभीरपणे घेत नसून कोरोना विषाणूंच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात सरकारी शिगमोत्सवाचे आयोजन करावे की नाही याचा सरकारने निर्णय घ्यायला हवा. गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नका अशी केंद्र सरकारने जी सूचना केलेली आहे ती आपणाला मान्य आहे की नाही याचा विचार करून पुढे काय करायचे याचा निर्णय सरकारने घ्यावा, असे गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ... Read More »

काश्मीरात नव्या राजकीय पक्षाची स्थापना

>> पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स, कॉंग्रेस, भाजप नेते सहभागी पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीचे (पीडीपी) नेते तथा माजी वित्त मंत्री अल्ताफ बुखारी यांनी जम्मू काश्मीरमध्ये नव्या राजकीय पर्यायाच्या स्वरूपात जम्मू अँड काश्मीर अपनी पार्टी (जेकेएपी) या नव्या पक्षाची स्थापना केली असून जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कृषी पदवीधर असलेल्या ६० वर्षीय बुखारी यांनी काल आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ... Read More »

ऑस्ट्रेलियाला पाचव्यांदा विश्‍वविजेतेपद

>> टीम इंडियाचे उपविजेतेपदावर समाधान ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात टीम इंडियाचा ८५ धावांनी एकतर्फी पराभव करत टी-ट्वेंटी विश्‍वचषकावर पाचव्यांदा नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या ऍलिसा हिली आणि बेथ मूनी यांची शतकी भागीदारी आणि गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाची डाळ शिजू दिली नाही. ऑस्ट्रेलियाने भारताला २० षटकांत १८५ धावांचे आव्हान दिले. त्यानंतर भारताचा डाव १९.१ षटकांत अवघ्या ९९ धावांत आटोपला. विजेतेपदाच्या या लढतीत मोठी ... Read More »