Daily Archives: March 7, 2020

येस बँक गाळात

देशातील पाचव्या क्रमांकावरील बँक असलेली ‘येस बँक’ गाळात चालल्याचे पाहून रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करीत नुकतेच एका महिन्यासाठी तिच्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना स्वतःच्या कोणत्याही खात्यातून पन्नास हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. भपकेबाज कार्यालये आणि नखरेल कार्यसंस्कृतीच्या आड बेशिस्त प्रशासन असले की या सार्‍या देखाव्याचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कसा कोसळतो त्याचे हे ताजे मासलेवाईक उदाहरण ठरले आहे. ... Read More »

मुत्सद्देगिरीत भारताला लाभ

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) गेल्या काही वर्षांत भारताच्या आर्थिक, सामरिक व राजकीय मुत्सद्देगिरीमुळे अमेरिका भारताला प्राधान्य देऊ लागल्यामुळे दक्षिण आशियातील लष्करी, सामजिक, आर्थिक आणि राजकीय संतुलन बदलून गेली आहेत. त्यामुळेच आजवर अफगाण शांतीवार्तांमध्ये भारताची भलावण न करणार्‍या अमेरिकेने चीन व पाकिस्तानच्या विरोधाला डावलून दोहा येथे संपन्न झालेल्या ‘यूएस तालीबान पीस अकॉर्ड’ मध्ये भारताला सादर आमंत्रित केले. दुसर्‍या महायुद्धानंतर सुरू झालेल्या ... Read More »

सामूहिक कार्यक्रम शक्यतो टाळा ः आरोग्यमंत्री

भारतात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने राज्यांना काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्यात मोठ्या संस्ख्ेयने लोक एका ठिकाणी जमतील असे सामूहिक कार्यक्रम टाळावेत. शक्यतो असे कार्यक्रम कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत पुढे ढकलावेत. असा एखादा कार्यक्रम करावाच लागला तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती राज्यांनी आयोजकांना द्यावी, असे म्हटले आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ... Read More »

छाननीनंतर २३६ उमेदवारी अर्ज वैध

>> जिल्हा पंचायत निवडणूक, ७० अर्ज फेटाळले राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननीनंतर २३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आज शनिवार ७ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर जिल्हा पंचायतीचे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ११९ आणि ... Read More »

म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रिय जलशक्ती मंत्र्यांची भेट

>> गोव्याला विश्‍वासात घेऊन निर्णय घेण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन गोवा सरकारला विश्वासात घेतल्याशिवाय कर्नाटकच्या म्हादई नदीवरील कुठल्याही प्रस्तावावर निर्णय घेऊ नये, अशी मागणी काल केली.यावेळी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांची उपस्थिती होती. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई पाणी तंटा लवादाचा निवाडा अधिसूचित केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली ... Read More »

येस बँक खातेदारांना महिन्याला ५० हजारच काढता येणार

सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. दरम्यान, निर्बंधांंमुळे ग्राहकांमध्ये घबराट असून, ... Read More »

गोव्यात खातेधारकांत खळबळ

>> रिझव्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध लादल्याने गोव्यातील येस बँकेत गुंतवणूक केलेले ठेवीदार आणि बँक खातेधारकांमध्ये खळबळ माजली आहे. येस बँकेच्या पणजी शहरातील शाखेत खातेदार आणि गुंतवणुकदारांनी काल गर्दी केली होती. तसेच राज्यातील इतर भागांतील शाखांतही ़खातेदारांनी गर्दी केली होती. गुंतवणूकदार व बँक खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्राहकांनी बँकेच्या शाखांशी संपर्क साधून आरबीआयच्या निर्बंधाबाबत माहिती जाणून घेतली. ग्राहकांना ... Read More »

दुबईची राजकन्या गोव्यात येणार होती, पण…

>> तीन वर्षांनी उलगडला पलायनाचा थरार दुबईची राजकन्या आपल्या पित्यापासून सुटका करून घेण्यासाठी कार, डिंगी, जेट स्की अशा नानाविध साधनांची मदत घेऊन दुबईहून पळाली खरी, परंतु मार्च २०१८ मध्ये गोव्याच्या वाटेवर असतानाच तिला अरबी समुद्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाने व एका विशेष कमांडो पथकाने रोखले आणि परत पाठवले..! एखाद्या थरारक चित्रपटातच शोभेल अशी ही कहाणी तीन वर्षांपूर्वी घडली, परंतु त्या पलायनाच्या ... Read More »

कायतान, लक्ष्मीनारायण उपांत्य फेरीत दाखल

सेंट कायतान मेरशी क्लबने नागेश युथ क्लब फोंडावर ५ गडी राखून तर लक्ष्मीनारायण स्पोटर्‌‌स क्लबने महारुद्र रायझिंग स्टारवर २ धावांनी विजय मिळवित शर्वाणी स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लबने आयोजित केलेल्या दुसर्‍या स्व. संतोष साळगांवकर स्मृती अखिल गोवा शर्वाणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. संक्षिप्त धावफलक ः नागेश युथ क्लब फोंडा ः २० षटकांत ७ बाद १६९ (केदार नाईक ४०, ... Read More »

विशाल विजयाचे एफसी गोवासमोर आव्हान

>> चेन्नईन एफसीविरुद्ध आज घरच्या मैदानावर होणार सामना इंडियन सुपर लीगच्या पहिल्या उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्याच्या लढतीत एफसी गोवा संघाला घरच्या मैदानावर शनिवारी चेन्नईन एफसीविरुद्ध अशक्यप्राय पुनरागमन करावे लागेल. चेन्नईतील १-४ अशा पराभवातून सावरण्यासाठी त्यांना नेहरू स्टेडियमवर सर्वस्व पणास लावावे लागेल. एदू बेदीया परतल्यामुळे गोवा संघ बळकट झाला आहे. चेन्नईत तो वैयक्तिक कारणामुळे खेळू शकला नव्हता. ब्रँडन फर्नांडिस आणि ह्युगो ... Read More »