Daily Archives: March 5, 2020

कमलनाथ संकटात

मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसचे काही आमदार एकाएकी ‘गायब’ झाल्याने तेथील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसचे सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसचे चार, बहुजन समाज पक्षाचे दोन, समाजवादी पक्षाचा एक आणि एक अपक्ष मिळून आठ सरकारसमर्थक आमदार दिल्लीजवळच्या गुरूग्राममधील एका आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्याला असल्याचे आढळून आले. भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशमधील एक माजी मंत्री त्यांच्या तैनातीला असल्याचे स्पष्ट ... Read More »

‘कोरोना’चा जागतिक अर्थव्यवस्थेस फटका

शैलेंद्र देवळणकर चीनच्या भिंतीपल्याड पोहोचलेल्या कोरोना व्हायरस मुळे केवळ जागतिक आरोग्याचाच प्रश्‍न झालेला नसून याची झळ संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेला बसू लागली आहे. चीन हा जागतिक पुरवठा साखळीतील सर्वांत मोठा घटक असून कोरोनाच्या परिणामांमुळे ही साखळीच खंडित झाली आहे. याचा ङ्गटका चीनकडून स्वस्तात आयात करुन चालणार्‍या जगभरातील उद्योगधंद्यांना बसला आहे. कोरोना व्हायरस हा आता केवळ चीनच्या भिंतीआड राहिलेला नसून त्याने सातासमुद्रापार ... Read More »

भारतात कोरोनाबाधित २८ रुग्ण

>> केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची माहिती भारतात आत्तापर्यंत २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसचा भारतातील शिरकाव, धोका आणि त्यासंबधीत उपयायोजनांची माहिती दिली. कोरोनाबाधित रुग्णातील तिघांवर उपचार केल्यावर ते बरे झाल्याची माहितीही यावेळी मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. कोरोनामुळे दिल्ली, नोएडा भागातील नागरिक धास्तावले आहेत. त्यांना दिलासा देण्यास दिल्ली सरकारलाही डॉक्टरांची टीम ... Read More »

दोन संशयित कोरोना रुग्ण गोमेकॉत दाखल

कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्या दोघा रुग्णांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती काल साथीच्या रोगांच्या विभागातील डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली. या दोघाही रुग्णांना कोरोनासाठीच्या वेगळ्या विशेष विभागात ठेवण्यात आले असून त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे की काय हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या रक्ताचे व अन्य नमुने गोळा करून ते पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याची ... Read More »

मडगाव व साखळीत कोरोना रुग्णांसाठी खास वॉर्ड ः राणे

मडगाव येथील टीबी हॉस्पिटल आणि साखळी येथील सामाजिक आरोग्य केंद्रात कोरोना रूग्णासाठी प्रत्येकी १० खाटांचे खास वॉर्ड तयार करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. देशातील काही भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने राज्य सरकारी यंत्रणा सतर्क झाली आहे. मुख्य सचिवांनी खास बैठक घेऊन राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला आहे. या बैठकीला पर्यटन, बंदर ... Read More »

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल ८७ अर्ज दाखल राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी आत्तापर्यंत १७८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवार ५ मार्च २०२० ही अंतिम तारीख आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काल बुधवार दि. ३ मार्चला ८२ उमेदवारांनी ८७ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍यांसमोर दाखल केले आहेत. यात उत्तर ... Read More »

पणजीत १० पासून शिमगोत्सवास प्रारंभ

>> १८ जून मार्गावरून १४ रोजी मिरवणूक पणजी शिमगोत्सव समितीतर्फे १४ मार्च २०२० रोजी शिमगोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सव मिरवणूक १८ जून मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीला संध्याकाळी ठीक ४.३० वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे. शिमगोत्सव मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी ऐनवेळी कुठल्याही पथकाला प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी ... Read More »

मध्यप्रदेशात कॉंग्रेस सरकार अस्थिर?

मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचेसरकार अस्थिर असून कॉंग्रेसचे १५ ते २० आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. तर आता डॅमेज कंट्रोलमध्ये गुंतलेल्या कॉंग्रेसने कमलनाथ सरकार स्थिर असल्याचा दावा केला आहे. आमदारांची कामे होत नसल्यामुळे ते नाराज असल्याचा दावा मिश्रा यांनी केला. मध्यप्रदेशात मंगळवारी रात्री झालेल्या राजकीय घडामोडीत १० आमदार कमलनाथ सरकारमधून बाहेर पडल्याचा दावा ... Read More »

भारत – इंग्लंड उपांत्य लढत आज

गट फेरीत अपराजित कामगिरी केल्यानंतर आज बलाढ्य इंग्लंडविरुद्ध होणार्‍या उपांत्य फेरीत टीम इंडियाला सरस खेळ दाखवावा लागणार आहे. पराजित होणारा संघ महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेबाहेर जाणार असल्याने एखादी चुकदेखील उभय संघांना महागात पडू शकते. यंदाच्या स्पर्धेत भारत वगळता एकाही संघाला आपले सर्व सामने जिंकणे शक्य झालेले नाही. इंग्लंडला नमविल्यास भारत या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. ... Read More »

शफाली वर्मा नंबर १

टीम इंडियाची १६ वर्षीय सलामीवीर शफाली वर्माने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवताना आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारीत प्रथम स्थानी झेप घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल बुधवारी महिलांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारताच्या पुरुष व महिला खेळाडूंचा विचार केल्यास प्रथम स्थान प्राप्त करणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली आहे. शफाली मागील क्रमवारीत १९व्या स्थानावर होती. तिने मोठी झेप घेत ... Read More »