Daily Archives: March 4, 2020

चर्चा तर झाली

‘‘ह्या रविवारी माझे फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम व यूट्यूबवरील सोशल मीडिया अकौंट सोडून देण्याचा विचार करतोय’’ असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केल्याने देशात प्रचंड खळबळ माजली. पंतप्रधानांच्या या घोषणेचा नेमका अर्थ काय यावर नानाविध तर्कवितर्कांना उधाण आले. बहुतेकांना वाटले की, मोदी सोशल मीडियाला कायमचा रामराम ठोकू पाहत आहेत. मग त्यामागच्या कारणांवर चर्चा सुरू झाली. काहींना वाटले, मोदी आता ‘भारतीय ... Read More »

न्यायालये सक्षम करणे गरजेचे

ऍड. प्रदीप उमप लोकसभेत केंद्र सरकारने नुकतीच माहिती दिली की देशातील कनिष्ठ आणि जिल्हा न्यायालयांमध्ये तब्बल ३ कोटी १४ लाख खटले प्रलंबित आहेत. त्यापैकी १४ टक्के खटले तर १० वर्ष ते त्याहीपेक्षा जुने आहेत. न्यायासाठी दिरंगाई होणे हे देखील काही नवीन नाही. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशे न्यायाधीशही नाहीत. यापुर्वीही अनेक वेळा प्रलंबित खटल्यांची चर्चा झाली, परंतू या सर्व व्यवस्थेत सुधारणा ... Read More »

म्हापशात एकाच कुटुंबातील ४ मृतावस्थेत

>> सामूहिक आत्महत्येने गोवा हादरला >> आर्थिक संकटांमुळे टोकाचे पाऊल खोर्ली – म्हापसा येथील गॉडस् गिफ्ट या इमारतीमध्ये शाहू धुमाळे (४५), त्यांची पत्नी कविता धुमाळे (३८) व त्यांचे दोन पुत्र पारस (१०) आणि साईराज (३) हे मूळ आजरा (जि. कोल्हापूर) येथील कुटुंब काल मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली. शाहू यांचा मृतदेह छताला टांगलेल्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आला, ... Read More »

पाचव्या दिवशी ६९ उमेदवारी अर्ज

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत ९० अर्ज राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी ६९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज संबंधित निर्वाचन अधिकार्‍यांकडे काल दाखल केल. उत्तर गोव्यातून ४५ आणि दक्षिण गोव्यातून २४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात इच्छुकांची ... Read More »

मगोपचे आणखीन तीन उमेदवार

मगोपने जिल्हा पंचायतीसाठी तीन उमेदवारांच्या नावाचा समावेश असलेली दुसरी यादी काल जाहीर केली आहे. यापूर्वी १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या कुंभारजुवा मतदारसंघात शैलेश नाईक आणि हरमल मतदारसंघात प्रवीण वायंगणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या धारबांदोडा मतदारसंघातून विंदा गोविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. Read More »

भाजपमध्ये उमेदवारीसाठी चुरस

भाजपला जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काही मतदारसंघात उमेदवार निश्‍चित करताना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. उमेदवारांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. भाजपच्या काही नेत्यांनी पक्षासमोर उमेदवार निवडीबाबत आव्हान उभे केले आहे. जिल्हा पंचायत उमेदवारीसाठी जोरदार चुरस असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना उमेदवार निवडीचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्या थिवी मतदारसंघातील कोलवाळमध्ये ... Read More »

‘सबका विश्‍वास’ महत्त्वाचा ः मोदी

>> भाजप संसदीय मंडळाची बैठक दिल्लीत काल भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीतील हिंसाचाराबद्दल भाऊक झाल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी दिल्ली हिंसाचाराचा थेट उल्लेख टाळला. मात्र ‘सबका साथ’ ‘सबका विकास’च्या सोबतच ‘सबका विश्वास’ हा महत्त्वाचा असल्याचे सांगत खासदारांना मार्गदर्शन केले. माझ्यासाठी पहिला देश आहे आणि त्यानंतर पक्ष आहे. देशात शांतता आणि एकता गरजेची असल्याचे ... Read More »

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी गोव्यातून केवळ तिघांची नोंदणी

>> देशातून ३४ हजार २७९ जणांची नोंदणी केंद्र सरकारने व्यापारी, दुकानदार व स्वयंरोजगार व्यक्तींना वृद्धापकाळात संरक्षण देण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी मागील पाच महिन्यात गोव्यातील केवळ तिघांनी नोंदणी केली आहे. राष्ट्रीय पातळीवर या निवृत्ती वेतन योजनेसाठी ३४ हजार २७९ जणांनी नोंदणी केली आहे. केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोषकुमार गंगवार यांनी ही माहिती लोकसभेत लेखी ... Read More »

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्याने एप्रिल-मेमध्ये पाणी टंचाई : ढवळीकर

कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळवल्याने उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच म्हादईचे पाणी आटू लागले असून एप्रिल व मे महिन्यात म्हादईचे पाणी अगदीच कमी होऊन एक संकट निर्माण होण्याची भीती काल मगो पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सभापती असताना त्यांनी कळसा-भंडुरा प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर कर्नाटकने जलवाहिन्या घालून म्हादईचे पाणी वळवले असल्याचे माध्यमांशी बोलताना ... Read More »

आदेश भंग केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणणार : मुख्यमंत्री

कळसा – भंडुरा येथे पाणी प्रकल्पाचे काम बंद ठेवावे, असा आदेश दिलेला असताना कर्नाटक सरकारने तेथे काम चालूच ठेवून आदेशाचा कसा भंग केला आहे ती बाब गोवा सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे, असे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. म्हादई जल तंटा लवादाने पाणी वाटप संदर्भात जो निवाडा दिलेला आहे त्या संदर्भात गोवा सरकारने जी याचिका ... Read More »