Monthly Archives: March 2020

योगसाधना अंतरंग योग

डॉ. सीताकांत घाणेकर   आपण सर्व वेळोवेळी आपल्या राज्यकर्त्यांकडून सूचना मिळतात त्यांचे पालन करू या. पण त्याचबरोबर शास्त्रशुद्ध योगसाधना करून आपल्या सर्व शक्ती वाढवू या- शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, आत्मिक तशीच रोगप्रतिकारशक्तीसुद्धा!   बालपणात आम्ही एक गीत रेडिओवर ऐकत होतो…. * पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…. – त्या वयात बुद्धी परिपक्व नव्हती म्हणून त्या ओळींचा अर्थ जाणून घ्यावा असे वाटलेदेखील ... Read More »

॥ मनःशांती उपनिषदांतून ॥ सूर्यशून्य प्रदेशात की प्रकाशाच्या देशात?

प्रा. रमेश सप्रे    केवळ स्वतःच्या देहसुखाचा विचार करणार्‍या आसुरी वृत्तीपेक्षा इतरांचा विचार करणारी, दुसर्‍यासाठी त्याग करणारी दैवी वृत्ती असायला हवी. लहानपणापासूनच मुलांना ‘अहंकेंद्री’ (स्वार्थी) न बनवता ‘सहकेंद्री’ बनवलं पाहिजे. त्यांच्यावर सहकार्य, सहसंवेदना, सहजीवन, सहयोग असे ‘सह’त्वाचे म्हणजे सर्वांचा विचार करण्याचे संस्कार करायला हवेत.   मानवजन्माला कर्मयोनी म्हणतात. इतर पशु-पक्षी सार्‍यांची भोगयोनी असते. म्हणजे फक्त जगणं, जिवंत राहणं एवढाच उद्देश ... Read More »

भो राम, माम् उद्धर

प्रा. रमेश सप्रे   यासाठी हवा वज्रसंकल्प… (करोना) विषाणूच्या कहरावर (श्रीराम) मात करण्यासाठी विष्णूचा गजर करण्याचा. श्रीरामचरित्राचं चिंतन आणि रामनामाचं स्मरण म्हणजे केवळ उच्चारण (जप) नव्हे तर रात्रीचा दिवस करून स्वतःचं चरित्र सुधारण्यासाठी साधना करण्याचा.   रामनवरात्राानिमित्तानं प्रवचनमाला सुरु होती. गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काळ्या रामाच्या मंदिराची कल्पक सजावट नि आकर्षक रोशणाई केली होती. उत्सवाची मध्यवर्ती उद्दिष्टं होती समाजसंघटन नि ... Read More »

अद्भुत

माधुरी रं. शे. उसगावकर   मनातील नकारात्मक भावना दूर करून मनाला स्वच्छ व शुद्ध करण्यासाठी ध्यानाची जोड द्यावी. ब्रह्मांडातील शक्तीबद्दल दृढ विश्‍वास बाळगा. हा विश्‍वास नक्कीच किमया करून दाखवतो. समर्पण आश्रमातील १९१६तील अनुभूती जी माझ्या जीवनात एक नवा प्रकाश घेऊन आली. नवरात्राौत्सवात शिरोडा येथील आश्रमाच्या संकुलात राहण्याचा दुर्दम्य योग आला. दैनंदिन कार्यभागास मन उबगले. डोळ्यांचे दुखणे, ताप, अशक्तपणा एक से ... Read More »

नात्यातला गोडवा

गौरी भालचंद्र नात्यांचा जमाखर्च मांडायला गेलं की खूप गोंधळ उडतो कारण नात्यांपेक्षा माणसांचीच गर्दी जास्त होते. नात्यांना मोकळेपणाने श्वास  घेऊ दिला तर त्यांना वाढायला… बहरायला मदतच होईल. एक सांगू खरं खार… नाती हि मनासाठी टॉनिकचं काम करत असतात .आपल्या मनाचं स्वास्थ जपण्यासाठी नाती जपणं खूप महत्वाचं झालं आहे. प्रत्येकालाच मला वाटते नात्यांची… माणसांची गरज असते … पण काहींच्या ते लक्षात ... Read More »

दुवा माणसा- माणसामधला…

अनुराधा गानू   माणसांना जोडून ठेवणार्‍या जोडाला दुवा म्हणतात. पण हा दुवा जर निखळला तर नाती नुसती संपूनच जात नाहीत तर तुटून पडतात. वस्तूंना दुसरा जोड मिळू शकतो पण माणसांना दुसरा दुवा मिळत नाही आणि मग नाती कायमची तुटतात.   दुवा म्हणजे ‘दुवा’ मागणे यातला दुवा नव्हे किंवा एखाद्याला मदत केल्यावर तो आपल्याला ‘दुवा’ देतो तो दुवाही नव्हे! इथे मला ... Read More »

सत्तरीतला मित्रमेळा

श्रीकृष्ण दामोदर केळकर (मु. नानोडा-अस्नोडा)   खरं तर डॉ. आशीर्वाद व आशूने आपल्या वडिलांना त्यांच्या जीवनातील एक अत्युच्च क्षण अनुभवण्यास दिला होता. अरविंदना आणखी बळ मिळाले. नवजीवन जीवन जगण्याचे… बाकीच्या वर्गबंधूंच्या वाढदिवसाला जाण्याचे… एक नवीन उत्साह… एक नवीन आशा… देव्हार्‍यातल्या समईमधली ज्योत मंद करून शयनगृहात येत असताना मधल्या सगळ्या लाईटस् बंद करून आली. दिवसभराच्या कामाच्या दगदगीने कॉटवर अंग ठेवले, तोच ... Read More »

सुंदर माझं गाव!

प्राजक्ता प्र. गावकर (नगरगांव-वाळपई)   खेड्यातील लोक मनाने सोशिक, हळवे व दिलदार स्वभावाचे असतात. आदर कसा करावा हे खेडेगावातील लोकांपासूनच शिकावे. दारात येणारा माणूस आपला असू दे किंवा परका, त्याला ‘या.. बसा..’ असे सांगून प्यायला पाणी देऊन पोटभर जेवण वाढल्याशिवाय जाऊ देत नाहीत. खेडेगाव हा चार अक्षरांचा एक शब्द. पण या शब्दाच्या उच्चारानेच मन आनंदित होते. हे खरेच की खेड्यात गैरसोई ... Read More »

पांडुरोगात पंचकर्म लाभदायी

डॉ. सुरज स. पाटलेकर(श्रीव्यं्‌कटेश आयुर्वेद, मडगांव)   रक्तनिर्मितीस कारणीभूत असणार्‍या अवयवांच्या विकृतीमुळे, रक्ताच्या निर्मितीस आवश्यक असे पदार्थ (लोह, ताम्र, मँगनीज इ.) आहारातून कमी प्रमाणात मिळाल्याने, कोणत्याही कारणाने शरीरातून अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने, अस्थिमज्जेतील (बोन मॅरो) विकृतीमुळे ऍनीमिया म्हणजेच पांडुरोग उत्पन्न होतो.   पांडुरोगाची तुलना आधुनिक वैद्यकशास्त्रातील वर्णित ऍनिमियाशी केली जाते. पांडुरोगामध्ये त्वचा, नख व डोळ्यांच्या पापणीच्या आतील बाजुस पांडुता येते म्हणजेच ... Read More »

कोरोना व्हायरसचे वाढते गैरसमज

  डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)   कोरोनाचा व्हायरस ५५ अंशांपेक्षा जास्त तापमानात नष्ट होतो. त्यामुळे तो शिजवलेल्या, तळलेल्या अन्नात राहूच शकत नाही. त्यामुळे चिकन, अंडी, मासे खायला हरकत नाही. पण हे सर्व पचायला जड असल्याने व उष्ण असल्याने हलके अन्न सेवन केलेलेच उत्तम.   शालांत परीक्षा रद्द झाल्या. गर्दीचे ठिकाण टाळा. हात स्वच्छ पाण्याने परत परत धुवा, सॅनिटायझर्सचा वापर ... Read More »