Daily Archives: February 28, 2020

षड्‌यंत्राचा संशय

दिल्लीतील दंगलीतील मृतांची संख्या काल ३४ वर पोहोचली. दंगलीच्या ज्या तपशीलवार कहाण्या आता समोर येत आहेत, त्या अतिशय अस्वस्थ करणार्‍या आहेत. १९८४ च्या शीखविरोधी दंगलीनंतरची दिल्लीतील सर्वांत भीषण दंगल म्हणून गेल्या चार दिवसांची इतिहासात नोंद होईल यात शंका नाही. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी स्वतः रस्तोरस्ती, गल्लीबोळांतून फिरून सर्व समाजघटकांच्या घेतलेल्या भेटीगाठींतून जनतेला जो विश्वास दिला, त्यामुळे परिस्थिती तूर्त ... Read More »

राजकारण्यांच्या खेळात ‘जीवनदायिनी’ धोक्यात

शंभू भाऊ बांदेकर म्हादईचा लढा कायदेशीरदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या सर्व पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून लढणे ही काळाची गरज आहे. आता केवळ ‘सरकार करील’ या आशेवर थांबता येणार नाही. सरकार आपल्यापरीने प्रयत्न करील, पण जोपर्यंत हा लढा सर्व जनतेचा होत नाही, तोपर्यंत हा लढा यशस्वी करता येणार नाही. नुकतीच म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारची म्हादई जल लवादाचा निवाडा केंद्र सरकारला अधिसूचित करण्यास ... Read More »

जिल्हा पंचायतींसाठी भाजपचे १८ उमेदवार जाहीर

भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आपल्या १८ उमेदवारांची पहिल्या यादीची घोषणा काल केली. उत्तर गोवा जि. पं. साठी १४ आणि दक्षिण गोवा जि. पं. साठी ४ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत ६ विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. येत्या शनिवार २९ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे ... Read More »

विल्सन गुदिन्होंचा जामीन अर्ज हायकोर्टानेही फेटाळला

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मेरशीचे पंच सदस्य प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणातील संशयित विल्सन गुदिन्हो यांचा अटकपूर्व जामीन अर्ज काल फेटाळला आहे. प्रकाश नाईक यांचा १७ जानेवारी २०२० रोजी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांची बहीण अक्षया नाईक यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी विल्सन गुदिन्हो व ताहीर या दोघांच्या विरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ... Read More »

हिंसाग्रस्त दिल्लीत तणावपूर्ण शांतता

>> मृतांची संख्या ३८ वर ः तपासासाठी एसआयटी स्थापन ईशान्य दिल्लीतील जातीय हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या काल ३८ वर गेली. येथील गुरू तेग बहादूर (जीटीबी) इस्पितळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारास रविवारी सुरुवात झाल्यापासून इस्पितळात मृतावस्थेत आणलेल्यांची संख्या २२ एवढी होती. तर इस्पितळात २०० जणांवरील उपचारांदरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस खात्याचे प्रवक्ते एम. एस. रंधावा यांनी ... Read More »

म्हादईवर श्‍वेतपत्रिकेवरील निर्णय मुख्यमंत्री मागे घेण्याबाबत आशा

>> दिगंबर ः सरकारकडून विषयावर राजकारण जीवनदायिनी म्हादईचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कुणी आणि कधी काय काय केले आहे याची सत्यस्थिती केवळ श्‍वेतपत्रिकेतून तमाम गोमंतकीयांना कळू शकते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी श्‍वेतपत्रिका न काढण्याचा आपला निर्णय मागे घेऊन श्‍वेतपत्रिका जारी करण्याच्या आमच्या मागणीची पूर्तता करतील, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सरकारकडून म्हादई प्रश्‍नी ... Read More »

गोवा सरकारची कोळसा खाण देखरेख समिती स्थापन

गोवा सरकारने कोळसा खाण देखरेख समितीची स्थापना केली आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाला मध्यप्रदेशात कोळसा खाण मंजूर झालेली आहे. या खाणीवरील कामकाजावर या समितीकडून देखरेख ठेवली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष उद्योग मंत्री असतील. या समितीमध्ये गोवा राज्य उद्योग संघटनेचे दामोदर कोचर, जीसीसीआयचे अध्यक्ष मनोज काकुलो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे जयवंत देसाई, पृती पाटकर यांचा समावेश आहे. या कोळसा खाणीसाठी ... Read More »

अमित शहा यांना त्वरित राजिनामा देण्याचा निर्देश द्या

>> कॉंग्रेस शिष्टमंडळाचे राष्ट्रपतींना साकडे दिल्लीतील जातीय हिंसाचारप्रकरणी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनवर भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या दंगलीप्रकरणी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला राज धर्म पाळण्याचे निर्देश द्यावेत असे साकडे या शिष्टमंडळाने त्यांना घातले. तसेच याप्रकरणी अपयश आल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजिनामा देण्यास सांगावे अशी विनंती या ... Read More »

कांगारूंनी बांगलादेशला लोळवले

महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील दहाव्या लढतीत काल गुरुवारी विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा ८६ धावांनी दारुण पराभव केला. २० षटकांत १ बाद १८९ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर कांगारूंनी बांगलादेशचा डाव ९ बाद १०३ धावांत रोखला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर सामनावीर ऍलिसा हिली (८३ धावा, ५३ चेंडू, १० चौकार, ३ षटकार) व बेथ मूनी (नाबाद ८१, ५८ चेंडू, ९ चौकार) यांनी ऑस्ट्रेलियाला ... Read More »

लिस्टन, सेरिटन भारतीय संघात

आघाडीपटू जेजे लालपेखलुआ व बचावपटू संदेश झिंगन यांचे दीर्घ कालावधीनंतर भारतीय फुटबॉल संघात पुनरागमन झाले आहे. संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनी कतारविरुद्ध २९ मार्च रोजी मायदेशात होणार्‍या ‘२०२० विश्‍वचषक क्वॉलिफायर’ सामन्यासाठी ४३ सदस्यीय संघाची काल गुरुवारी घोषणा केली. लालेंगमाविया, जेरी माविहिमिंगथांगा, जिकसन सिंग, लिस्टन कुलासो, प्रतीक चौधरी, शुभम सारंगी, रफिक अली सरदार, प्रभसुखन गिल, सुमीत राठी, सेरिटन फर्नांडिस, एडविन सिडनी ... Read More »