Daily Archives: February 27, 2020

दिल्लीत दंगल

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनांनी शेवटी सरळसरळ जातीय दंगलीचे रूप धारण केले. ईशान्य दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचारात वीसहून अधिक ठार, तर शेकडो जखमी झाले आहेत. घरेदारे, वाहने, दुकाने जाळली गेली, नंग्या तलवारी, पिस्तुले घेऊन जमाव बेभान होऊन फिरताना, दिसेल त्यावर हल्ला चढवताना दिसून आला. पत्रकारही त्यातून सुटले नाहीत. दिल्लीत जे घडले ते भयावह आहे. ८४ च्या ... Read More »

ट्रम्प भेटीतून भारताच्या पदरी काय पडले?

शैलेंद्र देवळणकर दोन दिवसांच्या भारत दौर्‍यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भारताच्या प्रगतीवर, विकासावर कितीही स्तुतीसुमने उधळली असली तरी तीन अब्ज डॉलर्सचा संरक्षणसामग्री खरेदी करार वगळता भारताच्या पदरी ठोस काहीही पडलेले नाही. मुळात ही प्रशंसा त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना डोळ्यासमोर ठेवत केली आहे. ‘अमेरिका ङ्गर्स्ट’ या भूमिकेवरुन ते तसूभरही हलले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ... Read More »

झेडपी निवडणूक ः आजपासून अर्ज स्वीकृती

राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास आज गुरुवार दि. २७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून ५ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या निवडणुकीसाठी पेडणे, बार्देश, पणजी, डिचोली, सत्तरी, मुरगाव, सांगे, केपे, धारबांदोडा, काणकोण, फोंडा येथील उपजिल्हाधिकार्‍याची निवडणूक अधिकारी आणि तालुका मामलेदारांची साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली ... Read More »

अमित शहांनी राजिनामा द्यावा

>> सोनिया ः हिंसाचारास जबाबदार असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल पत्रकार परिषदेत दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप केला. दिल्लीतील सध्याच्या स्थितीला केंद्र सरकारबरोबरच अमित शहा जबाबदार आहेत असे गांधी म्हणाल्या. तसेच याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून अमित शहा यांनी त्वरित पदाचा राजिनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांचे हे सामूहिक ... Read More »

दिल्लीतील दंगलग्रस्त भागांची डोवाल यांच्याकडून पाहणी ः मृतांची संख्या २४

केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल देशाच्या राजधानीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर सदर भागांतील स्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले. सर्व भागांमध्ये पोलीस आपले काम बजावित आहेत असे ते म्हणाले. त्यांनी सदर भागांतील नागरिकांशी संवादही साधला. दरम्यान, गेल्या रविवारपासूनच्या हिंसाचारातील मृतांची संख्या २४ वर गेली असून २०० हून अधिक जखमी झाले आहेत. दरम्यान, दिल्लीत काल सीआरपीएफच्या ४५ पलटणी तैनात ... Read More »

‘त्या’ विद्वेषी भाषण करणार्‍यांवर अद्याप एफआयआर का नाही?

>> दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांना खडसावले दिल्लीतील ताज्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर एका याचिकेवरील कालच्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर कडक ताशेरे ओढले. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप आमदार अभय वर्मा व भाजप नेते कपिल मिश्रा यांच्यावर विद्वेष पसरवणारी प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी अजूनही एफआयआर का नोंदविण्यात आले नाही असा सवाल करून न्यायालयाने या नेत्यांच्या सदर भाषणाची व्हिडिओ क्लिप्स पहावे व संबंधितांवर ... Read More »

म्हादई ः श्‍वेतपत्रिकेची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादई प्रश्‍नी श्वेतपत्रिका जारी करण्याची विरोधी आमदारांची मागणी काल फेटाळून लावली. राज्यातील कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप व अपक्ष आमदारांनी म्हादई प्रश्‍नी ३० दिवसात श्वेतपत्रिका जारी करावी, अन्यथा, म्हादई प्रश्‍नी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. म्हादई प्रश्‍नी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करणारे नेते म्हादई प्रश्‍नाला जबाबदार आहेत, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पोलीस मुख्यालयात ... Read More »

टीम इंडिया विजयाची हॅट्‌ट्रिक साधणार?

>> बलाढ्य न्यूझीलंडविरुद्ध आज सामना महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत आज गुरुवारी भारत व न्यूझीलंड या तुल्यबळ संघांमध्ये लढत होणार आहे. मागील वेळेच्या विश्‍वचषक स्पर्धेत भारताने किवी संघाला दणका देत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. यावेळीसुद्धा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास सज्ज झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली आहे. पहिल्या लढतीत विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी ... Read More »

इंग्लंडकडून थायलंडला धुव्वा

कर्णधार हिथर नाईटच्या पहिल्यावहिल्या टी-ट्वेंटी शतकाच्या जोरावर काल बुधवारी आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत इंग्लंडने पदार्पणवीर थायलंडचा ९८ धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या १७६ धावांना उत्तर देताना थायलंडने ७ बाद ७८ पर्यंत मजल मारली. हिथर नाईटने केवळ ६६ चेंडूंत नाबाद १०८ धावा केल्या. १३ चौकार व ४ षटकारांसह तिने आपली शतकी खेळी सजवली. महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकात शतक झळकावणारी नाईट ही केवळ चौथी ... Read More »