Daily Archives: February 26, 2020

ट्रम्प भेटीचे फलित

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटीचे फलित म्हणून तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक खरेदी व्यवहारावर सहमती आणि तीन समझोता करार आणि एक सहकार्य पत्रावर प्रत्यक्षात शिक्कामोर्तब झाल्याचे भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. ज्या तीन अब्ज डॉलरच्या संरक्षणविषयक व्यवहाराविषयी ट्रम्प यांनी वारंवार सांगितले, तो २४ एमएच ६० रोमिओ हेलिकॉप्टर व सहा अपाचे हेलिकॉप्टर यांचा खरेदी व्यवहार ही भारत सरकारसाठी ट्रम्प यांच्या ... Read More »

कीटकनाशके आणि प्रस्तावित कायदा

ऍड. प्रदीप उमप धोकादायक आणि बनावट कीटकनाशकांच्या उत्पादन आणि विक्रीवर अंकुश लावण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित आहे. सुमारे १२ वर्षे माहिती गोळा करून हे विधेयक तयार करण्यात आले असून, संसदेच्या पटलावर लवकरच ते मांडले जाईल. प्रस्तावित कायद्यामुळे कीटकनाशक उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीसाठी नकारात्मक वातावरण तयार होईल, असे सांगून विरोध केला जात आहे. मात्र, सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून मार्ग निघू शकतो. भारतात ... Read More »

म्हादई ः गोव्याची सुप्रीम कोर्टात याचिका ः २ मार्चला सुनावणी

गोवा सरकारने म्हादई नदीवर कर्नाटक सरकारला कुठलाही प्रकल्प उभारणीस अंतरिम स्थगिती द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर २ मार्चला सुनावणी घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारची म्हादई लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यासंबंधीच्या याचिकेला मान्यता दिल्यानंतर गोव्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टिका करून ... Read More »

झेडपी निवडणूक स्थगितीस उच्च न्यायालयाचा नकार

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे कोलवा, गिरदोली आणि उसगाव – गांजे मतदारसंघ राखीव ठेवण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. खंडपीठाने याचिका दाखल करून घेतल्या असून जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या तीन मतदारसंघांना न्यायालयाचा अंतिम निर्णय बंधनकारक राहील, असे खंडपीठाने म्हटले आहे. या याचिकेला अनुसरून संबंधितांना बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत ... Read More »

दिल्लीत हिंसाचाराच्या उद्रेकात १३ मृत्यूमुखी

>> हिंसाचारग्रस्त भागांत निदर्शकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देशाच्या राजधानीत गेल्या रविवारी सुरू झालेले हिंसाचाराचे थैमान सुरूच राहिल्याने काल ईशान्य दिल्लीतील भागांमध्ये निदर्शकांवर दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह १३ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दिडशेजण जखमी झाले आहेत. अनेकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जीटीबी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुमार यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, ... Read More »

भारत-अमेरिका दरम्यानच्या महत्त्वपूर्ण करारांवर सहमती

>> ट्रम्प यांचे पत्रकार परिषदेत सुतोवाच भारत-अमेरिका यांच्यात संरक्षणविषयक व्यवहाराला अंतिम रूप मिळाले असून या अंतर्गत आपाचे आणि एमएच-६० रोमिओ या जगातील सर्वोत्तम हेलिकॉप्टर्ससह अद्ययावत लष्करी सामग्री खरेदीच्या ३ अब्ज डॉलर्स रकमेचा करार उभय देशांदरम्यान होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी उभय देशांदरम्यानच्या ऊर्जा, वित्त व अन्य ... Read More »

आग्वाद संग्रहालयात गोवा मुक्ती लढ्याचाच इतिहास दाखवा ः करमली

आग्वाद येथील तुरुंगातील संग्रहालयात फक्त गोवा मुक्ती लढ्याच्या इतिहासासंबंधी माहितीचा समावेश असला पाहिजे. गोवा मुक्ती लढ्याबाहेर माहितीचा समावेश करण्यास विरोध आहे, असा इशारा ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली यांनी एका पत्रकार परिषदेत काल दिला. गोवा दमण दीव स्वातंत्र्य सैनिक संघटनेने आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पेडणेकर व इतरांची उपस्थिती होती. आग्वाद ... Read More »

पणजीतील आयनॉक्स सहा महिन्यांसाठी राहणार बंद

>> मार्च किंवा एप्रिलपासून सुरू होणार दुरुस्ती पणजीतील आयनॉक्स थिएटरला नवा साज चढवण्याचे काम येत्या मार्च अथवा एप्रिल महिन्यापासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. सप्टेंबर महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. आयनॉक्स मल्टिप्लेक्सची इमारत पाडण्यात येणार नसून केवळ नूतनीकरण करणे, तांत्रिकदृष्ट्या थिएटरचा दर्जा वाढवणे, सुशोभिकरण करणे असेच ... Read More »

बांगलादेशचा डावाने विजय

बांगलादेशने एकमेव कसोटी सामन्यात झिंबाब्वेचा एक डाव व १०६ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटमधील मागील १५ महिन्यांत मिळविलेला बांगलादेशचा हा पहिलाच विजय ठरला. झिंबाब्वेचा पहिला डाव २६५ धावांत संपवल्यानंतर बांगलादेशने आपला पहिला डाव ६ बाद ५६० धावांवर घोषित करत पहिल्या डावाच्या आधारे २९५ धावांची मोठी आघाडी घेतली होती. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी झिंबाब्वेचा दुसरा डाव १८९ धावांत संपला. नईम हसन ... Read More »

नॉर्थईस्टने रोखल्याने चेन्नईनला चौथे स्थान

हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमातील अखेरच्या साखळी सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीला २-२ असे बरोबरीत रोखले. भरपाई वेळेत लालीयनझुला छांगटे याच्या गोलमुळे नॉर्थईस्टला बरोबरी साधता आली. दहा खेळाडूंनिशी खेळावे लागलेल्या चेन्नईयीनला या निकालामुळे तिसरा क्रमांक मिळविता आला नाही, पण बाद फेरीतील त्यांचा प्रवेश यापूर्वीच नक्की झाला होता. एफसी गोवा (१८ सामन्यांतून ३९), एटीके एफसी (१८ सामन्यांतून ... Read More »