Daily Archives: February 25, 2020

नमस्ते ट्रम्प!

जागतिक महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अखेर काल भारतात शानदार आगमन झाले. कालचा दिवस जणू भारत – अमेरिका मैत्रीसंबंध दृढमूल करण्याचा होता. भारतीय सांस्कृतिक विरासतीचे भव्यदिव्य, नेत्रदीपक दर्शन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना घडविण्यात आले. स्वतः पंतप्रधान मोदींनी गांधीजींच्या साबरमती आश्रमाची सफर ट्रम्प दांपत्याला घडविली. जगातील सर्वांत संहारक सत्तेचा राष्ट्राध्यक्ष साबरमतीमध्ये शांती आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्यापुढे नतमस्तक होताना पाहणे हा ... Read More »

दिल्लीच्या पराभवातून कॉंग्रेस धडा घेईल?

देवेश कु. कडकडे (डिचोली) आपला वेळ परदेशात घालवून सवडीचे राजकारण करणार्‍या राहुल गांधींबद्दल देशातील युवकांचे आकर्षण संपले आणि २०१९ पर्यंत तर कॉंग्रेसचे अध्यक्ष टिंगलटवाळी करण्यासाठी उरले. भरीस मोदी-शहांनी आपल्या आक्रमक प्रचाराने कॉंग्रेसच्या अस्तित्वाला संकटाच्या घेर्‍यात ओढले. दिल्ली विधानसभा निकालानंतर सर्वांचा रोख भाजपच्या दारुण पराभवाची मीमांसा करण्यावर आहे. कॉंग्रेसच्या दयनीय अवस्थेची कोणी फारशी गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. ज्या राज्यात कॉंग्रेसने ... Read More »

दहशतवादापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी भारत, अमेरिका वचनबद्ध

>> ऐतिहासिक भारत भेटीवर अमेरिकेच्या अध्यक्षांचे अभूतपूर्व स्वागत अमेरिका भारताचा आदर करते, अमेरिकेचे भारतावर प्रेम आणि निष्ठा आहे. भारत आणि अमेरिका कट्टरपंथीय इस्लामी दहशतवादापासून आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध आहेत, असे भावनिक उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोतेरा स्टेडियमवर आयोजित भव्य अशा ‘नमस्ते ट्रम्प’ या सोहळ्यात बोलताना काढले. भारताबरोबरील संरक्षण विषयक संबंध अधिक दृढ करण्यासह अमेरिका भारताबरोबर उत्तम प्रकारच्या व्यापारी ... Read More »

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याची गरज ः उपराष्ट्रपती

केंद्र सरकारने नव्याने दुरुस्त केलेला नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा (सीएए) सखोल अभ्यास न करताच काही जणांकडून कायद्यातील दुरुस्तीला केला जाणारा विरोध दुर्दैवी आहे. सीएए दुरुस्तीला विरोध करणार्‍यांनी प्रथम सीएए दुरुस्तीचा सखोल अभ्यास करून त्यानंतर आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे. मतप्रदर्शन करणे हा अधिकार असला तरी चुकीच्या माहितीचा फैलाव करणे अयोग्य आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे काल केले. ... Read More »

महिन्याभरात म्हादईवर श्‍वेतपत्रिका काढा

>> अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा विरोधकांचा पत्रकार परिषदेत इशारा म्हादईप्रश्‍नी गोवा सरकारने एका महिन्याच्या आत श्‍वेतपत्रिका काढावी. अन्यथा विरोधक राज्यातील जनतेला एकत्र करून राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा इशारा काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पत्रकार परिषदेत दिला. कामत यांनी काल अन्य सहा विरोधी आमदारांसह पत्रकार परिषद घेतली. यावेळी कामत म्हणाले, की गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी श्‍वेतपत्रिका काढून म्हादई लढ्यासंबंधी काय काय केले ... Read More »

दिल्लीत सीएएवरून हिंसाचार

>> पोलीसासह तीन ठार >> अनेकजण जखमी ईशान्य दिल्लीतील जाफ्राबाद व मौजपूर या भागांमध्ये काल पुन्हा सीएएविरोधक व सीएएसमर्थक निदर्शकांदरम्यान जोरदार संघर्ष उडाला. परिणामस्वरुप निदर्शकांनी घरे, दुकाने तसेच वाहनांची जाळपोळ केली व परस्परांवर तुफान दगडफेक करून हिंसाचार माजवला. या हिंसाचारात एक पोलीस कॉन्स्टेबल ठार झाला. तसेच दोन नागरिकही हिंसाचारात मरण पावले आहेत. तर पोलीस उपायुक्त जखमी झाल्याचे वृत्त आहे. तर ... Read More »

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

>> बांगलादेशचा केला १८ धावांनी पराभव युवा सलीमीवीर शफाली वर्माच्या झंझावाती ३९ धावा व लेगस्पिनर पूनम यादवच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने काल सोमवारी महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदविताना बांगलादेशचा १८ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेल्या १४३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला केवळ ८ बाद १२४ धावांपर्यंतच मजल मारता आली. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी ... Read More »

बेंगळुरूला मागे टाकण्याचा चेन्नईनचा निर्धार

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये मंगळवारी चेन्नईन एफसीचा सामना नॉर्थईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध होत आहे. ही लढत जिंकून बेंगळूरु एफसी संघाला मागे टाकून तिसरे स्थान मिळवण्याचा चेन्नईनचा निर्धार असेल. या निकालावर साखळीचा अंतिम गुणतक्ता आणि बाद फेरीचे वेळापत्रक अवलंबून असेल. चेन्नईन सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे २८ गुण आहेत. बेंगळुरूपेक्षा ते दोन गुणांनी मागे आहेत. बरोबरी झाली किंवा हरल्यास चेन्नईन संघाला ... Read More »

॥ मनःशांती उपनिषदातून ॥ निरामय देहा-मनानं शतायुषी होउ या…

 प्रा. रमेश सप्रे जो मला भक्तिभावानं, निष्काम भावनेनं अर्पण करतो त्याचा मी सप्रेम स्वीकार करतो. म्हणून निर्लेप वृत्तीनं, पाण्यातल्या कमलदलाप्रमाणे इंद्रियं कार्यक्षम, मनबुद्धी पवित्र राखून दीर्घायुषी (शतायुषी) बनण्याचा संकल्प करु या. भीष्मपितामह नि श्रीकृष्णाच्या निरामय दीर्घ जीवनाचं रहस्य हेच आहे. ‘आयुष’ आरोग्य पुरवणीच्या या नव्या सदराचं नाव ठेवताना काही विचार मनात होता. ‘उपनिषदातून मनःशांती’ असं शीर्षक सरळ सोपं झालं असतं. ... Read More »

चाळीशीतला गोंधळ

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) दरवर्षी ठराविक दिवशी काही तपासण्या करून घ्यायचे ठरवून टाका. ‘८ मार्च’ जागतिक महिला दिन का नाही? मान-सन्मान, सत्कार, भाषणे करण्याइतकेच महत्त्वाचे घरातील महिलांचे आरोग्यरक्षण होय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत काम करणारी, वेळी-अवेळी जाऊन पलंगावर विश्रांती घ्यायला लागली किंवा अर्ध्या तासात उरकणार्‍या कामांना दोन तास घेऊ लागल्यास समजावे की स्त्रीला मानसिक, शारीरिक त्रास होत ... Read More »